लाँचपूर्वीच शानदार Nokia G50 झाला रिटेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या

यूके रिटेलरच्या वेबसाईटवर नोकिया जी50 चा स्लॉट पेज बनवण्यात आला आहे. या पेजवर फोनचा कोणताही फोटो किंवा स्पेसिफिकेशन्स उपलब्ध झाले नाहीत, परंतु प्रोडक्ट पेज स्लॉट बुक झाल्यामुळे या फोनचे नाव Nokia G50 असल्याचे समजले आहे.

    गेल्या काही दिवसांत Nokia खूप सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कंपनीने अलीकडेच भारतात Nokia G20 स्मार्टफोन लाँच केला होता. येत्या 27 जुलैला देखील कंपनी नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, याची माहिती कंपनीने सोशल मीडियावरून दिली आहे. पोस्टरवरून हा स्मार्टफोन रगेड श्रेणीत लाँच केला जाऊ शकतो.

    यूके रिटेलरच्या वेबसाईटवर नोकिया जी50 चा स्लॉट पेज बनवण्यात आला आहे. या पेजवर फोनचा कोणताही फोटो किंवा स्पेसिफिकेशन्स उपलब्ध झाले नाहीत, परंतु प्रोडक्ट पेज स्लॉट बुक झाल्यामुळे या फोनचे नाव Nokia G50 असल्याचे समजले आहे.

    एका या वेबसाइटवर आगामी Nokia G50 5G स्मार्टफोन टॅक्ससह 217.52 GBP (सुमारे 22,100 रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे MoreComputers ने आपल्या वेबसाइटवर नोकियाचा हा स्मार्टफोन 207.56 GBP (सुमारे 21,100 रुपये) मध्ये लिस्ट केला आहे.