IPL आणि आगामी 20 World Cup सीझनसाठी पेटीएमकडून डीटीएच रिचार्जवर आकर्षक कॅशबॅकची घोषणा

सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर्स: टाटा स्‍काय, एअरटेल डिजिटल टीव्‍ही, डीश टीव्‍ही, डी२एच व सन डायरेक्‍ट यांच्‍या रिचार्जसाठी ऑफर उपलबध युजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम पोस्‍टपेड (बाय नाऊ पे लॅटर), पेटीएम वॉलेट, डेबिट व क्रेडिट कार्डस् किंवा नेटबँकिंग यामधून त्‍यांचा पसंतीचा पेमेण्‍ट मोड निवडण्‍याची मुभा देण्यात आली आहे.

  भारतातील ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची आघाडीची(1) डिजिटल परिसंस्था पेटीएमने सुरू असलेल्‍या क्रिकेट हंगामामधील जसे आयपीएल ते आगामी टी२० वर्ल्‍ड कप सामन्‍यांदरम्‍यान डीटीएच रिचार्जवर आकर्षक कॅशबॅक ऑफर्सची घोषणा केली. युजर्सना टाटा स्‍काय, एअरटेल डिजिटल टीव्‍ही, डीश टीव्‍ही, डी२एच व सन डायरेक्‍ट अशा सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर्सच्‍या रिचार्जवर जवळपास ५० रूपयांच्‍या खात्रीदायी कॅशबॅकचा लाभ घेता येईल. या ऑफर्स सर्व सबस्क्रिप्‍शन प्‍लान्‍ससाठी सर्व सामन्‍यांच्‍या दिवसांदरम्‍यान लागू आहेत.

  या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी युजरला डीटीएच रिचार्जवर पेमेण्‍ट पूर्ण करण्‍यासाठी प्रोमो कोड ”CRIC2021” वापरावा लागेल. वरील ऑफर व्‍यतिरिक्‍त पेटीएमने पेटीएम वॉलेट्सचा वापर केल्‍यास डीटीएच अकाउंट्सच्‍या रिचार्जवर विविध कॅशबॅक ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. युजर्सची सोय आणखी वाढवण्यासाठी पेटीएमने अलीकडेच आपल्या डीटीएच रिचार्ज पेमेण्‍ट अनुभवात आणखी सुधारणा केली आहे. यामध्ये २-क्लिक इन्स्टण्ट पेमेण्‍ट आणि प्‍लान संपण्‍यासंदर्भात वेळेवर रिमांइडर्सचा समावेश आहे.

  पेटीएम यूर्सना यूपीआय, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्‍टपेड (बाय नाऊ पे लॅटर), डेबिट व क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग या त्‍यांच्‍या पसंतीच्‍या पेमेण्‍ट मोडमधून निवड करण्‍याची मुभा देते. युजर्स पेटीएम पोस्‍टपेड वैशिष्‍ट्याचा वापर करून देखील पेमेण्‍ट करू शकतात, ज्‍यामधून त्‍यांना आत्ता रिचार्ज करण्याची व नंतर पैसे चुकते करण्याची मुभा मिळते.

  पेटीएम प्रवक्‍ते म्‍हणाले, ”आम्‍ही रोमहर्षक क्रिकेट हंगामाचा आनंद घेत असलेल्‍या आमच्‍या युजर्सना अधिक आनंद देत आहोत. पेटीएमची प्रबळ तंत्रज्ञान पायाभूत सुविधा युजर्सना सर्वोत्तम रिचार्ज अनुभव देते. सुलभ २-स्‍टेप इन्‍स्‍टण्‍ट रिचार्जसह आम्‍ही आमच्‍या युजर्सना त्‍यांच्‍या सुविधेनुसार विविध पेमेण्‍ट पर्याय देखील देतो.”

