know about these 6 fake websites do not click on this link alert by PIB

देशभरात वाढणारा ऑनलाइन फ्रॉडचा धोका लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइट्सची यादी जाहीर केली आहे. तुम्ही देखील या वेबसाइट वापरत असाल तर सावधान रहाणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली : देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud) ची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाइटचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची दाट शक्यता आहे.

एकीकडे ऑनलाइन नेटवर्कमुळे अनेक कामं चुटकीसरशी होत आहेत तर दुसरीकडे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पीआयबी (PIB) आणि सरकारी तसंच खाजगी बँकांकडून वेळोवेळी या ऑनलाइन फसवणुकीबाबत सावध करण्यात येत आहे. ग्राहकांनी या अलर्टकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

PIB ने जारी केली ६ वेबसाइटची यादी

पीआयबीने सहा वेबसाइटची यादी जारी केली आहे. या वेबसाइटपासून युजर्सनी दूर राहणेच त्यांच्या हिताचे आहे. तुम्ही या वेबसाइटवर व्हिजीट केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तुमच्या आयुष्यभराची कमाई देखील गायब होऊ शकते.
यामध्ये फ्री स्कॉलरशीप किंवा फ्री लॅपटॉमचे आमिष दाखवणाऱ्या वेबसाइट्सचाही समावेश आहे. ही आहे या वेबसाइट्सची यादी-

>> http://centralexcisegov.in/aboutus.php

>> https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/

>> https://kusmyojna.in/landing/

>> https://www.kvms.org.in/

>> https://www.sajks.com/about-us.php

> https://register-form-free-tablet.blogspot.com/

नेमकं काय करतं पीआयबी ?

भ्रामक किंवा फसवणूक करणाऱ्या बातम्यांबाबत पीआयबीकडून सामान्य जनतेला जागरुक केलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबतही फॅक्ट चेक करण्याचं काम PIB कडून करण्यात येतं. कोरोना काळात सर्वाधिक प्रमाणात चुकीच्या बातम्या, बनावट मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. याबाबत सामान्यांना माहिती असेलच असं नाही, अशावेळी सरकारची प्रेस इन्फरमेशन ब्युरो वेळोवेळी बनावट आणि भ्रामक बातम्यांबाबत अलर्ट करण्याचे काम करत असते. सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तुम्हाला एखादा मेसेज आल्यास असं करा फॅक्ट चेक

PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.