गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट क्विकने सुरक्षित घरपोच डिलिव्हरीसह हायपरलोकल सेवेला केले वृद्धिंगत

महाराष्ट्रातील ग्राहकांना (Customers In Maharashtra) आता सणासुदीच्या काळातील त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूजेचं साहित्य, मोदक बनवण्यासाठीचं साहित्य, मिठाई आणि सुका मेवा तसेच ताजी फळे आणि भाज्यांची खरेदी करता येईल. यंदा गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi2021) ७५ हून अधिक उत्पादनांचे पर्याय देऊ करत फ्लिपकार्ट क्विक (Flipkart Quick) ग्राहकांना अनोखी उत्पादने देण्याची बांधिलकी जपत आहे.

  • फ्लिपकार्ट क्विक आता कोलकाता, चेन्नई आणि मुंबईच्या ग्राहकांनाही देणार सेवा
  • सप्टेंबर २०२१ च्या अखेरीपर्यंत फ्लिपकार्ट क्विक अहमदाबाद, चंदीगढ, मोहाली आणि पंचकुला या शहरांमध्येही सेवा सुरू करत एकूण शहरांची संख्या १४ पर्यंत नेणार
  • ग्राहकांना गणेश चतुर्थी फेस्टिव्ह सिलेक्शन, कोविड-१९ अत्यावश्यक वस्तू, ताजी फळे आणि भाज्या, डेअरी, वाणसामान, मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि बेबी केअर उत्पादने सुरक्षितरित्या आणि चटकन घरपोच मागवता येतील
  • ९० मिनिटांमध्ये डिलिव्हरी किंवा ग्राहक आपल्या सोयीनुसार दोन तासांचा कालावधीही बुक करू शकतात

मुंबई : फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कामॅर्स बाजारपेठेने (e commerce market) फ्लिपकार्ट क्विक (Flipkart Quick) ही आपली हायपरलोकल सेवा (Hyperlocal service) आता कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या तीन महानगरांमध्ये विस्तारली आहे. यातून ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू सुरक्षित आणि सहजपणे घरपोच (Home Delivery) तेही चटकन उपलब्ध होतील.

महाराष्ट्रातील ग्राहकांना (Customers In Maharashtra) आता सणासुदीच्या काळातील त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूजेचं साहित्य, मोदक बनवण्यासाठीचं साहित्य, मिठाई आणि सुका मेवा तसेच ताजी फळे आणि भाज्यांची खरेदी करता येईल. यंदा गणेश चतुर्थीसाठी (Ganesh Chaturthi2021) ७५ हून अधिक उत्पादनांचे पर्याय देऊ करत फ्लिपकार्ट क्विक (Flipkart Quick) ग्राहकांना अनोखी उत्पादने देण्याची बांधिलकी जपत आहे.

यातून ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डर करून पुढील ९० मिनिटांत डिलिव्हरी मिळवता येईल किंवा त्यांच्या सोयीनुसार दोन तासांचा स्लॉट बुक करता येईल. ग्राहकांना त्यांच्या पहिल्या ऑर्डरसाठी मोफत डिलिव्हरी दिली जाईल तसेच त्यापुढील ऑर्डर १९९ रु.पेक्षा अधिक असल्यास डिलिव्हरी मोफत असेल. ग्राहकांना दिवसात कधीही ऑर्डर देता येईल आणि त्यासाठी सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत कधीही डिलिव्हरी घेता येईल.

फ्लिपकार्टच्या फ्लिपकार्ट क्विक विभागाचे उपाध्यक्ष संदीप कारवा म्हणाले, “फ्लिपकार्ट क्विकसह आमचा उद्देश नेहमीच तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा लाभ घेऊन आमच्या ग्राहकांना पुरवठा साखळीचा दमदार फायदा करून द्यायचा हा राहिला आहे. तसेच यातून त्यांना वैयक्तिक अनुभव आणि निवडीचेही पर्याय मिळतात. आम्ही वेगवान डिलिव्हरीसोबतच त्यांना अत्यंत परवडणाऱ्या दरात उत्कृष्ट दर्जाची उत्पादने देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे फार महत्त्व आहे आणि तेव्हापासून सणासुदीच्या काळालाही सुरुवात होते. या काळात आमच्या ग्राहकांना खास फेस्टिव्ह सिलेक्शनसह आनंद देत ताजी फळे आणि भाज्या, घरातील आवश्यक वस्तू आणि बेबी केअर प्रोडक्ट ९० मिनिटांच्या आत देऊ करण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

फ्लिपकार्ट क्विकची सुरुवात २०२० मध्ये बंगळुरुमधून झाली. आपल्या लोकेशनवर फ्लिपकार्ट हब्समधून उत्पादने ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना उत्पादने उपलब्ध व्हावीत आणि चटकन डिलिव्हरी मिळाली यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. हायपरलोकल डिलिव्हरी सेवेत ताजी फळे आणि भाज्या, डेअरी, वाणसामान, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स आणि बेबी केअर अशा विभागातील २५०० हून अधिक उत्पादने आहेत. फ्लिपकार्ट क्विक आता बंगळुरु, दिल्ली, गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, हैदराबाद, पुणे, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई अशा १० शहरांमध्ये उपलब्ध आहे.