मुकेश अंबानींचा यू टर्न, बदलला अचानक निर्णय; आजचे JioPhone लाँचिंग रद्द

JioPhone Next launch delayed : जिओफोन नेक्स्टची ॲडव्हान्स ट्रायल सुरु आहे. या फोनचा रोल आऊट दिवाळीच्या दरम्यान केला जाईल असे जिओने म्हटले आहे.

    मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) चा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन JioPhone Next चे आज होणारे लाँचिंग रद्द करण्यात आले आहे. कंपनीने गणेश चतुर्थी म्हणजेच आज 10 सप्टेंबरला या फोनला लाँच करून धमाका करण्याची योजना आखली होती. आता हा फोन दिवाळीत लाँच केला जाणार आहे. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे.

    दोन्ही कंपन्यांनी जिओफोन नेक्स्टला आणखी सक्षम बनविण्यासाठी काही युजर्सना तो वापरण्यासाठी दिला आहे. हा टप्पा पार पडला की दिवाळीच्या सुरुवातीला हा फोन लाँच केला जाईल (rollout to start before Diwali). या अतिरिक्त काळामुळे सेमीकंडक्टरची टंचाई देखील दूर होईल आणि या काळात अधिक सेमिकंडक्टर साठवता येतील असे कंपनीने म्हटले आहे.

    जिओने म्हटले आहे की जिओफोन नेक्स्टची ॲडव्हान्स ट्रायल सुरु आहे. या फोनचा रोल आऊट दिवाळीच्या दरम्यान केला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या वर्षीच्या सुरुवातीला सांगितले होते की, जिओ आणि गुगलद्वारे हा फोन विकसित केला जात आहे. हा फोन 10 सप्टेंबरला उपलब्ध केला जाईल. परंतु आज लाँचिंगच्या दिवशी कंपनीने इच्छुक ग्राहकांना धक्का दिला आहे.