एचपीचे एचपी पॅव्हिलियन एअरो लाँच; भारतातील सर्वात हलके आणि दमदार कन्झ्युमर नोटबुक

मागील काही वर्षांत या क्षेत्रातील आघाडीच्या नाविन्यता आणि प्रीमिअम कन्झ्युमर अनुभवानुसार अपग्रेड झाल्याने पॅव्हिलियन नोटबुक रेंज विद्यार्थी आणि मिलेनिअल्समध्ये सर्वाधिक आवडता नोटबुक ब्रँड ठरला आहे. २०२१ मध्ये एचपीने घरून काम करण्याचा आणि शिकण्याचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी अडाप्टिव्ह बॅटरी ऑप्टिमायझर आणि मॉर्डन स्टँडबाय यासारख्या प्रीमिअम वैशिष्ट्यांचा समावेश केला.

  • एचपी पॅव्हिलियन हा भारतातील मुख्य प्रवाहातील नोटबुक ब्रँडमधील सर्वात लोकप्रिय
  • पॅव्हिलियन एअरो हा सर्वात हलका एएमडी-आधारित कन्झ्युमर लॅपटाप, १ किलोपेक्षाही कमी वजन
  • शाश्वततेच्या दृष्टीने रचना आणि ग्राहकांनी वापरून समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवण्यात आला आहे
  • परिणामकारकता वाढवणारे आणि मनोरंजनात्मक अनुभव वृद्धिंगत करणारे नाविन्यपूर्ण डिझाइन
  • अप्रतिम दृश्यात्मक अनुभवासाठी ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ असलेला पहिला पॅव्हिलियन लॅपटॉप

नवी दिल्ली : एचपीने आज एचपी पॅव्हिलियन एअरो (HP Pavilion Aero) १३ हा १ किलोहून कमी वजनाचा, सर्वात हलका एएमडी आधारित कन्झ्युमर नोटबुक भारतात सादर करत आपल्या पॅव्हिलियन नोटबुक या मुख्य पोर्टफोलिआला अधिक व्यापक केले आहे. शाश्वत, पुनर्वापरातील घटकांपासून बनलेल्या या पीसीमध्ये एएमडी Ryzen™ 5& 7 5800U Mobile Processor मोबाइल प्रोसेसरसह एएमडी रीडॉन ग्राफिक्स आहे.

मागील काही वर्षांत या क्षेत्रातील आघाडीच्या नाविन्यता आणि प्रिमियम कन्झ्युमर अनुभवानुसार अपग्रेड झाल्याने पॅव्हिलियन नोटबुक रेंज विद्यार्थी आणि मिलेनिअल्समध्ये सर्वाधिक आवडता नोटबुक ब्रँड ठरला आहे. २०२१ मध्ये एचपीने घरून काम करण्याचा आणि शिकण्याचा अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी अडाप्टिव्ह बॅटरी ऑप्टिमायझर आणि मॉर्डन स्टँडबाय यासारख्या प्रीमिअम वैशिष्ट्यांचा समावेश केला.

या सीरिजमधील नवे सादरीकरण

पॅव्हिलियन एअरो हा ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी-रेशिओ असणारा पहिला पॅव्हिलियअन नोटबुक आहे. त्यामुळे अप्रतिम दृश्यात्मक अनुभव मिळतो. तसेच प्रीमिअम लुकसाठी यात संपूर्ण मॅग्नेशिअम ॲल्युमिनिअम चॅसिस आणि चारही बाजूंनी पातळ बेझल आहे. पेल रोझ गोल्ड, सिरॅमिक व्हाईट आणि नॅचरल सिल्व्हर अशा आकर्षक कलर पॅलेट्समध्ये उपलब्ध पॅव्हिलीयन एअरोची डिझाइनही उत्कृष्ट आहे आणि यात मनोरंजन आणि उत्पादकता वृद्धिंगत करण्याच्या क्षमताही आहेत.

भारतातील डिजिटल बदलांच्या केंद्रस्थानी पीसी आहेत. ग्राहक आता काम आणि शिक्षणासाठी हायब्रिड पद्धतींकडे वळत आहेत आणि त्यांना असे डिव्हाइस हवेत जे दमदार असतील आणि त्याचवेळी हलकेही असतील. कारण त्यामुळे त्यांना कुठूनही काम करता येईल, शिकता येईल, मनोरंजनाचा आनंद घेता येईल, कुटुंब आणि मित्रमंडळींशी कनेक्ट होता येईल किंवा ऑनलाइन व्हिडिओ तयार करता येतील, स्ट्रीम करता येतील. अत्यंत हलक्या अशा या डिव्हाइसमध्ये एचपीचे उत्कृष्ट डिझाइन आणि परफॉर्मन्स यांचा मेळ घालत नव्या एचपी पॅव्हिलियन एअरो १३ मध्ये या गरजा पूर्ण होतात.

एचपी इंडिया मार्केटचे (पर्सनल सिस्टम) वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, : “पीसी हा लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनत आहे. हल्लीच्या वापरकर्त्यांना असे डिव्हाईस हवे ज्यात दमदारपणा आणि बहुविधतेचा मेळ असेल. एचपी पॅव्हेलियन एअरो १३ मध्ये ग्राहकांच्या या बदलत्या मोबिलिटीच्या गरजा पूर्ण करत अतुलनीय परफॉर्मन्सची जोड देण्यात आली आहे. वापरकर्त्यांना उत्पादक राहण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी डिव्हाईसचा लुक आणि फिल यात कोणतीही तडजोड न करता त्यांना सक्षम करणारे प्रीमिअम पर्याय देऊ करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे प्रतिक आहे.”