  पेटीएम युजर्स त्‍यांच्‍या घरांमधूनच आरामात त्‍यांची वीज बिलदेयके, मोबाइल, ब्रॉडबॅण्‍ड व डीटीएच रिचार्ज, भाड्याचे पेमेण्‍ट्स, तसेच म्‍युच्‍युअल फंड्स, स्‍टॉक्‍स, डिजिटल गोल्‍डच्‍या माध्‍यमातून वेल्‍थ मॅनेजमेंटला क्रेडिट कार्ड बिलांचे पेमेण्‍ट, विम्‍याच्‍या हप्‍त्‍याचे पेमेण्‍ट आणि प्रवास/विमान तिकिटे, ई-कॉमर्स अशा अनेक रोजच्‍या गरजांसाठी पेमेण्‍ट्स करू शकतात.

  पेटीएम विषयी :

  पेटीएम ही ग्राहक आणि व्यापाऱ्यांसाठीची भारतातील आघाडीची(1) डिजिटल परिसंस्था आहे आणि ३१ मार्च, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, ३३३ दशलक्ष ग्राहक व २१ दशलक्षांहून अधिक व्यापाऱ्यांना पेमेण्‍ट सेवा, वाणिज्य व क्लाउड सेवा तसेच वित्तीय सेवा पुरवते. ३१ मार्च, २०२१ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, ग्राहकांची संख्या, व्यापाऱ्यांची संख्या तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची संख्या यांच्या निकषावर पेटीएम हा भारतातील सर्वांत मोठा पेमेंट्स प्लॅटफॉर्म आहे(1). प्लॅटफॉर्मचा जीएमव्ही, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये, ४,०३३ अब्ज रुपये होता.

  वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (“कंपनी”) हा, एकूण व्यवहारांच्या संख्येवरून, भारतातील आर्थिक वर्ष २०२१ मधील सर्वांत मोठा पेमेण्‍ट गेटवे अँग्रिगेटर आहे तसेच पेमेण्‍ट उत्पादनांची ही सर्वांत विस्तृत परिसंस्था आहे(1). कंपनीच्या वित्तपुरवठा व्यवसायांमध्ये (भागीदार वित्तीय संस्थांच्या सहयोगाने केल्या जाणाऱ्या) व्यक्तिगत कर्जे, व्यापारी कर्जे तसेच बाय नाऊ, पे लेटर उत्पादनाचा अर्थात पेटीएम पोस्टपेडचा समावेश आहे. कंपनीच्या सहयोगी वित्तीय संस्थांनी आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीत १.४ दशलक्ष कर्जे वितरित केली.

  अस्वीकृती :

  “वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड, आवश्यक मंजुऱ्या, बाजारातील स्थिती व अन्य विचारांच्या अधीन राहून आपल्या इक्विटी समभागांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) ठेवण्याबाबत सूचित करत आहे आणि कंपनीने १५ जुलै, २०२१ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“सेबी”) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे. हा डीआरएचपी सेबीच्या www.sebi.gov.in या वेबसाइटवर, बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या वेबसाइट्सवर तसेच शेअर बाजारांच्या अनुक्रमे ww.nseindia.com आणि www.bseindia.com या वेबसाइट्सवर, उपलब्ध आहे.

  इक्विटी समभागांतील गुंतवणुकीमध्ये मोठी जोखीम असते याची कोणत्याही संभाव्य गुंतवणूकदाराने नोंद घ्यावी आणि या जोखमीबाबतचे तपशील जाणून घेण्यासाठी आरएचपी/प्रॉस्पेक्टसमधील “रिस्क फॅक्टर्स” भाग उपलब्ध होईल तेव्हा काळजीपूर्वक वाचावा. संभाव्य गुंतवणूकदारांनी डीआरएचपीवर अवलंबून राहून गुंतवणुकीचा कोणताही निर्णय करू नये.” (1) स्रोत: रेडसीअर मॅनेजमेंट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तयार करण्यात आलेला “द डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ पेमेंट्स अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस इन इंडिया” या शीर्षकाखालील १५ जुलै, २०२१ या तारखेचा अहवाल.