64MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसह Oneplus Nord CE 5G मार्केटमध्ये लॉन्च होणार ; जाणून घ्या फिचर्स

वनप्लस कंपनी या स्मार्टफोनबद्दल सातत्याने ट्विटरवर टीझ करत आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यामध्ये CE म्हणजेच कोर एडिशन आहे.'Core. A Little more than you'd expect.' या टॅगलाईनसह हा फोन लाँच केला जाईल. Android Central च्या अहवालानुसार हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटने पॉवर्ड असेल.

    मुंबई : Oneplus Nord CE 5G स्मार्टफोन आज (10 जून) संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाणार आहे. लाँच होण्यापूर्वीच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर सूचीबद्ध करण्यात आला आहे. अमेझॉनवरील लिस्टिंग पेजवर Notify Me हे बटणदेखील देण्यात आलं आहे. त्यावर क्लिक करून आपण स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल अधिक अपडेट्स मिळवू शकता.

    वनप्लस कंपनी या स्मार्टफोनबद्दल सातत्याने ट्विटरवर टीझ करत आहे. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे आणि यामध्ये CE म्हणजेच कोर एडिशन आहे.’Core. A Little more than you’d expect.’ या टॅगलाईनसह हा फोन लाँच केला जाईल. Android Central च्या अहवालानुसार हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी चिपसेटने पॉवर्ड असेल.

    OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरासह येईल. यासोबत यात 6.43 इंचांचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे आणि याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. सेल्फीसाठी या फोनच्या फ्रंटला पंच-होल कॅमेरा असेल, ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.