आयटेलकडून भारतामध्‍ये स्क्रिन मिररिंग तंत्रज्ञानाने युक्‍त जगातील पहिला नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही ‘A3240IE’ लाँच

आयटेलच्‍या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या एकमेव दृष्टिकोनाशी बांधील असलेला नवीन ३२ इंच २के टेलिव्हिजन आयटेल युजर्सना सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला स्क्रिन मिररिंग तंत्रज्ञानाने युक्‍त जगातील पहिला नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही आहे. तृतीय श्रेणी व त्‍याखालील श्रेणीच्‍या नगरांमध्‍ये राहणा-या महत्त्वाकांक्षी युजर्सवर लक्ष्‍य करत नवीन टीव्‍ही घरगुती मनोरंजन अनुभवामध्‍ये अधिक वाढ करेल आणि भारतीय कुटुंबांसाठी एकतेला जागृत करण्‍याच्‍या ब्रॅण्‍डच्‍या उद्देशाला अधोरेखित करेल.

 • आयटेलA3240IE मध्‍ये उच्‍च दर्जाचे कास्‍ट वैशिष्‍ट्य, जे नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही पहिल्‍यांदाच समाविष्‍ट करण्‍यात आले आहे
 • आयटेल-कास्‍ट वाय-फाय इंटरनेटच्‍या गरजेशिवाय मोबाइल डिवाईसेसमधील व्हिडिओ, फोटो व गेम्‍सचे कास्टिंग थेट टीव्‍हीवर करण्‍याची सुविधा देते

नवी दिल्‍ली : स्‍मार्ट टीव्‍ही विभागामध्‍ये प्रचंड यश मिळाल्‍यानंतर आयटेल या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ब्रॅण्‍डने नुकतीच भारतामध्‍ये ए-सिरीज नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही – A3240IE लाँचसह त्‍यांच्‍या टीव्‍ही उत्‍पादन पोर्टफोलिओच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली.

आयटेलच्‍या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या एकमेव दृष्टिकोनाशी बांधील असलेला नवीन ३२ इंच २के टेलिव्हिजन आयटेल युजर्सना सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला स्क्रिन मिररिंग तंत्रज्ञानाने युक्‍त जगातील पहिला नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही आहे. तृतीय श्रेणी व त्‍याखालील श्रेणीच्‍या नगरांमध्‍ये राहणा-या महत्त्वाकांक्षी युजर्सवर लक्ष्‍य करत नवीन टीव्‍ही घरगुती मनोरंजन अनुभवामध्‍ये अधिक वाढ करेल आणि भारतीय कुटुंबांसाठी एकतेला जागृत करण्‍याच्‍या ब्रॅण्‍डच्‍या उद्देशाला अधोरेखित करेल.

आयटेलच्‍या टीव्‍ही पोर्टफोलिओमधील विस्‍तारीकरणाची घोषणा करत ट्रांसियॉन इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्‍हणाले,”महामारीच्‍या प्रादुर्भावाने पुन्‍हा एकदा मनोरंजनासाठी टेलिव्हिजनचे महत्त्व समोर आणले आहे. विशेषत: कास्टिंग किंवा स्क्रिन मिररिंग वैशिष्‍ट्याच्‍या वापराने मोठ्या आकाराच्‍या टेलिव्हिजन स्क्रिन्‍सवर मोबाइल फोन्‍समधील मनोरंजनाचा आनंद घेण्‍यामधील पोकळी दूर केली आहे, ज्‍यामधून कुटुंबांमधील एकतेचे तत्त्व दिसून येत आहे. या ट्रेण्‍डची पूर्तता करण्‍यासाठी आयटेलने लोकांसाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या एकमेव दृष्टिकोनासह बिल्‍ट-इन आयटेल-कास्‍टने युक्‍त जगातील पहिला नॉन-स्‍मार्ट टीव्‍ही सादर केला आहे. हा टीव्‍ही ग्राहकांना त्‍यांच्‍या सोयीसुविधेनुसार मोठ्या स्क्रिनवर पसंतीचा कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद देऊ शकतो. आयटेल टेलिव्हिजन पोर्टफोलिओला अभूतपूर्व यश मिळाले आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की, नवीन A3240IEटीव्‍ही ब्रॅण्‍डच्‍या यशाच्‍या शिरपेच्‍यामध्‍ये आणखी एक तुऱ्याची भर ठरेल.”आयटेलच्‍या ‘आयटेल है, लाइफ सही है’ तत्त्वाशी बांधील राहत आम्‍हाला विश्‍वास आहे की, हा टीव्‍ही भारताच्‍या तृतीय श्रेणी व त्‍याखालील श्रेणीच्‍या नगरांमधील युजर्सना सक्षम करेल, जे सुपर ब्राइट डिस्‍प्‍ले, फ्रेमलेस प्रि‍मिअम डिझाइन, २० वॅट स्‍पीकर, बिल्‍ट-इन आयटेल कास्‍ट अशा दर्जात्‍मक वैशिष्‍ट्यांसह एकसंधी मनोरंजन अनुभवाचा शोध घेत आहेत.”

