मातांच्या मनात आता पूर्वग्रह नाही : ५० टक्के मातांनी दिली डेटिंग ॲप्सला पसंती; मुंबईतील तरुण स्त्री पुरुषांच्या ८०% माता प्रेमविवाहाच्या बाजूने

देशभरातील ५००० तरुण स्त्री-पुरुषांच्या एका सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे की मिलेनियल (मध्यमवयीन: २४ ते ४० वयातील) आणि जनरेशन झेड (१८ ते २४ वयोगट)या दोन्ही वयातील तरुणाईच्या ५०% भारतीय मातांनी बदलाचे वारे कवटाळले आहेत आणि डेटिंग ॲप्सवर स्वतःसाठीचा जोडीदार शोधायच्या आपल्या मुलांच्या प्रयत्नांना आपलेसे केले आहे.

  मुंबई : लग्नाच्या (marriage) वयातील बहुतांश भारतीय तरुण पिढी त्यांच्या आईने हजारदा केलेल्या ‘स्थळ बघायचे का’ या विनवण्या धुडकावून लावत असते. भावी जोडीदाराचे (future partner) अगणित व्हॉटस्अप फोटो आणि मग त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी घडवून आणलेल्या सरप्राईज भेटी ही ‘लग्नं जमवून देणाऱ्या’ काकूंची गोष्ट तर अगदी स्वाभाविकपणे घडत असते.

  असे असले तरी, देशभरातील ५००० तरुण स्त्री-पुरुषांच्या एका सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे की मिलेनियल (मध्यमवयीन: २४ ते ४० वयातील) आणि जनरेशन झेड (१८ ते २४ वयोगट)या दोन्ही वयातील तरुणाईच्या ५०% भारतीय मातांनी बदलाचे वारे कवटाळले आहेत आणि डेटिंग ॲप्सवर स्वतःसाठीचा जोडीदार शोधायच्या आपल्या मुलांच्या प्रयत्नांना आपलेसे केले आहे.

  भारतात (India) डेटिंग (Dating) या संकल्पनेबद्दल (Concept) सध्याच्या काळात असलेले समज-गैरसमज शोधून काढण्यासाठी ट्रूली मॅडली (TrulyMadly) तर्फे हे सर्वेक्षण (survey) करण्यात आले. या सर्वेक्षणातून आणखी एक बाब पुढे आली ती म्हणजे ८० टक्के मुंबईतील मातांनी आपल्या मुलांनी प्रेमविवाह (love marriage) करायला पाठिंबा दर्शविला आहे.

  काही महत्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे:

