म्हणून करण्याआधी विचार करा; फेसबुकने तीन कोटींवर तर इन्स्टाग्रामने २० लाखांवर आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या

फेसबुकने नवीन सोशल मीडिया पॉलिसीनुसार १५ मे ते १५ जून दरम्यान या पोस्ट हलविल्याचे अहवालात म्हटले आहे. फेसबुकने आपल्या ट्रान्सपरन्सी प्लॅटफॉर्मवर जारी केलेल्या अंतरिम अहवालानुसार ९५ टक्के आक्षेपार्ह पोस्ट या ऑटोमॅटिकली हटविल्या जात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये फेसबुकने दहा कॅटेगरी केल्या आहेत.

  न्यूयॉर्क : सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकने तब्बल ३०.१ मिलीयन म्हणजे तीन कोटींवर आक्षेपार्ह पोस्ट हटविल्या आहेत. हिंसाचार, लैंगिकता, नग्नपणापासून ते स्वत:ला इजा केलेली दाखविणाऱ्या पोस्टचा यामध्ये समावेश आहे. या युआरएलमध्ये पोस्ट, फेसबुक पेज आणि प्रोफाईलचा समावेश आहे.

  फेसबुकने नवीन सोशल मीडिया पॉलिसीनुसार १५ मे ते १५ जून दरम्यान या पोस्ट हलविल्याचे अहवालात म्हटले आहे. फेसबुकने आपल्या ट्रान्सपरन्सी प्लॅटफॉर्मवर जारी केलेल्या अंतरिम अहवालानुसार ९५ टक्के आक्षेपार्ह पोस्ट या ऑटोमॅटिकली हटविल्या जात असल्याचे म्हटले आहे. यामध्ये फेसबुकने दहा कॅटेगरी केल्या आहेत.

  गुगल, फेसबुकने नेमले भारतीय कायद्यानुसार तक्रार निवारण अधिकारी; ट्विटरचे अद्याप कायदापालन नाही

  विविध तक्रारींवर फेसबुकने केलेल्या कार्यवाहीची माहिती देणारा संपूर्ण अहवाल १५ जुलैपर्यंत प्रसिध्द होणार आहे. हिंसाचार असलेल्या २.५ मिलियन म्हणजे २५ लाख पोस्ट फेसबुकने हटविल्या आहेत. अशा पध्दतीच्या ९९ टक्के पोस्ट या काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्येही फेसबुकने ऑटोमॅटिकली बहुतांश पोस्ट काढल्या आहेत.

  तक्रारी आल्या म्हणून पोस्ट हटविण्याचे प्रमाण केवळ ०.१ टक्के आहे. नग्नता आणि लैंगिकता असलेल्या १.८ मिलीयन म्हणजे १८ लाख पोस्ट हटविल्या आहेत. कंपनीच्या नवीन पॉलिसीनुसार आता या प्रकारच्या पोस्टवर २४ तास लक्ष ठेवण्यात येते. फेसबुकवरून या प्रकारचा कंटेंट असलेल्या ९९.६ टक्के पोस्ट हटविल्या गेल्या आहेत.

  फेसबुकच्या गेल्या तिमाहीतील ट्रान्सपरन्सी रिपोर्टनुसार प्रौढ लैंगिकता असलेल्या ३१.८ मिलीयन पोस्ट हटविल्या गेल्या आहेत. त्यापैकी १.८ मिलियन पोस्ट या भारतातील आहेत. हिंसाचार असलेल्या ३४.३ मिलियन पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील २.५ मिलियन पोस्टचा समावेश आहे.

  धोकादायक दहशतवादी संघटना, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांच्या ७५ हजार पेजवर फेसबुकने कारवाई करत डिलिट केले आहे. दहशतवाद पसरविणाऱ्या १ लाख ६ हजार पोस्ट, पेजेस आणि प्रोफाईलवर फेसबुकने कारवाई केली आहे. ३ लाख ११ हजार द्वेषपूर्ण भाषणेही काढून टाकण्यात आली आहेत.

  फेसबुकचीच कंपनी असलेल्या इन्स्टाग्रामवरून २० लाख ३१ हजार यूआरएल काढून टाकण्यात आल्या आहेत. इन्स्टाग्रामवरून काढण्यात आलेल्या युआरएलमध्ये सर्वाधिक आत्महत्या करत असल्याच्या आणि स्वत:ला इजा करून घेणाऱ्या आहेत. या प्रकारच्या ६ लाख ९९ हजार युआरएल काढण्यात आल्या आहेत. ६ लाख ६८ हजार हिंसाचाराच्या युआरएल आणि ४ लाख ९० हजार लैंगिकतेच्या युआरएलवर कारवाई करण्यात आली आहे.

  फेसबुकचीच आणखी एक कंपनी असलेल्या व्हॉटसअ‍ॅपचा अहवाल मात्र अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही. याचे कारण म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी एकच तक्रार अधिकारी आहेत. व्हॉटसअ‍ॅपसाठी वेगळे अधिकारी नेमण्यात आले आहेत.

  फेसबुकच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना ऑनलाईनवर सुरक्षितपणे वावरता शकते. आक्षेपार्ह युआरएल काढून टाकण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेची मदत घेतली जाते. त्याचबरोबर फेसबुकची टीमही सातत्याने परीक्षण करत असते. फेसबुकच्या धोरणाविरुध्द असलेल्या पोस्ट काढून टाकण्याचे काम ती करते

  instagram over 20 lakh and facebook deleted over 3 crore posts urls nrvb