OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत ?

कंपनी या वर्षाच्या अखेरीस नॉर्ड N200 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तथापि, हा फोन केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केला जाईल. on

    मुंबई : वनप्लस नॉर्ड CE 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने नुकतीच पुष्टी केली आहे. वनप्लस डिव्हाइस 10 जूनला भारत आणि युरोपमध्ये लाँच केलं जाईल. गेल्या वर्षी लाँच झालेल्या वनप्लस नॉर्डचं नेक्स्ट व्हर्जन म्हणून वनप्लस नॉर्ड CE 5G लाँच केला जात आहे. मुलाखतीदरम्यान लाऊ यांनी वनप्लस नॉर्ड CE 5G च्या वैशिष्ट्यांविषयी खुलासा केला नाही.

    हा फोन स्वस्त दरात लाँच केला जाईल. ते म्हणाले की, आम्ही या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. अशा परिस्थितीत भारतात या फोनची किंमत 20,000 रुपये इतकी असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा 5G स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर हा फोन Amazon इंडियाच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल.

    लाऊ म्हणाले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस नॉर्ड N200 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तथापि, हा फोन केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केला जाईल.