  • प्रतिसादकांपैकी ४५ टक्क्यांहून अधिक जणांनी असे मत व्यक्त केले की त्यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांच्या आयांना जास्त काळजी वाटते. स्त्री-पुरुष दोन्ही प्रतिसादकांसाठी हे सत्य आहे.
  • टायर १ आणि टायर २ शहरांतील जवळपास ७० टक्के स्त्री आणि ८० टक्के पुरुष प्रतिसादकांनी त्यांच्या मातांची प्रेमविवाहाला पसंती असल्याचे सुतोवाच केले आहे. मध्यमवयीन स्त्रिया जेव्हा शिक्षण आणि करियर यांच्यावर भर देताना लग्नाचा विषय मागे ठेवतात तेव्हा एक वेळ येते की आता ‘स्थिरस्थावर’ व्हायचे असते. तेव्हा पर्यायातील मोठी स्वीकाराहर्ता यातून सूचित होते.
  • मिलेनियल्स आणि जनरेशन झेडच्या मातांना आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी डेटिंग ॲप्सचा वापर करण्याबद्दलही आत्मविश्वास असल्याचे ५० टक्के प्रतिसादकांनी सांगितले. २० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसादकांनी त्यांच्या आयांना डेटिंग ॲप्सबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले आणि केवळ ७ टक्के प्रतिसादकांनी आपल्या मातांची डेटिंग ॲप्सला पसंती नसल्याचे सांगितले.
  • जयपूर, इंदौर, लखनौ सारख्या नॉन मेट्रो शहरांतील माता आपल्या मुलीच्या पसंतीला प्राधान्य देतात तर ५५ टक्के प्रतिसादकांनी असे सांगितले की पुरुषांवर लग्नासाठी जास्त दबाब टाकला जातो. मुंबई, दिल्ली, बंगळूरू आणि कोलकाता सारख्या महानगरांमध्ये अधिक स्त्रिया काम करत असल्यामुळे ५३ टक्के प्रतिसादकांनी आया मुलींवर जास्त दबाव टाकत असल्याचे सांगितले.
  • आपल्या मुलींनी करियर आणि अभ्यास यांच्यापेक्षा लग्नाला प्राधान्य द्यावे असे मातांना वाटत असल्याचे ६० टक्के प्रतिसादकांनी सांगितले तर मुलांच्या बाबतीत हेच प्रमाण ४६ टक्के आहे. ५४ टक्के प्रतिसादकांना असे वाटते की आयांना त्यांच्या मुलांच्या करियर आणि शिक्षण यांची जास्त काळजी वाटते.
  • सुरक्षा, वय आणि समाज या तीन गोष्टीभोवतीच आया विवाहाची चर्चा करत असतात- ‘आम्ही काय आज आहोत, उद्या नसू,’ (आता आम्ही तुमची काळजी घेत आहोत. आमच्यानंतर तुमची काळजी कोण घेणार?) ‘नंतर कोणी मिळणार नाही’ आणि ‘लोकं काय म्हणतील’ असे मुख्य प्रश्न असतात.
  • सध्याच्या काळानुसार मातांनी नवीन बदल स्वीकारलेले असले तरी २२ टक्के प्रतिसादकांनी डेटिंग ॲप्सबद्दल चर्चा करायला विरोध दर्शविला. याला अनुमोदन मिळेल का याविषयी तरुणाईच्या मनात असणारी भीती यातून सूचित होते.

  ट्रूली मॅडलीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहिल खानोर म्हणाले, “डेटिंग संकल्पनेबद्दल भारतात पूर्वग्रह, गैरसमजुती, भीती आहे का हे समजून घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. पण केवळ तरुणाईच नाही तर त्यांच्या पालकांनीही बदलाचे वारे स्वीकारले असल्याचे पाहून, मानसिकतेत झालेला संपूर्ण बदल पाहून थक्क झालो. महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष भेद कमी करणे आणि लिंगभेदावर आधारित गोष्टींच्या विरुद्ध आवाज उठविणे याबाबत आपल्या समाजात अखंड सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा परिपाक आहे असे माझे ठाम मत आहे. जोडीला चित्रपट आणि सोशल मिडिया यांमधून स्वतंत्र, मुक्त विचारसरणीचा वापर जास्त होत आहे. त्यातूनही आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेऊन अनुरूपतेला प्राधान्य दिले जात आहे. या निष्कर्षातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की माता ज्या कायम जुन्या सामाजिक रूढी, बंधनात अडकलेल्या असतात असे मानले जाते त्यांनी खूप झटपट हे नवे वारे स्वीकारले आहेत. विवाहविषयक निर्णय प्रक्रियेत आयांची भूमिका लक्षात घेता जी तरुण पिढी विवाह संस्थेविषयी वंचित भूमिका घेताना दिसायची ते आता आगामी वर्षात या गोष्टीकडे सक्रीयपणे बघायला लागतील. सातत्यपूर्ण तांत्रिक नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून चांगले, दृढ मानवी नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षीत, विश्वासार्ह आणि सामावून घेणारे डेटिंग व्यासपीठ उभारण्याच्या प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल आम्हांला आनंद आहे.”

  आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी मदत करणारे भारतातील सर्वाधिक पसंतीचे डेटिंग ॲप असल्यामुळे ट्रूली मॅडली मिलेनियल्स आणि तरुण पिढीला निर्णय प्रक्रिया, विवाह, नातेसंबधांबद्दलचे प्रश्न अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत सक्षम करत आहे. ट्रूली मॅडलीने मिलेनियल्स साठी त्यांच्या कडून आणि त्यांच्या साठीच काहीतरी ठोस, प्रामाणिक शोध घेताना सर्वसाधारण डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनी वेबसाईट यांच्यामधील दरी भरून काढली आहे.