OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या कसा असेल नवा फोन

OnePlus 9RT ची किंमत 34,000 रुपये असू शकते. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,000 रुपये इतकी असेल.

    OnePlus 9RT बद्दल अफवा पसरत आहेत, हा फोन भारतासह काही निवडक देशांमध्ये या महिन्याच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. OnePlus 9RT च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च केलेल्या OnePlus 9R सारखाच असेल. नवीन लीक्समध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी Weibo चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात OnePlus 9RT चे फीचर्स उघड केले आहेत.

    OnePlus 9RT ची किंमत 34,000 रुपये असू शकते. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,000 रुपये इतकी असेल. याशिवाय जर तुम्ही 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट घेत असाल तर तुम्हाला 44,000 रुपये मोजावे लागू शकतात.