Moto G100 स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, किंमत किती माहितीये?

91 मोबाइलच्या रिपोर्टनुसार, Moto G100 स्मार्टफोन Moto G100 मॉडेल नंबरसह Spanish रिटेल स्टोरवर पाहण्यात आला आहे. लिस्टिंगबाबत सांगायचं झालं तर स्मार्टफोन 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरियंटसह लाँच होईल. तर हा स्मार्टफोन 479.77 युरो म्हणजेच जवळपास 41,600 रुपयांना सादर करण्यात येईल.

    स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Moto लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच (Moto New Smartphone Launch) करण्याच्या तयारीत आहे. कंपनी (Company) चा हा नवीन स्मार्टफोन Moto G100 स्मार्टफोन आहे. जो 25 मार्च (25 March) ला सादर करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनबाबत आतापर्यंत अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. यामध्ये याच्या फीचर्स(Features)ची माहिती मिळते. तथापि, कंपनीच्या वतीने अद्याप या स्मार्टफोनची किंमत (Price) आणि फीचरविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

    91 मोबाइलच्या रिपोर्टनुसार, Moto G100 स्मार्टफोन Moto G100 मॉडेल नंबरसह Spanish रिटेल स्टोरवर पाहण्यात आला आहे. लिस्टिंगबाबत सांगायचं झालं तर स्मार्टफोन 8GB रॅम+128GB स्टोरेज वेरियंटसह लाँच होईल. तर हा स्मार्टफोन 479.77 युरो म्हणजेच जवळपास 41,600 रुपयांना सादर करण्यात येईल.

    मीडिया रिपोर्टसच्या मते Moto G100 स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा एफएचडी प्लस आयपीएस एलसीडी पॅनल देण्यात येईल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात येईल. तर फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोन मध्ये क्वाड कॅमरा सेटअप देण्यात येईल. याचा 64MP चा प्रायमरी सेंसर, 16MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP मॅक्रो लेन्स असेल. तर सेल्फी और व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल कॅमरा देण्यात येईल अशी आशा आहे.