कागदाप्रमाणे रोल होणारा टीव्ही Rollable TV झालाय लाँच; वाचा किती आहे किंमत आणि फीचर्स

परफॉर्मन्सबाबत हा टीव्ही उत्तम असल्याचं म्हणता येणार नाही. रोलिंगची जी सुविधा कंपनीने दिली आहे, त्यामुळेच या टीव्हीची किंमत अधिक आहे. हे वैशिष्ट्य मात्र अद्याप इतर कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेलं नाही. एलजीच्या या रोलेबल टीव्हीमध्ये एलजीच्या ओएलईडी लाइनअपमधील सर्वोत्तम पिक्चर क्वालिटीही (Picture Quality) मिळत नाही.

  नवी दिल्ली : आपल्याला बहुतेकवेळा टीव्हीची चिंता असते की काहीतरी लागून तो पडेल, किंवा लहान मुलं खेळताना काही आपटल्याने तो कुठल्यातरी दिशेनं वाकेल अशी भीती असते. पण जर तुम्हाला असा टीव्ही मिळाला जो बटण दाबल्यावर बॉक्समधून रोलआउट (Roll out) होईल आणि बटण दाबल्यावर पुन्हा बॉक्समध्ये जाईल तर? आता ही केवळ शक्यता राहिलेली नसून असा टीव्ही खरोखरच लाँच झाला आहे. एलजी कंपनीने असा रोलेबल टीव्ही (LG Rollable TV) आणला आहे. LG Rollable OLED TV R हा कंपनीच्या आय ग्रॅबिंग तंत्रज्ञानातून तयार झाला आहे. हे तंत्रज्ञान सीईएस 2018 मध्ये सादर करण्यात आलं होतं. आता या तंत्रज्ञानावर आधारित हा टीव्ही ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

  LG Rollable OLED TV R ची किंमत आहे 100,000 डॉलर (जवळपास 74,50,000 रुपये) आहे. इतक्या महागड्या 74 लाख रुपयांच्या टीव्हीमध्ये काय फीचर्स मिळतील?, जाणून घ्या…

  कसा आहे परफॉर्मन्स?

  परफॉर्मन्सबाबत हा टीव्ही उत्तम असल्याचं म्हणता येणार नाही. रोलिंगची जी सुविधा कंपनीने दिली आहे, त्यामुळेच या टीव्हीची किंमत अधिक आहे. हे वैशिष्ट्य मात्र अद्याप इतर कंपन्यांनी उपलब्ध करून दिलेलं नाही. एलजीच्या या रोलेबल टीव्हीमध्ये एलजीच्या ओएलईडी लाइनअपमधील सर्वोत्तम पिक्चर क्वालिटीही (Picture Quality) मिळत नाही. LG Rollable OLED TV R हा 2020 पासून एलजी कंपनीने सादर केलेल्या महागड्या ओएलईडी टीव्हींसारखाच परफॉर्म करतो.

  महागडे फीचर्स

  OLED R मध्ये HDMI 2.1, 4K रिझोल्युशनला 120Hz रिफ्रेश रेट, HDR स्टँडर्ड सपोर्ट Dolby Vision अशी महागडी फीचर्स मिळतात. व्हेरिएबल रिफ्रेश रेट, Amazon Alexa/ Google Assistant सपोर्ट आणि Dolby Atmos ऑडियो हे फीचर्सही यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे नक्कीच वापरणाऱ्याला हायएंड एक्स्पिरियन्स अनुभवता येईल.

  LG Rollable OLED TV R मध्ये लाइन व्ह्यू हा एक मोड आहे, ज्यात स्क्रीनचा एक भाग त्याच्या तळातूनवर येतो आणि काही माहिती देतो. यात मीडिया प्लेबॅक, एक फोटो व्हिजेट, एक घड्याळ आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे.

  50 हजार वेळा रोल केला, तरी खराब होणार नाही

  साधारणपणे कुठल्याही वस्तुमध्ये मूव्हिंग पार्ट (Moving Part) असला की ती वस्तू लवकर खराब होईल असा समज असतो. जर फ्लिप होणारा स्मार्टफोन विकत घेतला, तर लवकर खराब होईल अशी भीती कायमच राहते. पण एलजीच्या रोलेबल ओएलईडी टीव्हीबाबत तसं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. हा टीव्ही तुम्ही 50 हजार वेळा रोल केलात तरीही तो खराब होणारा नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.