A3240IE टीव्‍ही पूर्णत: भारतामध्‍ये उत्‍पादित करण्‍यात आला आहे. या टीव्‍हीमध्‍ये प्रि‍मिअम डिझाइन, सर्वोत्तम साऊंड क्‍वॉलिटी आणि प्रगत कास्टिंग फंक्‍शन आहे, ज्‍यासाठी इंटरनेट कनेक्‍शनची गरज नाही. टीव्‍ही पोर्टफोलिओमधील या नवीन टीव्‍हीचा सुधारित जीवनशैली व सोयीसुविधेचा शोध घेत असलेल्‍या महत्त्वाकांक्षी युजर्सवर लक्ष्‍य आहे. या ३२ इंची टीव्‍हीची किंमत १४३९९ रूपये आहे. सुलभ डेस्‍क इन्‍स्‍टॉलेशनसाठी आयटेलने पहिल्‍यांदाच स्‍नॅपफिट स्‍टॅण्‍ड लॉंच केला आहे, ज्‍यामुळे युजर्स स्‍वत:हून स्‍टॅण्‍ड फिट करू शकतात.

उच्‍च दर्जाच्‍या घरगुती मनोरंजनासाठी प्रि‍मिअम इनोव्‍हेशनच्‍या कल्‍पक वैशिष्‍ट्यांचा अनुभव घ्‍या

आयटेल A3240IE टीव्‍ही भारतीय कुटुंबियांच्‍या घरगुती मनोरंजन अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या टीव्‍हीमध्‍ये एचडी+ पिक्‍चर क्‍वॉलिटी, आकर्षक डिस्‍प्‍ले, स्क्रिन शेअरिंगसाठी आयटेल-कास्‍ट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह आयटेलची तंत्रज्ञान क्षमता आहे.

मल्‍टी-फंक्‍शनल व प्रबळ टीव्‍ही ८० सेमी (३२ इंच) या प्रमाणित आकारामध्‍ये उपलब्‍ध आहे. या टीव्‍हीमध्‍ये अद्वितीय बिल्‍ट-इन आयटेल-कास्‍ट वैशिष्‍ट्य आहे, जे वाय-फाय इंटरनेट नेटवर्कशिवाय मोबाइल, टॅब्‍लेट इत्‍यादींसोबत स्क्रिन शेअरिंग सुविधा देते. या टीव्‍हीमध्‍ये उच्‍च दर्जाची पिक्‍चर क्‍वॉलिटी,तसेच अल्‍ट्रा ब्राइटनेस, एचडी डिस्‍प्‍ले, ए+ ओरिजिनल पॅनेल, जलद पिक्‍सल रिस्‍पॉन्‍स टाइम आणि सर्व कोप-यामधून सुस्‍पष्‍टपणे चित्र दिसण्‍यासाठी वाइड व्‍युइंग अँगल्‍स आहेत. स्‍टायलिश फिनिश व अद्वितीयरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेली फ्रेमलेस प्रि‍मिअम आयडी डिझाइन टेलिव्हिजनच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करते. हा टीव्‍ही कास्‍ट टीव्‍ही एसओसीसाठी डिझाइन करण्‍यात आलेली साधी यूआय डिझाइन आणि सुलभ डेस्‍क इन्‍स्‍टॉलेशनसाठी स्‍नॅपफिट टीव्‍ही स्‍टॅण्‍डसह येतो.

