OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, 48MP च्या दोन सेंसरसह होणार लाँच

लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 9 स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यात 48MP चे दोन सेंसर्स उपलब्ध होतील. तर उत्तम परफॉरर्मन्ससाठी स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर असणार आहे. सोबतच 65W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळण्याची शक्यता आहे.

    दिग्गज स्मार्टफोन मेकर कंपनी OnePlus लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन लाँच (New Smartphone Launch) करण्याच्या तयारीत आहे. कंपनी (Company) चा हा आगामी स्मार्टफोन (Upcoming Smartphone) OnePlus 9 आहे, याबाबत अनेक रिपोर्ट्स (Leak Reports) समोर आले आहेत. अशातच आणखी एक रिपोर्ट समोर आला आहे.ज्यात याचे अनेक खास फीचर्स (Features) ची माहिती देण्यात आली आहे. लीक रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत माहिती दिली आहे.

    लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 9 स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, ज्यात 48MP चे दोन सेंसर्स उपलब्ध होतील. तर उत्तम परफॉरर्मन्ससाठी स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर असणार आहे. सोबतच 65W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळण्याची शक्यता आहे.

    OnePlus 9 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा एक टिप्स्टर ने AIDA64 बैंचमार्किंग सॉफ्टवेअरच्या स्क्रीनशॉट्ससह दिला आहे. ट्विटरवर अपकमिंग स्मार्टफोन OnePlus 9 शी संबंधित चार स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. समोर आलेल्या स्क्रिनशॉट्सनुसार OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येईल.फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

    लीक्स नुसार OnePlus 9 सीरिझ अंतर्गत कंपनी OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 Lite स्मार्टफोन लाँच करू शकते. तर अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे की, ही सीरिझ पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. तथापि, कंपनीने अद्याप OnePlus 9 ची लाँच डेट आणि फीचर्स बाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.