एचआरएक्स आणि फ्लिपकार्टची भागीदारी,स्पोर्ट आणि फिटनेस श्रेणीतील ब्रॅण्डची उपकरणे दाखल

'सक्रिय फिटनेस प्रेमीं'च्या गरजा लक्षात घेऊन काही काळजीपूर्वक निवडलेल्या उत्पादनांचा या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरी व्यायाम करणाऱ्या आणि तशी जीवनशैली स्वीकारलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, दीर्घकाळ टिकाऊ आणि दर्जेदार उपकरणांची ही श्रेणी आहे.

  • नव्या श्रेणीची सुरुवात
  • एचआरएक्सच्या #FlexWithHRX या सर्वात मोठ्या फिटनेस उपक्रमाला सुरुवात
  • हृतिक रोशनला भेटण्याची संधी

मुंबई : घरी व्यायाम करण्यासाठी उपयुक्त असणारी विविध क्रीडा आणि व्यायाम उपकरणे आणि साधने बाजारात आणण्यासाठी एचआरएक्स या भारतातील आघाडीचा फिटनेस ब्रँडने आणि भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी Flipkart यांनी एकत्र येत भागीदारी जाहीर केली आहे.

‘सक्रिय फिटनेस प्रेमीं’च्या गरजा लक्षात घेऊन काही काळजीपूर्वक निवडलेल्या उत्पादनांचा या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरी व्यायाम करणाऱ्या आणि तशी जीवनशैली स्वीकारलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, दीर्घकाळ टिकाऊ आणि दर्जेदार उपकरणांची ही श्रेणी आहे. उदा. योगा मॅटची श्रेणी, सर्व प्रकारच्या योगा आणि व्यायामासाठी, तसेच व्यावसायिक वापरासाठी या मॅटचा उपयोग होतो. त्यामध्ये न घसरण्याचा गुणधर्मासह विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.

या उपकरणांच्या उपलब्धतेमुळे फिटनेस प्रेमींच्या गरजांना पूर्ण होतीलच शिवाय, घरी नव्याने व्यायाम, योगा सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही त्यातून प्रेरणा मिळेल. या सर्व साधनांच्या व उपकरणांच्या दर्जाची आणि कार्यक्षमतेची चाचणी एनएबीएल प्रमाणित लॅबमध्ये घेण्यात आली आहे. तसेच त्यांना फिटनेस तज्ञांनीही प्रमाणित केले आहे.

ही स्पोर्ट अँड फिटनेस श्रेणी दाखल केल्याबद्दल, एचआरएक्स कंपनीने #FlexWithHRX हा आठवडाभर चालणारा उपक्रम राबविला आहे. त्यातून भारतातील सर्वात मोठ्या फिटनेस ब्रॅण्डसोबत घरामध्ये व्यायामाला प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय, या उपक्रमाद्वारे, अभिनेता हृतिक रोशनला (आभासी) भेटण्याची संधी मिळणार आहे. #FlexWithHRX हा उपक्रम २० ऑगस्टपासून Flipkart.com लाईव्ह असेल.

यासंदर्भात, बोलताना एचआरएक्स कंपनीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अफसर झैदी यांनी सांगितले की, ” देशभरात लॉकडाउन वाढल्यामुळे व्यायामशाळा बंद आहेत, परिणामी घरीच व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे घरी व्यायाम करण्यासाठी उपकरणांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच आमच्या टीमने, आमच्या ग्राहकांच्या फिटनेस प्रवासाला सर्वात चांगल्याप्रकारे कसे सहकार्य करता येईल आणि त्यासाठी स्पोर्ट व फिटनेस उपकरणांची संकल्पना कशी गतिमान करता येईल, यावर विचार केला. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि घरी व्यायामाचा चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही ही नवी श्रेणी फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरु केली आहे.”

फ्लिपकार्टच्या प्रायव्हेट लेबल्स विभागाच्या वरिष्ठ संचालक, प्रिया फोटेदार यांनी सांगितले कि, “सर्व वयोगटांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्व वाढत आहे. गेल्या वर्षभरात या संबंधित श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एचआरएक्सची स्पोर्ट आणि फिटनेस श्रेणी दाखल झाल्याने आता ग्राहकांना व्यायामशाळेतील उपकरणे आणि फिटनेस उत्पादने घरी आणता येतील. तसेच त्यामुळे घरी राहून व्यायाम करण्याचा त्यांचा अनुभव अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. एचआरएक्सचा आज देशात एक समर्पित ग्राहकवर्ग आहे आणि सहस्राब्दी पिढी व युवा वयोगटाचा त्यात मोठा सहभाग आहे. या भागीदारीमुळे एचआरएक्स कंपनीची उच्च दर्जाची फिटनेस उत्पादने महानगरे, तसेच टायर २ आणि टायर ३ शहरांतील ग्राहकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.”

याशिवाय, या वर्षाअखेरीस या श्रेणीमध्ये विस्तार करण्याची तसेच स्पोर्ट साधनांची आणि ट्रेडमिल्सची किरकोळ विक्री सुरु करण्याची एचआरएक्सची योजना आहे. एचआरएक्सची नवीन श्रेणी Flipkart आणि लवकरच Myntra.com वर उपलब्ध आहे. या उपकरणांच्या किंमंती रु ३४९ पासून पुढे आहेत.