नेक्‍स्‍ट-लेव्‍हल साऊंड अनुभवासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या टीव्‍हीमध्‍ये नवीन २० वॅट स्टिरिओ बॉक्‍स डिझाइनसह आयमरसाऊंड प्रोसेसिंग आहे. ज्‍यामुळे तुम्‍हाला घरामध्‍येच सर्वोत्तम व सिनेमॅटिक साऊंड अनुभव मिळतो. हा टीव्‍ही टेलिव्हिजनच्‍या साऊंड क्‍वॉलिटीला सानुकूल करणा-या आयमरसाऊंड तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम स्टिरिओ सराऊंड साऊंड देतो.

मॉडेल A3240IE

 • टीव्‍ही सिग्‍नल ॲनालॉग टीव्‍ही
 • पॅनल आकार ८० सेमी
 • रिझॉल्‍यूशन १३६६*७६८
 • डिस्‍प्‍ले तंत्रज्ञान डीएलईडी बॅकलाइट
 • व्‍युईंग अँगल १७८º/१७८º
 • ब्राइटनेस (सीडी/मी२) २००
 • कॉन्‍ट्रॅस्‍ट रेशिओ ३०००:१
 • कनेक्टिव्‍हीटी ट्यूनर१/एचडीएमआय२/यूएसबी*२/
 • व्‍हीजीए१/हेडफोन्‍स१/कोॲक्सियल*१
 • वैशिष्‍ट्ये फ्रेमलेस डिझाइन
 • ओव्‍हरव्‍होल्‍टेज प्रोटेक्‍शन
 • स्‍पीकर २*१० वॅट (स्टिरिओ स्‍पीकर)
 • ऊर्जा वापर ४५ वॅट
 • स्‍टॅण्‍डशिवाय आकारमान (लांबीरूंदीउंची) ७७४१०७४८८ मिमी
 • निव्‍वळ वजन (किग्रॅ) ३.७ किग्रॅ
 • एकूण वजन (किग्रॅ) ४.९ किग्रॅ
 • ४०एचक्‍यू २०६७

 

कनेक्टिव्‍हीटीसंदर्भात या टीव्‍हीमध्‍ये बिल्‍ट-इन वाय-फाय, २ एचडीएमआय पोर्टस्, २-यूएसबी पोर्टस्, १ ट्यूनर, १ एव्‍ही, १ व्‍हीजीए, १ हेडफोन जॅक, १ कोॲक्सियल आहे, तसेच ब्‍ल्‍यूटूथ ५.० सपोर्ट देखील कनेक्‍टेड स्‍मार्ट होम अनुभव देते. २के ए-सिरीज टीवहीमध्‍ये इन-बिल्‍ट फ्री स्‍टेबिलायझर आहे, जे विद्युतदाबामधील चढ-उतार, वीजपुरवठा खंडित होणे व वीजेच्‍या वापरामुळे होणा-या नुकसानापासून टीव्‍हीचे संरक्षण करते. या डिवाईसमध्‍ये २ जीबी रॅम आणि ८ जीबी बिल्‍ट-इन स्‍टोरेज आहे. तसेच या टीव्‍हीमध्‍ये गुगल असिस्‍टण्‍ट देखील आहे, ज्‍यामुळे युजर्स पटकन ४००,००० हून अधिक चित्रपट व शोज शोधू शकतात, त्‍यांच्‍या मूडनुसार कन्‍टेन्‍ट मिळवू शकतात, स्‍मार्ट होम डिवाईसेसवर नियंत्रण ठेवू शकतात. या टीव्‍हीमध्‍ये नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ,Zee5, डिस्नी+, हॉटस्‍टार, यूट्यूब इत्‍यादी सारखे ५००० हून अधिक ॲप्‍स आहेत.

