मुलासोबत आईनेच केला अश्लील डान्स; महिला आयोगाने दिले कारवाईचे आदेश

महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना नोटीस पाठवली असून, संबंधित महिलेविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. छोट्या वयाच्या आपल्या मुलाला महिलांचं वस्तुकरण करण्याचं शिक्षण या प्रकारातून दिलं जात असून, ते त्याची आईच देत आहे, ही त्याहून जास्त दुर्देवी गोष्ट आहे, असं महिला आयोगाचं म्हणणं आहे.

  नवी दिल्ली : सोशल मीडिया (social media) हा आजच्या युगात नागरिकांच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. त्यावर लोकप्रियता मिळवण्यासाठी नागरिक काहीही करू शकतात, याची प्रचिती येत असते. अलीकडेच दिल्लीतल्या (delhi) एका महिलेने तर यासाठी आई-मुलाच्या पवित्र नात्यालाही काळिमा फासून निर्लज्जपणाचा कळस केला आहे. आपल्या १०-१२ वर्षांच्या मुलासोबत अश्लील डान्स आणि अभिनयाचे चाळे करणारा व्हिडिओ संबंधित महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि दिल्लीच्या महिला आयोगाने (Delhi Commission for Women) त्याची दखल घेतली.

  महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना नोटीस पाठवली असून, संबंधित महिलेविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. छोट्या वयाच्या आपल्या मुलाला महिलांचं वस्तुकरण करण्याचं शिक्षण या प्रकारातून दिलं जात असून, ते त्याची आईच देत आहे, ही त्याहून जास्त दुर्देवी गोष्ट आहे, असं महिला आयोगाचं म्हणणं आहे.

  अशा प्रकारचा व्हिडिओ (Video) तयार करून मुलाला वाईट शिकवण दिली जात आहे. आई-मुलाच्या पवित्र नात्यालाही यातून कलंक लागला आहे. आईकडूनच अशी शिकवण मिळालेला मुलगा पुढे जाऊन मुलींबद्दल कशा प्रकारचे विचार करील, याची कल्पनाच केलेली बरी. तसंच, या मुलाच्या मनामध्ये पुढे जाऊन अपराधी भावनाही तयार होऊ शकते, असं महिला आयोगाचं म्हणणं आहे.

  हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोड करण्यात आला होता. त्यात आपल्या छोट्या मुलासोबत आई अश्लील डान्स (Sexy Dance) आणि अभिनय करताना दिसत आहे. संबंधित महिलेचे इन्स्टाग्रामवर तब्बल एक लाख 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्यानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.

  दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवून आदेश दिले आहेत, की संबंधित महिलेविरोधात शक्य तितकी कडक कारवाई केली जावी. तसंच संबंधित मुलाचं समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याबद्दलही पोलिसांना सांगण्यात आलं आहे. चांगलं काय आणि वाईट काय, यातला फरक मुलाला कळला पाहिजे. यासाठी त्याचं समुपदेशन (Councilling) करण्याची गरज आहे.

  दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल (Swati Maliwal) यांनी सांगितलं, ‘की सोशल मीडिया (Social Media) आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो; मात्र त्यावर लोकप्रिय होण्यासाठी नागरिक कधी कधी मर्यादांचं उल्लंघन करतात. १०-१२ वर्षांच्या आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्याची गरज असताना इथे संबंधित मुलाची आईच त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओचं शुटिंग करत आहे. ही लाजिरवाणी आणि गंभीर गोष्ट आहे.’

  या संदर्भात आपण दिल्ली पोलिसांना एक नोटीस दिली असल्याचंही स्वाती मालिवाल यांनी सांगितलं. ‘महिला आयोग महिलांसाठीच काम करतो; मात्र याचा अर्थ असा नाही, की महिलांनी वाईट कृत्य केलं तरी त्यांना पाठिंबाच दिला जाईल, असंही स्वाती मालिवाल यांनी स्पष्ट केलं. संबंधित महिलेचे अशा प्रकारचे सारे व्हिडिओ सोशल मीडियावर लवकरात लवकर डिलीट केले जावेत’, असंही पोलिसांना सांगण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.

  mother obscene dance with child instagram reels order of action from the womens commission