64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या

हुवावे नोवा 8 आय मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Huawei Nova 8i च्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

    Huawei ने आपल्या Nova 8 सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Huawei Nova 8i नावाने मलेशियामध्ये लाँच केला गेला आहे. Huawe Nova 8i मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या हुवावे स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 662 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. Nova 8i स्मार्टफोन Android 10 आधारित EMUI 11 वर चालतो.

    हुवावे नोवा 8 आय मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Huawei Nova 8i च्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर कंपनीने दिला आहे.