साथीच्या काळात सायबर फसवणुकीच्या प्रमाणात वाढ; वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत सहयोगाने अविश्रांत काम करत आहोत: एअरटेल सीईओ

एअरटेल कधीही फोनवरून व्हीआयपी नंबर्सची विक्री करत नाही आणि कधीही तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही याची कृपया नोंद घ्या. या दोन्हीपैकी कशाचाही अनुभव तुम्हाला आला तर तत्काळ १२१ क्रमांकावर कॉल करून त्याची माहिती द्या.

  मुंबई : एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेत ऑनलाइन व्यवहारांमधील सायबर फसवणुकींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, असा इशारा नुकताच दिला. कंपनी यावर “अविश्रांतपणे” काम करत आहे आणि ग्राहक फसवणुकीला बळी पडू नयेत म्हणून सुरक्षिततेच्या सुविधा आणणार आहे, यावरही त्यांनी भर दिला. ग्राहकांशी ईमेलद्वारे साधलेल्या संपर्कामध्ये विठ्ठल यांनी फसवणूक करणारे अवलंबत असलेल्या गुन्ह्याच्या पद्धतीवर अर्थात मोड्स ऑपरेंडीवर भर दिला आणि डिजिटल पेमेंट्सशी संबंधित सायबर फसवणुकींकडे लक्ष वेधले.

  “कोविड साथीची दुसरी लाट देशाच्या विविध भागांत झपाट्याने पसरत असल्यामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुर्देवाने तशीच वाढ सायबर फसवणुकींमध्येही दिसून येत आहे,” असे विठ्ठल यांनी लिहिले आहे.

  वापरकर्त्यांसोबत होऊ शकणाऱ्या फसवणुकीच्या स्वरूपांबाबत इशारा देताना ते लिहितात की, सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांकडे घेऊन जाणारी सुविधा एअरटेलने “उद्योगक्षेत्रात प्रथमच” विकसित केली आहे. या सुविधेमुळे वापरकर्ते “फसवणुकीच्या भीतीशिवाय” व्यवहार करू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

  “एअरटेल कधीही फोनवरून व्हीआयपी नंबर्सची विक्री करत नाही आणि कधीही तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही याची कृपया नोंद घ्या. या दोन्हीपैकी कशाचाही अनुभव तुम्हाला आला तर तत्काळ १२१ क्रमांकावर कॉल करून त्याची माहिती द्या. खरे तर मी म्हणेन, कधीही कोणतीही शंका आल्यावर १२१ क्रमांकावर कॉल करा,” असा सल्ला विठ्ठल यांनी एअरटेल सबस्क्रायबर्सना पाठवलेल्या ईमेलमध्ये दिला.

  एअरटेल कर्मचारी असल्याचे सोंग आणून ग्राहकांना फोन करणाऱ्या लबाडांबद्दल त्यांनी ग्राहकांना सावध केले. त्यांनी सांगितले की, हे फ्रॉडस्टर्स नो योर कस्टमर (केवायसी) फॉर्म अपूर्ण आहे अशा सबबीखाली ग्राहकांना कॉल करतात. फ्रॉडस्टर्स ग्राहकांना गुगल प्ले स्टोअरवरून “एअरटेल क्विक सपोर्ट” ॲप इन्स्टॉल करून घेण्याची विनंती करू शकतात आणि त्यायोगे आपण ग्राहकांना मदत करू असा दावा करू शकतात. जेव्हा ग्राहक हे ॲप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याने टीमव्ह्यूअर क्विक सपोर्ट ॲपकडे रिडायरेक्ट केले जातात.

  “टीमव्ह्यूअर ॲप फ्रॉडस्टरला दूरस्थपणे ग्राहकाचे उपकरण व उपकरणाशी जोडलेली खाती ताब्यात घेण्याची मुभा देते. याचा अर्थ ग्राहकाने हे ॲप इन्स्टॉल केले तर ते फ्रॉडस्टरला त्याच्या उपकरणाशी जोडलेल्या सर्व खात्यांचा ताबा घेणे शक्य होते,” असे सांगत विठ्ठल यांनी वापरकर्त्यांना अशा प्रकारांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.

  त्याचप्रमाणे फ्रॉडस्टर एअरटेलचे कर्मचारी असल्याचा दावा करत ग्राहकाला कॉल करतात किंवा एसएमएस पाठवतात आणि खूप मोठा डिस्काउंट असलेले व्हीआयपी क्रमांक देण्याचा वायदा करतात. “व्यवहाराचा एक भाग म्हणून ग्राहकाला फ्रॉडस्टर टोकन/बुकिंग रक्कम म्हणून प्रीपेमेंट करण्याची विनंती करतात. हे पैसे मिळाले की फ्रॉडस्टर ग्राहकाशी सर्व संपर्क तोडून टाकतात आणि नंतर कधीच सापडत नाहीत,” असा इशारा विठ्ठल यांनी दिला. डिजिटल व्यवहारांत वाढ झाल्यामुळे पेमेंट्शी संबंधित सायबर फसवणुकींचे प्रमाणही वाढत आहे असे त्यांनी नमूद केले. “फ्रॉडस्टर बँक/वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी आहोत असा दावा करून ग्राहकांना कॉल करतात आणि त्यांच्या खात्याचे तपशील किंवा सध्याचे खाते अनब्लॉक/रिन्यू करण्यासाठी ओटीपी वगैरे मागतात. या तपशिलांचा उपयोग ग्राहकाच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरले जातात,” असे विठ्ठल म्हणाले.

  वेबसाइटवरील सूचित उत्पादनांपैकी एखादे सेकण्ड-हॅण्ड उत्पादन खरेदी करण्याच्या बहाण्यानेही फ्रॉडस्टर ग्राहकाला कॉल करतात, किंमतीबाबत वाटाघाटी करतात आणि खात्यावर पैसे पाठवण्यासाठी ग्राहकाचे यूपीआय तपशील मागतात. हे तपशील पुरवले गेले की, ग्राहकाच्या फोनवर व्यवहाराला मंजुरी देण्यासाठी एसएमएमद्वारे लिंक पाठवली जाते आणि या लिंकवर क्लिक केले असता खात्यावर पैसे जमा होण्याऐवजी खात्यावरील पैसे काढले जातात,” असे विठ्ठल यांनी नमूद केले.

  एअरटेलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लिहिले आहे की, सबस्क्रायबर्स या फसवणुकींना बळी पडू नयेत म्हणून कंपनीने अविश्रांतपणे काम केले आहे.

  “म्हणूनच आम्ही “सेफ पे” हे उद्योगक्षेत्रातील पहिले सुरक्षितता फीचर आणले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

  सेफ पे प्रत्येक व्यवहारामध्ये सुरक्षिततेचा एक अतिरिक्त स्तर पुरवते, असे त्यांनी नमूद केले. “याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष पेमेंट करता त्यापूर्वी आमचे इंटेलिजन्स नेटवर्क तुम्हाला संभाव्य फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला व्यवहाराची पुष्टी करण्यास सांगणारा एक संदेश पाठवते. त्यामुळे तुम्ही एअरटेल सेफ पे सक्रिय केले तर फसवणुकीला बळी पडण्याचा धोका कमी होतो. एअरटेल सेफ पे घेण्यासाठी तुम्ही एअरटेल पेमेंट्स बँक खाते उघडणे गरजेचे आहे,” असेही विठ्ठल यांनी सांगितले.

  Increase in cyber fraud during covid 19 outbreaks We are working tirelessly on user safety Airtel CEO