एचपीने नव्या एचपी स्पेक्ट्रे x360 सह प्रीमिअम नोटबुक पोर्टफोलिओवर दिला भर

सध्याच्या जगात पीसी (PC) हा काम, शिक्षण आणि मनोरंजनासाठीचा (Work, Education And Entertainment) एक अत्यावश्यक भाग बनला आहे. एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये वापरकर्त्याच्या विविध प्रकारच्या गरजांनुरुप अप्रतिम परफॉर्मन्स (Performance) मिळतो. हा कन्व्हर्टिबल २ इन १ लॅपटॉप (convertible 2 in 1 laptop) म्हणजे फॅक्टरमध्ये १३.५ इंच वापरारोग्य स्क्रीन असलेला पहिला १५ इंची डिव्हाइस आहे.

  • जगातील पहिला प्रीमिअम २-इन-१ कन्व्हर्टिबल, ३:२ अस्पेक्ट रेशिओ डिस्प्ले आणि अडाप्टिव्ह इंटेलिजन्ससह

नवी दिल्ली : आपल्या प्रीमिअम नोटबुक पोर्टफोलिओला (Premium Notebook Portfolio) अधिक बळकटी देत एचपीने नुकतेच संपूर्णपणे नवे असे एचपी स्पेक्ट्रे x360 14 हे उत्पादन सादर केले. अडाप्टिव्ह, स्मार्ट आणि इंटेलिजंट फिचर्स असणाऱ्या या नोटबुकमध्ये ३:२ विंडोज कन्व्हर्टिबलसह ९०.३३ टक्के असा स्क्रीन टू बॉडी रेशिओ आणि अडाप्टिव्ह इंटेलिजन्स मिळतो. एचपी स्पेक्ट्रे (HP Spectre x360) हा भारतातील एक सर्वात लोकप्रिय प्रीमिअम नोटबुक आहे आणि स्टायलिश डिझाईन आणि परफॉर्मन्ससाठी हा नोटबुक या उद्योगक्षेत्रातील अनेक कौतुकांना पात्र ठरला आहे.

सध्याच्या जगात पीसी हा काम, शिक्षण आणि मनोरंजनासाठीचा एक अत्यावश्यक भाग बनला आहे. एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये वापरकर्त्याच्या विविध प्रकारच्या गरजांनुरुप अप्रतिम परफॉर्मन्स मिळतो. हा कन्व्हर्टिबल २ इन १ लॅपटॉप म्हणजे फॅक्टरमध्ये १३.५ इंच वापरारोग्य स्क्रीन असलेला पहिला १५ इंची डिव्हाइस आहे. यामुळे सुमारे २० टक्के दृश्यात्मकता वाढते. ब्राऊझिंग, वाचन आणि कंटेंट एडिटिंगच्या कामात अधिक उत्पादकता आणि कार्यक्षमतेसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

नाइटफॉल ब्लॅकसह कॉपर लक्स असेंट आणि पॉइझडॉन ब्लूसह पेल ब्रास असेंट अशा रंगसंगतीत उपलब्ध स्पेक्ट्रे x360 14 मध्ये नव्या दमाचे डिझाइन आहे. तसेच, उत्पादकता आणि परफॉर्मन्स वृद्धिंगत करणाऱ्या नव्या एआय आधारित ऑडिओ क्षमता आणि परफॉर्मन्स मॅनेजमेंट अशी इंटेलिजंट फिचर्सही यात आहेत. नवा एचपी स्पेक्ट्रे हा पातळ आणि हलका लॅपटॉप आहे. हा दिसायला देखणा, एलिगंट असून यात वैशिष्ट्यपूर्ण ॲल्युमिनिअम सीएनसी मशिनिंगच्या साह्याने आकर्षक जेम कट आणि ड्युएल चेंबर डिझाइन देण्यात आले आहे. इतकेच नाही, अवघे १.६ किलो वजन असणाऱ्या या लॅपटॉपची बॅटरी १७ तासांपर्यंत चालते. सतत काम करताना आकर्षक, बहुपयोगी आणि अल्ट्रा मोबाइल डिझाइनमधून आपल्या जीवनशैलीला अनुरूप ठरेल असा साथीदार हवा असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा अगदी योग्य पर्याय आहे.

स्पेक्ट्रे x360 ची रचना एचपीच्या अत्यंत शाश्वत अशा पीसी पोर्टफोलिओमधील आघाडीच्या स्थानानुसारच करण्यात आली आहे. पेंढ्यासारखा कृषी कचरा, बीटाचा रस, घरातील कचरा अशा पुनर्वापरयोग्य, नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवण्यात आलेला किबोर्ड सिझर्स असणारा हा जगातील पहिला लॅपटॉप आहे.

