वनप्लस-फ्लिपकार्टचा वाय सीरिज ४० इंच टीव्ही सादर; परवडणाऱ्या दरातील स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओ

वनप्लसने सादर केलेल्या वनप्लस टीव्ही वाय सीरिजला भारतात प्रचंड प्रतिसाद लाभला. परवडणाऱ्या किमतीतील स्मार्ट टीव्ही विभागाला नवे आयाम देत वनप्लस टीव्ही वाय सीरिजने कल्पकता, बुद्धिमत्ता आणि सहज कनेक्टिव्हिटीचे लाभ प्रत्येक वापरकर्त्याला मिळवून दिले.

  • नव्या वनप्लस टीव्ही वाय सीरिज १०१ सेमी. (४० इंची)सह
  • परवडणाऱ्या दरातील स्मार्ट टीव्ही पोर्टफोलिओ
  • २१,९९९ रु. अशा शुभारंभाच्या किंमतीत २६ मे २०२१ पासून उपलब्ध

बंगळुरु : वनप्लस या आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडने आज वनप्लस टीव्ही वाय सीरिज या स्मार्ट टीव्हीच्या रेंजमधील नवे उत्पादन सादर केले. यातून त्यांनी फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेसोबतच्या आपल्या संबंधांनाही बळकटी दिली आहे. नव्या, परवडणाऱ्या दरातील ४० इंची टीव्हीमुळे वनप्लस टीव्ही वाय सीरिज आणखी एका किंमत गटात सहजसुंदर वनप्लस अनुभव देऊ करत आहे आणि यामुळे देशातील लाखो ग्राहकांना हा ब्रँड अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. वापरकर्त्यांना सहजसुंदर स्मार्ट होम अनुभव देण्यासाठी वनप्लसची कनेक्टेड इकोसिस्टम अधिक बळकट करण्यास हा नवा स्मार्ट टीव्ही सज्ज आहे.

“वनप्लस टीव्ही वाय सीरिजमध्ये नवे उत्पादन सादर करणे म्हणजे नव्या किंमतगटातील आणि उत्पादनांमधील दर्जेदार उत्पादने अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत भारतातील वापरकर्त्यांसाठी प्रीमिअम दर्जाचे तंत्रज्ञान देण्यातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. आज, वनप्लस टीव्ही वाय सीरिज १०१ सेमी (४० इंच) सादर केल्याने कनेक्टेड इकोसिस्टम आणि स्मार्ट होम्सचा वनप्लसचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आहे. आमच्या नव्या स्मार्ट टीव्हीचे यशस्वी सादरीकरण म्हणजे फ्लिपकार्टसोबतच्या आमच्या यशस्वी भागीदारीचे द्योतक आहे. फ्लिपकार्टसोबतचा आमचा हा प्रवास २०२० मध्ये सुरू झाला आणि यातून मोठ्या प्रमाणावरील ग्राहकांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान मुबलक स्तरावर उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही या अर्थपूर्ण सहकार्यातून आमच्या व्यापक समुदायाला लक्षणीय लाभ मिळत राहतील, असा आम्हाला विश्वास वाटतो,” असे वनप्लस इंडियाचे महाव्यवस्थापक विकास अग्रवाल म्हणाले.

वनप्लसने सादर केलेल्या वनप्लस टीव्ही वाय सीरिजला भारतात प्रचंड प्रतिसाद लाभला. परवडणाऱ्या किमतीतील स्मार्ट टीव्ही विभागाला नवे आयाम देत वनप्लस टीव्ही वाय सीरिजने कल्पकता, बुद्धिमत्ता आणि सहज कनेक्टिव्हिटीचे लाभ प्रत्येक वापरकर्त्याला मिळवून दिले.

“देशभरातील लाखो ग्राहकांच्या पसंतीचे व्यासपीठ म्हणून आमच्या परिसंस्थात्मक भागीदारांच्या साथीने या विभागातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट टीव्हीची व्यापक श्रेणी सादर करताना फ्लिटकार्टला अभिमान वाटतो. वनप्लससोबतच्या आमच्या लक्षणीय संबंधांना वृद्धिंगत करताना आणि वेगाने वाढणाऱ्या मूल्याधारित विभागात वनप्लस टीव्ही वाय सीरिज ४० इंची टीव्ही सादर करून त्यांच्या अस्तित्वाला व्यापक करताना आम्हाला आनंद होत आहे. फ्लिपकार्टकडील माहितीसोबतच आमचे परवडणारे पेमेंट पर्याय आणि भारतभरातील पुरवठा साखळीची व्यापकता यामुळे वनप्लसचा समृद्ध दृश्यात्मक अनुभव लाखो ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा विश्वास आम्हाला वाटतो,” असे फ्लिपकार्टच्या लार्ज अप्लायन्सेस विभागाचे उपाध्यक्ष हरी. जी. कुमार म्हणाले.

