12GB रॅमसह शानदार Vivo Y72 5G भारतात दाखल, मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स

या विवो स्मार्टफोनसोबत कंपनीने अनेक ऑफर्स दिल्या आहेत. विवो वाय72 5जी च्या खरेदीवर बॅंक कॅशबॅक आणि डिस्काउंट सोबतच 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील.

    Vivo ने आज भारतात आपल्या वी सीरिजमध्ये नवीन Vivo Y72 5G लाँच केला आहे. हा 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि Snapdragon 480 चिपसेटसह फक्त 20,990 रुपयांमध्ये बाजारात लाँच करण्यात आला आहे. विवो वाय72 5जी च्या एकमेव 8GB रॅम मॉडेलची किंमत 20,990 रुपये ठेवण्यात आली आहे.

    या विवो स्मार्टफोनसोबत कंपनीने अनेक ऑफर्स दिल्या आहेत. विवो वाय72 5जी च्या खरेदीवर बॅंक कॅशबॅक आणि डिस्काउंट सोबतच 10,000 रुपयांचे Jio benefits देखील मिळतील.  HDFC, ICICI आणि Kotak बँकेच्या कार्डने हा फोन विकत घेतल्यास 1,500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल. तसेच Vivo Y72 5G सोबत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि 10,000 रुपयेचे Jio benefits मिळतील.