एका किबोर्डसाठी १४.४६ ग्रॅम ऑरगॅनिक, पुनर्वापरयोग्य कच्चा माल वापरण्यात आला आहे आणि यामुळे १२०० किलोहून अधिक कार्बन उत्सर्जन टाळण्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्यास एचपी बांधिल आहे आणि आपल्या उत्पादन आणि पॅकेजिंगमध्ये पुनर्वापरयोग्य आणि बायोडिग्रेडेबल घटकांचा वापर करून हा ब्रँड या कामी अग्रणी आहे.

“एचपीमध्ये आमचा भर आहे सातत्याने आमच्या ग्राहकांकडील माहितीनुसार अत्यंत परिणामकारक पर्याय पुरवण्यावर. सध्याच्या काळातील ग्राहकांना उत्पादकता, सर्जनशीलता आणि सुरक्षितेत कोणतीही तडजोड न करता त्यांच्या वर्क ॲट होम जीवनशैलीला साजेसे आणि सहज त्यात सामावू शकतील अशा डिव्हाईसची आवश्यकता असते. तंत्रज्ञानासह अधिकाधिक काही करू पाहणाऱ्या आधुनिक हायपरकनेक्टेड ग्राहकांसाठी नवा एचपी स्पेक्ट्रे x360 14 हा योग्य पर्याय आहे,” असे एचपी इंडिया मार्केटचे वरिष्ठ संचालक (पर्सनल सिस्टम) विक्रम बेदी म्हणाले.

“जगातील पहिला ३:२ विंडोज कन्व्हर्टिबल देणारा आमचा अत्यंत दमदार स्पेक्ट्रे सादर करून आम्ही आमचा प्रीमिअम पोर्टफोलिओ अधिक व्यापक करत आहोत. सतत नवनिर्मित करणाऱ्या, वापर करणाऱ्या नेक्स्ट जनरेशनच्या गरजा यातून पूर्ण होतात. एचपीमध्ये आम्ही नेहमीच असे डिव्हाईसेस देण्याचा प्रयत्न करत असतो जी भविष्यात आम्हाला आघाडीवर नेतील आणि पुढील पिढीला अधिक स्वातंत्र्य बहाल करतील. आपल्या पृथ्वीसाठी शाश्वत भविष्य उभारण्याची बांधिलकी जपत नव्या एचपी स्पेक्ट्रे x360 चा किबोर्ड ऑरगॅनिक, पुनर्वापरयोग्य घटकांपासून बनवण्यात आला आहे. या प्रकारचा हा जगातील पहिलाच किबोर्ड आहे,” असे विक्रम बेदी यांनी सांगितले.

पीसी कधी नव्हे इतके अत्यावश्यक झाले आहेत. वापरकर्त्यांना कधीही, कुठेही काम करता येईल अशी लवचिकता, मोबिलिटी आणि सुरक्षितता प्रदान करणारी टूल्स आणि तंत्रज्ञान हवे आहे.

एचपी श्युअरव्ह्यू रिफ्लेक्ट प्रायव्हसी स्क्रीनमुळे इतरांच्या तुलनेत दुप्पट परिणामकारक खासगीपणा मिळतो आणि चोरट्या नजरांपासून तुमचा कंटेंट गुप्त राहतो. एचपीच्या प्रत्यक्ष, डिजिटली नियंत्रित केल्या जाणाऱ्या शटरमुळे चालू किंवा पूर्णपणे बंद कॅमेरा अनहॅकेबल आहे की नाही हे एका नजरेत ओळखता येते. यातील एलईडी की असलेल्या खास म्युट माइकमुळे तुम्ही व्हिडीओ कॉल्समध्ये कोणी तुमचं संभाषण ऐकत तर नाही ना ही काळजी न करता निश्चिंतपणे संवाद साधू शकता.

घरातून काम करताना सातत्यपूर्ण, वेगवान कनेक्शन गरजेचे असते आणि स्पेक्ट्रे x360 14 मध्ये वायफाय ६ आणि ब्लूटुथ ५.० सपोर्टसह तिप्पट वेगवान कनेक्शन स्पीड मिळतो. एचपीच्या क्विकड्रॉपमुळे फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट किंवा टेक्स्ट पीसी आणि मोबाइल डिव्हाईसमध्ये जलद एडिटिंग आणि शेअरिंगसाठी वेगाने, सहजपणे आणि सुरक्षितरित्या ट्रान्सफर करता येतात.

एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये हाय-प्रीसिजन ॲल्युमिनिअम सीएनसीसह आकर्षक जेम कट आणि ड्युएल चेंबर अँग्युलर डिझाइन देण्यात आले आहे. यात या क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजे ९० टक्के स्क्रीन टू बॉडी रेशिओ1 आहे आणि यात टॉप आणि बॉटम अशा दोन्हीकडच्या बेझल्समध्ये ६० इतके आकर्षक रिडक्शन आहे.

एचपी स्पेक्ट्रे x360 14

• डिझाइन :

तीन आकर्षक रंगात उपलब्ध – नाइटफॉल ब्लॅकसह कॉपर लक्स ॲसेंट, पॉइझडॉन ब्ल्यू सह पेल ब्रास असेंट

3K2K OLED डिस्प्ले – आयसेफ®सह अनुभवा सुंदर आणि आकर्षक रंग, जे तुमच्या डोळ्यांना सुखावतील आणि ब्लू लाइटमुळे डोळ्यांवर येणारा ताणही कमी करतील
अँटी-रिफ्लेक्टिव्ह डिस्प्ले – रिफ्लेक्शन कमी करणारी स्क्रीन आणि अधिक चांगल्या काँण्ट्रास्टमुळे कोणत्याही सेटिंगमध्ये स्क्रीन सुस्पष्ट दिसतो.

सुटसुटीत आणि हलक्या अशा एचपी स्पेक्ट्रे x360 14चे वजन फक्त १.३६ किलो आहे, जेन झेड आणि मिलेनिअल वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन याची डिझाइन तयार करण्यात आली आहे.

१७ तास अशी दीर्घकाळ चालणारी बॅटरी असल्याने वापरकर्त्यांना सतत आऊटलेट शोधण्याची चिंता न बाळगता कनेक्टेड राहता येईल

परफॉर्मन्स :

एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये उत्पादकता आणि मनोरंजनाचा योग्य मेळ साधण्यात आला आहे

11th जेन इंटेल® कोअर™ ने सुसज्ज एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये वेगवान काम, सहज मल्टिटास्किंग आणि सहजसोपे प्लेबॅक शक्य होते

३:२ असा अस्पेक्ट रेशिओ डिस्प्ले असणारा हा पहिला स्पेक्ट्रे x360 आहे, स्पेक्ट्रे x360 14 मध्ये १६:९ रेशिओच्या तुलनेत साधारण २० टक्के अधिक व्हर्टिकल दृश्यात्मकता मिळते आणि ९०.३३* टक्के एसटीबीआर आणि अडाप्टिव्ह बॅटरी ऑप्टिमायझरही आहे

ऑल इन वन कीबोर्ड असलेला पहिला स्पेक्ट्रे, यात पॉवर बटन, नवे कॅमेरा शटर बटन, एचपी कमांड सेंटर, म्युट माइक तसेच फिंगरप्रिंट रीडही आहे

मोबिलिटी :

आधुनिक इंटेल® Wi-Fi 6 BT 5.0 सह करा वेगाने फाइल ट्रान्सफर

एचपी क्विक ड्रॉपमुळे डिव्हाईसेस आणि ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये फाइल अगदी सहज ट्रान्सफर करता येतात. या डिव्हाईसमध्ये 40Gbps पर्यंतच्या वेगवान सिग्नलिंग डेटा रेडसाठी थंडरबोल्ट™ 4 आहे त्यामुळे व्हिडीओ, फोटो आणि सिनेमासारख्या मोठ्या फाइल्स काही सेकंदात पाठवता आणि मिळवता येतात

एचपी कमांड सेंटरमधील स्मार्टसेन्समुळे परफॉर्मन्स, ॲकॉस्टिक बाबतीत सिस्टम स्वत:हूनच बदल करते आणि तापमानही आपोआपच नियंत्रित केले जाते, लॅपटॉप कुठे ठेवला आहे आणि त्यावर कोणते ॲप्लिकेशन्स सुरू आहेत यानुसार हे बदल केले जातात

सुरक्षितता :

सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी एचपी स्पेक्ट्रे x360 14 मध्ये डिजिटली नियंत्रित केल्या जाणाऱ्या फिजिकल शटरसह वेबकॅम, म्युट माइक आणि एचपी श्युअर व्ह्यू रिफ्लेक्ट आहे

किंमत आणि उपलब्धता :

एचपी स्पेक्ट्रे x360 14 आता एचपी वर्ल्ड स्टोअर्स आणि store.hp.com, ॲमेझॉनवर ऑनलाइन तसेच इतर लार्ज फॉरमॅट रीटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत

एचपी स्पेक्ट्रे x360 14 ची किंमत १,१९,९९९ रु. पासून सुरू होते