पेटीएम मनीमध्‍ये गुंतवणुकीसाठी महाराष्‍ट्र अव्‍वल राज्‍यांपैकी एक

महाराष्‍ट्रातील पुरूष गुंतवणूकदारांच्‍या तुलनेत महिला गुंतवणूकदारांनी ६८ टक्‍के अधिक पैशांची गुंतवणूक केली. महाराष्‍ट्राने गेल्‍या वर्षी पेटीएम मनीवरील एकूण गुंतवणूकांमध्‍ये १८ टक्‍के योगदान दिले आहे. तसेच महाराष्‍ट्रातील ७५ टक्‍के पेटीएम मनी युजर्सचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे.

  • मालमत्ता उत्‍पादनांत गुंतवणूक करणाऱ्या अव्‍वल शहरांमध्‍ये मुंबई, पुणे व नागपूरचा समावेश

मुंबई : भारताचे स्‍वदेशी डिजिटल आर्थिक सेवा प्रदाता व्‍यासपीठ पेटीएमची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम मनीने तिचा वार्षिक अहवाल सादर केला. हा अहवाल व्‍यासपीठावरील युजर्सनी २०२० मध्‍ये केलेल्‍या गुंतवणूक पद्धतींबाबत माहिती निदर्शनास आणतो. महाराष्‍ट्र हे पेटीएम मनीच्‍या एकूण विकासामध्‍ये सर्वाधिक योगदान देणारे राज्‍य ठरले, तसेच राज्‍यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व नाशिक ही गेल्‍या वर्षात अधिक मालमत्ता गुंतवणूक करणारी अव्‍वल शहरे ठरली.

महाराष्‍ट्रातील युजर्सनी व्‍यासपीठावरील डायरेक्‍ट म्‍युच्‍युअल फंड्स, स्‍टॉक्‍स, आयपीओ, एफॲण्‍डओ, ईटीएफ, एनपीएस आणि डिजिटल गोल्‍ड अशा गुंतवणूक उत्‍पादनांमध्‍ये सरासरी ९५,००० रूपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. अहवालानुसार महाराष्‍ट्रातील पुरूष गुंतवणूकदारांच्‍या तुलनेत महिला गुंतवणूकदारांनी ६८ टक्‍के अधिक पैशांची गुंतवणूक केली. महाराष्‍ट्राने गेल्‍या वर्षी पेटीएम मनीवरील एकूण गुंतवणूकांमध्‍ये १८ टक्‍के योगदान दिले आहे. तसेच महाराष्‍ट्रातील ७५ टक्‍के पेटीएम मनी युजर्सचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे.

महाराष्‍ट्रातील युजर्सनी इक्विटीजमध्‍ये सरासरी ७०,००० रूपयांहून अधिक रक्‍कमेची गुंतवणूक केली. राज्‍यामधून आयपीओंमधील गुंतवणूका सर्वाधिक राहिल्‍या, जेथे महाराष्‍ट्रातील ३२ टक्‍के युजर्सनी आयपीओंसाठी अर्ज केला. अव्‍वल ३ आयपीओ ठरले – रेल्‍वे फायनान्‍स कॉर्पोरेशन लि., एमटीएआर टेक्‍नोलॉजीज लिमिटेड आणि इंडिगो पेण्‍ट्स.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले, ”महाराष्‍ट्र हे पेटीएम मनीसाठी अव्‍वल प्रदेशांपैकी एक आहे. या राज्‍यामध्‍ये म्‍युच्‍युअल फंडांपासून ईटीएफ व आयपीओ अर्जांपर्यंत आमच्‍या सेवांचा अधिक प्रमाणात अवलंब होताना दिसण्‍यात आला आहे. आम्‍ही आशा करतो की, या सेवा महाराष्‍ट्रातील युजर्सना सक्षम करत राहतील.”

maharashtra is one of the top states for investing in paytm money