इंस्टाग्रामने केला भगवान शंकरांचा अपमान; हातात दाखवला वाईनचा ग्लास आणि सोशल मीडियावर झाला राडा

सध्या भारतात सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवरील नियमांवरून वादविवाद सुरु आहे. यातच भाजप नेते मनीष सिंह यांनी सोशल मीडिया ॲप विरोधात दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    नवी दिल्ली : येथे सोशल मीडिया ॲप इंस्टाग्राम विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्याने आरोप लावला आहे की, इंस्टाग्रामने त्यांच्या स्टिकरमध्ये भगवान शंकराचा अपमान केला आहे. भाजप नेत्याच्या या आरोपावर दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

    सध्या भारतात सोशल मीडिया प्लेटफॉर्म्सवरील नियमांवरून वादविवाद सुरु आहे. यातच भाजप नेते मनीष सिंह यांनी सोशल मीडिया ॲप विरोधात दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    मनीष सिंह यांनी याबाबत सांगितले की, इंस्टाग्रामवर महादेवाच्या प्रतिमेचा अपमान केला जात असून त्यांच्या फोटोला चुकीचा पद्धतीने दाखविण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर ‘शिव’ हा शब्द सर्च केल्यास स्टिकरमध्ये महादेवाच्या फोटोसह वाईन आणि दारूचे फोटो दिसून येत आहेत.

    ते पुढे म्हणाले, भगवान शंकराच्या एका हातात वाईनचा ग्लास तर दुसऱ्या हातात मोबाईल दाखविण्यात येत आहे. यामुळे हिंदू धर्मांच्या भावना दुखावल्या आहे.’ असं म्हणत त्यांनी या प्रकरणात त्वरित चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावर या स्टिकरवर नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजप नेत्या प्राची साध्वी यांनी या स्टिकरवर नाराजी व्यक्त करत मनीष सिंह यांच्या ट्विटला सोशल मीडियावर पाठिंबा दिला आहे.

    Instagram insulted Lord Shiva A glass of wine was shown in his hand and goes viral on social media