तुमचं Facebook अकाउंट सुरक्षित आहे ना? ९ धोकादायक Apps कडून होऊ शकते Facebook पासवर्ड्सची चोरी ; जाणून घ्या

कंपनीकडून रिपोर्ट केल्यानंतर आता हे ९ धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहेत. अशात तुमचा फेसबुक डेटा धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे.तुम्ही यासाठी तुमचे FB अकाऊंटचे पासवर्ड सतत बदलत राहणे आवश्यक आहे.

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर तुमचे अकाऊंट सुरक्षित आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर पुढे दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. नुकतेच डॉक्टर वेब मालवेअर एनालिस्टने १० धोकादायक अ‍ॅपची लिस्ट जारी केली आहे. जे फेसबुक युजर्सचे लॉगइन आणि पासवर्ड चोरी करत होते. १० पैकी ९ अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध होते. सिक्योरिटी अ‍ॅनालिस्टनुसार, हे व्हायरस असणारे अ‍ॅप्स धोकादायक सॉफ्टवेअरच्या रुपात पसरले होते आणि हे अ‍ॅप्स ५,८५६,०१० वेळा इन्स्टॉलही करण्यात आले होते.

    कंपनीकडून रिपोर्ट केल्यानंतर आता हे ९ धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहेत. अशात तुमचा फेसबुक डेटा धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे.तुम्ही यासाठी तुमचे FB अकाऊंटचे पासवर्ड सतत बदलत राहणे आवश्यक आहे. पासवर्ड ठेवताना कठीण पासवर्डचा वापर करा.

    हे महत्वाचे आहे

    तुम्ही ज्या डिव्हाईसमधून फेसबुक लॉगइन केलं आहे, त्या सर्व डिव्हाईसवर लॉगआउट करणं गरजेचं आहे.

    – यासाठी सर्वात आधी Facebook Settings मध्ये जा.

    – Security वर टॅप करुन Login ऑप्शनवर क्लिक करा.

    – Logged in सेक्शनखाली Show More बटणावर क्लिक करा.

    – इथे Logout of all sessions वर क्लिक करा.