खुशखबर! लवकरच Whatsapp मध्ये पाहता येणार Instagram Reels व्हिडिओ, फेसबुकने सुरू केली टेस्टिंग

Whatsapp Users साठी खुशखबर आहे. फेसबुक लवकरच व्हॉट्सॲपमध्ये एक डेडिकेटेड इंस्टाग्राम रील्स टॅबची सुविधा देणार आहे आणि याची टेस्टिंगही सुरू झाली आहे. येत्या काळात व्हॉट्सॲपमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्टसह कंप्युटर आणि लॅपटॉपवरही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधाही मिळणार आहे.

    नवी दिल्ली : जगभरातल्या Whatsapp Users साठी एक आनंदाची बातमी आहे की, येत्या काळात व्हॉट्सॲपमध्ये त्यांना एक खास टॅब दिसेल, यावर त्यांना Instagram Reels चे शॉर्ट व्हिडिओही पाहता येणार आहेत. एका अहवालात नमूद केल्याप्रमाणे Facebook ने एक डेडिकेटेड इस्टाग्राम रील्स टॅबची टेस्टिंग सुरू केली आहे आणि येत्या काळात काही डेव्हलपमेंटही होईल, ती कळणारच आहे आणि या वर्षी लोकांना व्हॉट्सॲपमध्ये हे फीचर दिसूही लागेल.

    इंटिग्रेशन वर जोर

    व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम फेसबुकच्या मालकी हक्काची कंपनी आहे आणि अलीकडच्या काही वर्षात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इंटिग्रेशन प्रोसेसवर भर देत आहेत, येथे एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एकमेकांचे चांगले फीचर्स दिसतील आणि यामुळे लोकांमध्ये प्रसिद्धी वाढण्यासोबतच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. व्हॉट्सॲपमध्ये गेल्या काही महिन्यात अनेक फीचर्स नवीन आले आहेत आणि फेसबुकचा असा प्रयत्न आहे की, व्हॉट्सॲपमध्ये एक खास टॅब असायला हवा, ज्यावर युजर्सला इंस्टाग्राम रील्स पाहता येईल. यात रील्स तयार करण्याची सुविधाही देण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या काळात याची विस्तृत माहिती येईलच.

    खूप साऱ्या गोष्टी नवीन येणार आहेत

    WABetaInfo च्या अहवालानुसार, फेसबुक पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहा की, Instagram आणि WhatsApp च्या फीचर्सचे इंटिग्रेशन व्हावे आणि युजर्सला व्हॉट्सॲपमध्येही इंस्टाग्रामच्या खास फीचर्सचाही अनुभव घेता येईल. तथापि, ही प्रक्रिया अद्याप टेस्टिंग फेजमध्येच आहे आणि याबाबत जशी ठोस माहिती मिळेल, ती आम्ही देऊच. येत्या काळात व्हट्सॲपमध्ये अनेक खास फीचर्स येणार आहेत, ज्यात मल्टी डिव्हाइस सपोर्ट, कंप्युटर आणि लॅपटॉपवरही व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधा प्राधान्याने असणार आहेत.