चालताना आणि वाहन चालवितानासुद्धा करा नेट सर्फिंग; टेक्नॉलॉजिने विकसित केला ‘तिसरा डोळा’

या डिव्हाईसला द थर्ड आय असे नाव देण्यात आले आहे. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट अँड इंपिरियल कॉलेजमधील तांत्रिक डिझाईनच्या एमएचा विद्यार्थी वूकने सेऊलनजीक या डिव्हाईसचे परीक्षण केले आहे.

    सध्याचे युग स्मार्टफोनचे आहे. स्मार्टफोनविना जगणे हे आता काल्पनिक ठरू लागले आहे. काही लोक आपला स्मार्टफोन पाहण्यात इतके गर्क असतात की चालत असतील तर यामुळे एखाद्या गोष्टीला आपण धडकू याचे भानही त्यांना राहत नाही. काही लोक प्रवास वाहन चालवत असतानाही त्यांचे बहुतांश लक्ष स्मार्टफोनमध्ये असते. हे धोकादायक असले तरी सत्य आहे.

    अनेकदा घरात किंवा रस्त्यावर अशा प्रकारे फोन वापरल्याने अपघाताचा सामना करावा लागतो. मात्र आता अशा अपघातांपासून दूर राहता येणार आहे. कारण यासाठी चक्क तिसऱ्या डोळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. दक्षिण कोरियातील एका व्यक्तीने द थर्ड आय नामक डिव्हाईसची निर्मिती केली आहे. तुम्हाला प्रवास करताना किंवा चालताना सतत स्मार्टफोन पाहायची सवय असेल आणि तुम्ही या डिव्हाईसचा वापर सुरू केला तर हे डिव्हाईस तुम्हाला पुढील अडथळा किंवा धोक्याची पूर्वसूचना देणार आहे. 28 वर्षीय डिझाईनर पेंग मिन-वूकने एक रोबोटिक डोळा तयार केला आहे. हा डोळा कपाळावर लावून कोणतीही व्यक्ती स्मार्टफोनचा स्क्रिन बघत रस्त्यावरून प्रवास करू शकतो. हा रोबोटिक डोळा कोणत्याही व्यक्तीच्या कपाळावर बांधता येतो.

    यामुळे समोर न बघता ही व्यक्ती सुरक्षितपणे चालू शकतो. या डिव्हाईसला द थर्ड आय असे नाव देण्यात आले आहे. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट अँड इंपिरियल कॉलेजमधील तांत्रिक डिझाईनच्या एमएचा विद्यार्थी वूकने सेऊलनजीक या डिव्हाईसचे परीक्षण केले आहे. याबाबत वूक याने सांगितले की, या डिव्हाईसची निर्मिती अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी केली आहे की त्यांना आपल्याला गॅजेटसची लागलेली सवय गांभीर्यपूर्वक ओळखता यावी आणि त्यांनी स्वतः ही सवय सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

    द थर्ड आय नावाच्या या गॅझेटविषयी वूकने सांगितले की जेव्हा युजर फोन पाहू लागेल तेव्हा त्याचे डोके खाली झुकलेले असेल त्याचवेळी हा तिसरा डोळा आपले काम सुरू करेल. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा मोठा अडथळा हे डिव्हाईस लावून चालत असलेल्या व्यक्तीच्या 1 ते 2 मीटर जवळपास असेल तेव्हा डिव्हाईस बीप वाजवून धोक्याची सूचना देईल.