पे-पॉईंटने ईशान्य भारतातील बँकिंग सेवा अधिक सुलभ व्हावी याकरिता मायक्रो-एटीएम केले सुरू

एटीएम ग्रामीण भागात सहज उपलब्ध करता येतात. ज्यामुळे मोठया एटीएम कडे किंवा बँकेत जाण्यासाठी लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही, वेळ वाचून त्रास कमी होईल. स्थानिक किराना दुकानांवर ही हँडहेल्ड मशीन्स बसविता येतील आणि रोख प्रवाहातील सातत्य उपलब्ध ठेवण्यासाठी त्या दुकानांमधीलच कॅश बॉक्स (रोख) वापरता येईल.

  • प्रगत आणि पोर्टेबल मायक्रो-एटीएम बँक नसलेल्या भागात सर्व पारंपारिक एटीएम सुविधा देतात
  • स्थानिक किरकोळ दुकाने आणि पे-पॉईंट आउटलेट्स मधून रोख रक्कम त्वरित वितरीत करू शकतील

मुंबई : देशात ज्या भागात बँकिंग सेवा कमी प्रमाणात उपलब्ध आहे तिथे प्राथमिक बँकिंग सेवा आणत पे-पॉइंट इंडियाने ईशान्य भारतात ‘मायक्रो-एटीएम’ (एम-एटीएम) मालिका सुरू केली आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा भूगोल हा परंपरागतपणे मूलभूत बँकिंग सेवांपासून मुख्यतः एटीएम सुविधांपासून वंचित आहे. डोंगराळ भागात अनेकदा कनेक्टिव्हिटी नसते, ज्यामुळे बँकाचे विसंगत व अपूर्ण व्यवहार होतात.

मोठ्या एटीएमची मिनी आवृत्ती एम

एटीएम ग्रामीण भागात सहज उपलब्ध करता येतात. ज्यामुळे मोठया एटीएम कडे किंवा बँकेत जाण्यासाठी लोकांना लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागणार नाही, वेळ वाचून त्रास कमी होईल. स्थानिक किराना दुकानांवर ही हँडहेल्ड मशीन्स बसविता येतील आणि रोख प्रवाहातील सातत्य उपलब्ध ठेवण्यासाठी त्या दुकानांमधीलच कॅश बॉक्स (रोख) वापरता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आकडेवारीनुसार पूर्वोत्तर प्रदेशातील 1.35 कोटी ऑपरेटिव्ह डेबिट कार्डधारकसाठी केवळ 6,183 एटीएम उपलब्ध आहेत.

एका पायलट प्रोग्राम दरम्यान पे-पॉईंटने यापूर्वी ईशान्य भागात सुमारे 900 एम

एटीएम उपलब्ध केले आहेत आणि मार्च 2022 पर्यंत ते 6,000-7,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. देशातील बर्‍याच भागांमध्ये रोखीने चालणारी अर्थव्यवस्था चालू राहिल्याने शेवटच्या मैलापासून कंपनीला एम-एटीएमची मागणी वाढत आहे.

PayPoint launches micro ATM to facilitate banking services in Northeast India