आता डेबिट कार्ड वापरण्याची गरज नाही, ‘ही’ गोष्ट वापरुनही ATM मधून काढता येणार पैसे

एटीएम तयार करणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) युपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल सोल्युशन (ICCW) लाँच केलं आहे.

    नवी दिल्ली : आता विना डेबिट कार्डही एटीएममधून (ATM) पैसे काढता येणार आहेत. एटीएम बनवणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने (NCR Corporation) युपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉवल सोल्युशन (ICCW) लाँच केलं आहे. या माध्यमातून युपीआय अ‍ॅपद्वारे (UPI App) क्यूआर कोड स्कॅन करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

    या खास सुविधेसह एटीएम इंस्टॉल करण्यासाठी सिटी युनियन बँकने एनसीआर कॉर्पोरेशनसह काम करण्याचं सांगितलं आहे. बँकेने आतापर्यंत 1500 हून अधिक एटीएमला या सुविधेशी अपग्रेड केलं आहे.

    असे काढता येतील पैसे

    • सर्वात आधी स्मार्टफोनवर कोणतंही युपीआय अ‍ॅप्लिकेशन ओपन करावं लागेल.
    • त्यानंतर एटीएम स्क्रिनवर असलेला QR code स्कॅन करा.
    • आता फोनवर हवी ती रक्कम टाका. सध्या या सुविधेद्वारे एका वेळी अधिकाधिक 5 हजार रुपये काढता येऊ शकतात.
    • आता Proceed बटणावर क्लिक करुन कन्फर्म करा.
    • त्यानंतर 4 किंवा 6 अंकी युपीआय पीन नंबर एंटर करा.
    • या प्रोसेसनंतर कॅश एटीएममधून मिळवता येईल.

    काय आहे युपीआय

    युनिफाईड पेमेंट इंटरफेस/युपीआय (Unified Payments Interface) एक रियल टाईम पेमेंट सिस्टम आहे, जे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतं. युपीआयच्या माध्यमातून युजर्स एका बँक अकाउंटला अनेक युपीआय अ‍ॅपशी लिंक करु शकतात. तसंच अनेक बँक अकाउंटही एका युपीआय अ‍ॅपद्वारे ऑपरेट करता येतात.