वनप्लस टीव्ही वाय सीरिज ४० इंच

आकर्षक दृश्ये

नव्या वनप्लस टीव्ही वाय सीरिज ४० इंची स्मार्ट टीव्हीसह ग्राहकांना सुस्पष्ट, शार्प दृश्ये आणि ९३ टक्के DCI-P3 रंगसंगतीचा अनुभव मिळेल. कलर स्पेस मॅपिंग, आवाज कमी करणे, अँटी-अलायझिंग आणि दमदार काँट्रासने सज्ज गामा इंजिन वैशिष्यांमुळे वनप्लस टीव्ही वाय सीरिजमध्ये दृश्यात्मक अनुभव जीवंत करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे. शिवाय यातील बेझल-लेस डिझाइनमुळे वापरकर्त्याला या आकर्षक सिनेमॅटिक अनुभवात रममाण होता येईल.

गुंतवून ठेवणारा दृश्यात्मक अनुभव

प्रेक्षकाला दृश्यांमध्ये रममाण होता यावे यासाठी वनप्लस टीव्ही वाय सीरिजमधील बेझल-लेस डिझाइनमध्ये आकर्षक दृश्यात्मक दर्जा आणि कमाल डिस्प्ले स्पेस देण्यात आली आहे. या ४० इंची टीव्हीमध्ये उत्कृष्ट म्हणजे ९३ टक्क्यांहून अधिक स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या कंटेंटमध्ये उत्कृष्ट दृश्यात्मक अनुभव घेत जणू त्यात हरवून जाता येईल.

अधिक स्मार्ट टीव्ही अनुभव

बुद्धिमान आणि उत्कृष्ट असा वनप्लस टीव्ही वाय सीरिज ४० इंच म्हणजे वनप्लसची ओळख असणाऱ्या खास अनुभवातील पुढची पायरी आहे. यात विश्वासार्स अँड्रॉईड टीव्ही ९.० ची जोड आहे आणि गुगल असिस्टंटमधील विविध भाषांशी हा टीव्ही अगदी सहजरित्या एकरूप करण्यात आला आहे. वापरकर्त्यांना नाविन्यपूर्ण वनप्लस कनेक्ट वैशिष्ट्यांच्या माध्यमातूनही सहज स्मार्ट टीव्ही अनुभव घेता येईल. वनप्लसकनेक्ट अॅपसह तुम्ही टीव्हीसाठी तुमचा स्मार्टफोन रीमोट कंट्रोल म्हणून वापरू शकता. वापरकर्त्यांना फोन आल्यास स्मार्ट व्हॉल्यूम कंट्रोल ही सुविधा वापरून आपोआप आवाज कमी करता येतो आणि कॉल संपल्यावर आधीच्या आवाजात टीव्ही पाहता येतो. अशा अनेकविध वैशिष्ट्यांसोबतच यात टाइपसींक वैशिष्ट्य आहे. यामुळे तुमचा स्मार्टफोन स्मार्ट रीमोट बनतो आणि तुम्ही पारंपरिक रीमोट न वापरता स्मार्टफोनमध्ये बोलून किंवा टाईप करून सूचना देऊ शकता.

डॉल्बी ऑडिओ

दोन फूल रेंज २० वॅट बॉक्स स्पीकर्स आणि डॉल्बी ऑडिओ सुविधेसह वनप्लस टीव्ही वाय सीरिज तुम्हाला अत्यंत सुस्पष्ट आणि दर्जेदार श्रवणानुभव देऊ करते. सर्वत्र अत्यंत सुस्पष्ट आवाजामुळे या टीव्हीमधून अत्यंत सुंदर असा सराऊंड साऊंड अनुभव मिण्तो.

ऑक्सिजनप्लेसह खास प्रीमिअम कंटेंट

वनप्लसच्या ऑक्सिजनप्लेमुळे वनप्लस टीव्हीमध्ये कंटेंट शोधणारे व्यासपीठ उपलब्ध होते. यात वापरकर्त्यांना विविध भागीदारांच्या कंटेंटचा खजिनाच उपलब्ध होतो. सुधारित ऑक्सिजनप्लेमध्ये संपूर्ण कुटुंबाला पाहता येईल असा समृद्ध मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध आहे. शिवाय, कंटेंट भागीदारांकडून प्रसिद्ध कंटेंट उपलब्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे, वनप्लस टीव्ही वाय सीरिजमध्ये एकात्मिक कंटेंट कॅलेंडर उपलब्ध आहे. यात तुमचे आवडते शो, नवे सिनेमे यासाठी रिमाइंडर्स लावता येतील.

किंमत, उपलब्धता आणि सवलती

वनप्लस टीव्ही वाय सीरिज ४० इंच फ्लिपकार्टवर बुधवार २६ मे पासून उपलब्ध असेल. OnePlus.in वर मंगळवार १ जूनपासून हा टीव्ही उपलब्ध होईल. वापरकर्त्यांना फ्लिपकार्टवर बुधवार २६ मे ते शनिवार २९ मे या काळात मर्यादित सेलमध्ये हा टीव्ही २१,९९९ रुपयांना विकत घेण्याची संधीही मिळणार आहे.

शुभारंभाची किंमत ३१ मे २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. वापरकर्त्यांना महत्त्वाच्या बँकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआय योजनेचाही लाभ घेता येईल.

One Plus Flipkart Y series introduces 40 inch TV Affordable smart TV portfolio