आता विमानप्रवासही होणार अधिक वेगवान, येऊ घातलंय हायपरसोनिक विमान; याचा वेग इतका प्रचंड आहे की तासाभरात जगाच्या कानाकोपऱ्यात होणार पोहोचण्याची सोय

एरव्ही सर्वात वेगवान फ्लाईटलाही हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अकरा ते तेरा तासांचा वेळ लागतो. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर प्रवाशांचा वेळही वाचेल आणि वैश्‍विक विमानोड्डाण उद्योगाला मोठीच ताकदही मिळेल.

    वॉशिंग्टन : अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या एव्हिएशन स्टार्टअपने म्हटले आहे की कंपनी एका हायपरसोनिक विमानावर काम करीत आहे. हे विमान लोकांना तासाभरातच जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात नेऊन पोहोचवू शकते. कंपनीच्या या दाव्यामुळे विमानाच्या वेगाविषयीची चर्चेनेही जोर धरला आहे. या विमानाचा कमाल वेग असेल ताशी 14,484 किलोमीटर! ध्वनीच्या वेगापेक्षा हा सुमारे बारा पटीने अधिक वेग आहे. ध्वनीचा वेग ताशी 1234 किलोमीटर इतका असतो.

    अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मानवी शरीर एखाद्या स्पेशल सूटशिवाय प्रचंड वेग झेलण्यास सक्षम नाही. अर्थात स्टार्टअपचे म्हणणे आहे की प्रवाशांवर या हायपरसोनिक विमानाच्या वेगाचा कोणताही परिणाम होणार नाही. हे विमान विकसित करण्यासाठी अमेरिकन सरकारशिवाय काही बड्या वित्तीय कंपन्यांनी वित्तपुरवठा केला आहे. ‘व्हीनस एअरोस्पेस कॉर्प’ नावाच्या या एव्हिएशन स्टार्टअपने म्हटले आहे की हे हायपरसोनिक स्पेसप्लेन अमेरिकेच्या लॉस एंजलिसपासून जपानची राजधानी टोकियोपर्यंतचा प्रवासही अवघ्या एका तासात करू शकते.

    एरव्ही सर्वात वेगवान फ्लाईटलाही हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अकरा ते तेरा तासांचा वेळ लागतो. जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर प्रवाशांचा वेळही वाचेल आणि वैश्‍विक विमानोड्डाण उद्योगाला मोठीच ताकदही मिळेल. हे स्टार्टअप अमेरिकेचे प्रसिद्ध ‘व्हर्जिन ऑर्बिट एलएलसी’चे माजी कर्मचारी असलेल्या सारा डग्लेबी (कोड-रायटिंग लाँच इंजिनिअर) आणि त्यांचे पती अँड्र्यू डग्लेबी (लाँच, पेलोड आणि प्रॉपल्शन ऑपरेशन) यांच्या कल्पनेतून साकारले आहे. व्हर्जिन ऑर्बिट एलएलसी ही कंपनी छोट्या उपग्रहांना लाँच करण्याची सेवा देते.

    Now air travel will be faster hypersonic aircraft are expected to come The speed is so great that it can reach the corners of the world in an hour