Apple AirPods सारख्या डिजाईनसह Redmi Buds 3 लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स आणि किंमत?

कॉलिंगच्या वेळी नॉइज कमी करण्यासाठी Redmi Buds 3 ड्युअल मायक्रोफोन Qualcomm's cVc टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहेत. तसेच क्लीयर व्हॉईस कॅप्चर (cVc) आणि अ‍ॅम्बिएन्ट साऊंड कमी करण्यासाठी नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी दिली आहे.

    Xiaomiने नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स Redmi Buds 3 लाँच केले आहेत. हे इयरबड्स Apple AirPods प्रमाणे सेमी इन इयर स्टायल डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीने यामध्ये Qualcomm प्रोसेसर दिला आहे. Redmi Buds 3 मध्ये शाओमीने 12mm चा मोठा ड्रायव्हर दिला आहे. तसेच यात Qualcomm QC3040 SoC मिळते.

    जाणून घ्या काय आहेत फिचर्स आणि किंमत?

    कॉलिंगच्या वेळी नॉइज कमी करण्यासाठी Redmi Buds 3 ड्युअल मायक्रोफोन Qualcomm’s cVc टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहेत. तसेच क्लीयर व्हॉईस कॅप्चर (cVc) आणि अ‍ॅम्बिएन्ट साऊंड कमी करण्यासाठी नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी दिली आहे. या इयरबड्समध्ये Qualcomm aptX Adaptive ऑडियो डिकोडिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी युजर्सना ब्लूटूथ द्वारे एचडी साउंड अनुभवण्यास मदत करते.

    Redmi Buds 3 इयरबड्स सिंगल चार्जमध्ये सुमारे ५ तास वापरता येतात. परंतु चार्जिंग केसच्या मदतीने ही बॅटरी लाइफ २० तासांवर जाऊ शकते. Redmi Buds 3 चीनमध्ये 199 RMB सुमारे २३०० रुपयेमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे इयरबड्स सध्या चीनमध्ये क्राउडफंडिंगच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यांची इंट्रोडक्टरी किंमत 159 RMB म्हणजेच सुमारे १८०० रुपये इतकी आहे.