आयटेल भारतीय लोकांना किफायतशीर दरामध्‍ये उच्‍च दर्जाचा घरगुती मनोरंजन अनुभव देण्‍यासाठी प्रि‍मिअम व नाविन्‍यपूर्ण टेलिव्हिजन्‍स सादर करत प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. २के टेलिव्हिजन्‍सच्‍या नवीन श्रेणीच्‍या सादरीकरणासह आयटेल आता ग्राहकांच्‍या विविध मागण्‍यांची पूर्तता करते आणि त्‍यांचा घरगुती मनोरंजन अनुभव दररोज उत्तम करण्‍याशी कटिबद्ध आहे. २०२१ ची पहिली तिमाही आणि २०२१ ची दुसरी तिमाहीमधील काऊंटरपॉइण्‍ट अहवालानुसार आयटेलने ६ हजार रुपयाहून कमी किंमतीच्या स्‍मार्टफोन विभागामध्‍ये पहिला क्रमांकाचा स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड म्‍हणून स्‍वत:चे स्‍थान निर्माण करत एण्‍ट्री लेव्‍हल स्‍मार्टफोन विभागात अग्रणी स्‍थान प्राप्‍त केले आहे. ब्रॅण्‍डचे भारतामध्‍ये ८ कोटींहून अधिक ग्राहकांचा प्रचंड समुदाय आहे. अँड्रॉईड टीव्‍ही डिवाईसेसच्‍या सादरीकरणासह आयटेलने भारतासाठी किफायतशीर मनोरंजन सोल्‍यूशन्‍स देण्‍याची कटिबद्धता राखत घरगुती मनोरंजन बाजारपेठेतील स्‍थान प्रबळ केले आहे.

सेवा तत्त्व

आयटेल पॅनेलवर दोन वर्षांची वॉरंटी आणि इतर हार्डवेअरवर एक वर्षाच्‍या वॉरंटीसह फ्री इन्‍स्‍टॉलेशनची सेवा देते, जे क्षेत्रातील सर्वोत्तम ऑफरिंग्‍ज आहेत. आयटेलची नवीन टेलिव्हिजन श्रेणी देशाच्‍या कानाकोप-यापर्यंत असलेल्‍या ७५० हून अधिक सर्विस सेंटर्सच्‍या प्रबळ सेवा नेटवर्कच्‍या पाठबळासह सखोल प्रादेशिक उपस्थिती असलेल्‍या आयटेल स्‍मार्टफोन व्‍यवसायाच्‍या काळानुसार चाचणी करण्‍यात येणा-या गो-टू-मार्केट धोरणाचा वापर करेल. कस्‍टमर केअर क्रमांक: 1800 419 0525| कस्‍टमर केअर ईमेल आयडी: service@carlcare.com.

आयटेल बाबत:

२००७ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेला ट्रान्झिशन होल्डिंग्‍ज एण्‍ट्री लेव्‍हल ब्रॅण्‍ड आयटेल हा सर्वांचा विश्‍वसनीय मोबाइल फोन ब्रॅण्‍ड आहे. ”सर्वोत्तम जीवनाचा आनंद घ्‍या” या ब्रॅण्‍ड तत्त्वाचा अवलंब केलेल्‍या आयटेलचे सर्वांना किफायतशीर मोबाइल कम्‍युनिकेशन्‍स तंत्रज्ञान देण्‍याचे मिशन आहे. ब्रॅण्‍ड ग्राहकांना तंत्रज्ञान व कनेक्टिव्‍हीटी देण्‍यासोबत त्‍यांच्‍या सोशल कनेक्‍शन्‍सच्‍या अधिक जवळ जाण्‍याची सुविधा देत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करतो. १० वर्षांहून अधिक काळाच्‍या विकासानंतर आयटेलने जागतिक स्‍तरावर जवळपास ४० उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये उपस्थिती वाढवली आहे आणि कार्यरत असलेल्‍या क्षेत्रामधील स्‍मार्टफोन्‍स व फिचर फोन्‍स विभागांमध्‍ये अग्रणी स्‍थान स्‍थापित केले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://www.itel-mobile.com/itel/येथे भेट द्या.