परफॉर्मन्स आणि उत्पादकता

आधुनिकए एमडी Ryzen™ 5 & 7 5800U मोबाइल प्रोसेसरसह एमडी रीडऑन™ ग्राफिक्सने सज्ज पॅव्हिलियन एअरो या वर्षात2 विंडोज 11 मध्ये अपग्रेड होणे अपेक्षित आहे. उपलब्ध वायरलेसच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवान आणि विश्वासार्ह वाय-फाय3 कनेक्टिव्हिटी आणि १०.५ तासांपर्यंतचा बॅटरी काळ मिळेल4.काम करताना किंवा ब्राऊझिंग करताना यात वेगवान आणि प्रतिक्रियात्मक प्रोसेसर मिळतो. पॅव्हिलियन एअरो १३ हा ९० टक्के स्क्रीन-टू-बॉडी-रेशिओ देणारा पहिला पॅव्हिलियन नोटबुक आहे. त्यामुळे दृश्यात्मकता वाढून कंटेंट पाहणे अधिक सोयीचे होते.

एचपीच्या पहिल्यावहिल्या १३.३ इंची लॅपटॉपमधील १६:१० अस्पेक्ट रेशिओ आणि १९९० रीझोल्युशनमुळे टेक्स्ट आणि इमेजेस अधिक आकर्षक पद्धतीने दिसतील आणि स्क्रीनवर स्ट्रिमिंगचा अनुभवही सहजसुंदर असेल. वापरकर्त्यांना सूर्यप्रकाशातही ब्राऊज करता येईल. यासाठी यात ४०० नीट्सचा ब्राइटनेस आहे आणि त्यामुळे अधिक व्यापक कलर पॅलेटसाठी १०० टक्के आरजीबीसह वेबसर्फिंग किंवा व्हिडीओ स्ट्रीम करताना अत्यंत शार्प आणि आकर्षक दृश्यात्मकतेचा अनुभव घेता येईल.

या पीसीमध्ये पूर्णपणे मॅग्नेशिअम ॲल्युमिनिअम चॅसिस आणि ४ बाजूंना पातळ बेझल आहे. यात बिल्ट-इन ॲलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडरही आहे.

एचपीच्या शाश्वत पीसी पोर्टफोलिओमधील भर

पॅव्हिलियन एअरो १३ ची रचना त्याच्या जीवनकाळातील प्रत्येक टप्प्यावर शाश्वत पद्धतीने करण्यात आली आहे. यात ग्राहकांनी वापरलेल्या आणि समुद्रात फेकलेल्या प्लास्टिकचा वापर करत ६००० प्लास्टिक बाटल्यांमुळे महासागरांचे प्रदुषण होण्याला आळा घालण्यात आला आहे9. एनर्जी स्टार® प्रमाणित आणि ईपीईएटी® गोल्ड नोंदणीकृत या लॅपटॉपमध्ये वॉटर-बेस्ड पेंट आहे ज्यामुळे व्हीओसी उत्सर्जन नियंत्रित राहते. लॅपटॉपचा बाहेरील बॉक्स आणि फायबर कुशन्स शाश्वत स्रोतातून आणि पुनर्वापरातून बनवण्यात आले आहेत. एचपी प्लॅनेट पार्टनर्सच्या उपक्रमाचा भाग म्हणून वापरलेल्या वस्तू पुन्हा विक्रीसाठी किंवा पुनर्वापरासाठी गोळा करून अधिक सर्क्युलर, कमी कार्बन उत्सर्जन असलेली अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. जगातील सर्वाधिक शाश्वत पीसी पोर्टफोलिओ उपलब्ध करून देण्याच्या एचपीच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

किंमत आणि उपलब्धता

सर्व एचपी वर्ल्ड स्टोअर्स आणि hp.com/in या ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध एचपी पॅव्हिलियन एअरो १३ पोर्टफोलिओच्या किमती खालीलप्रमाणे :

  • एचपी पॅव्हिलियन एअरो लॅपटॉप १३ – BE0200AU ७९,९९९ या किमतीपासून सुरू होतो. यात १३.३ इंच स्क्रिन, तसेच बिल्ट इन ॲलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडर आहे, प्रोसेसर – एएमडी Ryzen™ 5 5600U; रंग – सिरॅमिक व्हाईट
  • एचपी पॅव्हिलियन एअरो लॅपटॉप १३ – BE0030AU ७९,९९९ या किमतीपासून सुरू होतो. यात १३.३ इंच स्क्रिन, तसेच बिल्ट इन ॲलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडर आहे, प्रोसेसर – एएमडी Ryzen™ 5 5600U; रंग- नॅचरल सिल्व्हर
  • एचपी पॅव्हिलियन एअरो लॅपटॉप १३ – BE0190AU ७९,९९९ या किमतीपासून सुरू होतो. यात १३.३ इंच स्क्रिन, तसेच बिल्ट इन ॲलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडर आहे, प्रोसेसर – एएमडी Ryzen™ 5 5600U; रंग – पेल रोझ गोल्ड
  • एचपी पॅव्हिलियन एअरो लॅपटॉप १३ – BE0186AU ९४,९९९ या किमतीपासून सुरू होतो. यात १३.३ इंच स्क्रिन, तसेच बिल्ट इन ॲलेक्सा आणि फिंगरप्रिंट रीडर आहे, प्रोसेसर – एएमडी Ryzen™ 7 5800U: रंग- पेल रोझ गोल्ड