नोकियाने लाँच केले दोन नवीन 4G फिचर फोन ; जियोफोनला देतील का टक्कर?

या दोन्ही फोन्समध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन्स 128MB रॅम आणि 48MB स्टोरेजसह सादर करण्यात आले आहेत. हि स्टोरेज 32GB पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते.

    HMD Global कडे Nokia ब्रँडचे हक्क आहेत. या कंपनीने आता Nokia 110 4G आणि Nokia 105 4G नावाचे दोन नवीन फिचर फोन लाँच केले आहेत. या दोन्ही फिचर फोन्सची खासियत म्हणजे हे 4G सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत.

    नोकिया 110 4G आणि नोकिया 105 4G या दोन्ही फीचर फोनमध्ये 1.8-इंचाचा QQVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन सिरीज 30+ ओएसवर चालतात. दोन्ही फोनमध्ये झूम-इन मेनू, रीडआउट असे फीचर देण्यात आले आहेत.

    या दोन्ही फोन्समध्ये Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. हे फोन्स 128MB रॅम आणि 48MB स्टोरेजसह सादर करण्यात आले आहेत. हि स्टोरेज 32GB पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरून वाढवता येते.