तेल उत्खननात भारताने मारली बाजी, MEIL च्या नव्या भारतीय तंत्रज्ञानांमुळे सुरक्षित आणि वेगवान तेल उत्खनन शक्य

ओएनजीसी कडे सुपुर्द करण्यात आलेली 1500 hp क्षमतेची दुसरी रिग हाइड्रोलिक और सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करत असल्याने ह्या तंत्रज्ञानाच्या फायदा ओएनजीसीला मिळेल. ही रिग ओएनजीसी अहमदाबादेतल्या कलोल जवळ धमासना गावात GGS- IV तेल क्षेत्रात कार्यरत होतेय.

  अहमदाबाद : मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL ) ने स्वदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑईल ड्रिलिंग रिग नुकतीच ओएनजीसी कडे सुपूर्द केली. ह्या नवीन ड्रिलिंग रिग मुळे ऑइल आणि गॅसच्या उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखील बचत होते. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळते.

  मेघा इंजिनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणतात मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या योजना यशस्वी करायच्या असतील तर इंधन आयातीचे प्रमाण कमी झाले पाहिजे. MEIL ने या क्षेत्रात आपला वाटा उचलाय. देशांर्तगत तेल उत्पादनात वाढ आणि देशाचे भविष्य अधिक उज्वल करण्यासाठी परकीय चलनात बचत ह्यात महत्वाची भूमिका वठवताना आम्हाला अभिमान वाटतो.

  एमआयआयएलचे मुख्य अधिकारी (तेल उत्पादन रिग्ज डिव्हिजन) एन. कृष्णकुमार यांनी प्रोजेक्टची विस्तृत माहिती दिली आहे, आतापर्यत भारत तेल उत्पादन करणाऱ्या रिग आयात करत होता , परंतु MEIL ने देशार्तग रिग बनवण्याची क्षमता वाढवत नेत तेल आणि गॅस उत्पादन रिग स्वस्त , सोपे आणि सुरक्षित बनवल्या आहेत. हे तंत्रज्ञान आता तेल आणि गॅस उत्खनन अधिक वेगवान बनवते.

  ओएनजीसी कडे सुपुर्द करण्यात आलेली 1500 hp क्षमतेची दुसरी रिग हाइड्रोलिक और सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करत असल्याने ह्या तंत्रज्ञानाच्या फायदा ओएनजीसीला मिळेल. ही रिग ओएनजीसी अहमदाबादेतल्या कलोल जवळ धमासना गावात GGS- IV तेल क्षेत्रात कार्यरत होतेय.

  1500 हॉर्स पॉवरची क्षमता असणारी ड्रिलिंग रिग जमीनीखाली 4000 मीटर (4 किलोमीटर) खोदकाम करु शकते रिग 40 वर्ष बिना तक्रार काम करु शकते आणि महत्वाचे म्हणजे ती दुसरीकडे हलवता देखील येउ शकते. अत्याधुनिक तत्रज्ञानावर आधारित सुरक्षा मानकाची पुर्तता करणारी ही रिग निश्चितच भारताच्या भविष्यकालिन गरजा पूर्ण करणारी आहे.

  MEIL ला 2019 मध्ये ओएनजीसी कडून अशा 47 ड्रिलिंग रिग बनवून देण्याची ऑर्डर मिळाली आणि पुढच्या 35 महिन्याच्या आसपास या सर्व रिग ओएनजीला पुरवण्यात येतील