स्मार्टफोन, टॅबलेटसाठी पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस; आता घराबाहेर न पडता तुमच्या मोबाईल डिव्हाईसची सर्व्हिस मिळवा

ग्राहक त्यांच्या गॅलक्सी ए, गॅलक्सी एम, गॅलक्सी एस, गॅलक्सी एफ, गॅलक्सी नोट आणि गॅलक्सी फोल्ड सीरिज स्मार्टफोन्स तसेच टॅबलेटसाठी सर्व्हिसची नोंदणी करू शकतात. ग्राहकांच्या घरून डिव्हाईस पिक-अप आणि ड्रॉप करणारे व्यक्ती सर्व सुरक्षा प्रोटोकॉल्सचे पालन करतील.

  • हे पाऊल ग्राहकांची सुरक्षा आणि सोयीस्करपणा यांची खात्री देतं; सर्व्हिस 46 शहरांमध्ये चालू
  • दिल्ली, गुरूग्राम, मुंबई, कलकत्ता, बँगलोर, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, आणि हैदराबाद

नवी दिल्ली : भारतामधील सर्वात विश्वसनीय कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन ब्रॅण्ड, सॅमसंगने आज देशामध्ये मोबाईल डिव्हाईससाठी नवीन पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस देऊन ती देत असलेल्या तीच्या विनासंपर्क सर्व्हिसचा विस्तार केला. सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भेट देणारे ग्राहक सुद्धा दुरूस्तीनंतर त्यांच्या घरी त्यांचे मोबाईल फोन मिळण्यासाठी ड्रॉप-ओन्ली सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. यामुळे सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅबलेट कंज्युमर्सला त्यांचे डिव्हाईस सर्व्हिस करून घेण्यासाठी त्यांच्या घरच्या सुरक्षा आणि आरामातून बाहेर पडावे लागत नसल्याची खात्री केली जाईल.

मोबाईल डिव्हाईसची पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिसने 46 शहरात आपले पाऊल टाकले आहे – दिल्ली, गुडगाव, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, पुणे, बँगलोर, आग्रा, लखनऊ, वाराणसी, डेहराडून, गुवाहटी, भुवनेश्वर, पटना, दुर्गापुर, रांची, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापुर, नागपुर, सुरत, वडोदरा, भोपाळ, इंदौर, रायपुर, राजकोट, जबलपुर, कोईंबतुर, मदुराई, कोची, कालिकत, तिरूपती, हुबळी, हैदराबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणम – महानगरपालिकेच्या मर्यादेत येणाऱ्या कंटेनमेंट नसलेल्या क्षेत्रांसाठी आणि कर्फ्यू च्या सर्व नियमांचे पालन करून.

ग्राहक त्यांच्या गॅलक्सी ए, गॅलक्सी एम, गॅलक्सी एस, गॅलक्सी एफ, गॅलक्सी नोट आणि गॅलक्सी फोल्ड सीरिज स्मार्टफोन्स तसेच टॅबलेटसाठी सर्व्हिसची नोंदणी करू शकतात. ग्राहकांच्या घरून डिव्हाईस पिक-अप आणि ड्रॉप करणारे व्यक्ती सर्व सुरक्षा प्रोटोकॉल्सचे पालन करतील.

मोबाईल डिव्हाईस दुरूस्तीसाठीची पिक-अप आणि ड्रॉप आणि केवळ ड्रॉप सर्व्हिसचा अनुक्रमे 199 रू. आणि 99 रू. च्या नाममात्र शुल्कामध्ये लाभ घेतला जाऊ शकतो. ग्राहक अनेक डिजिटल पेमेंट पर्यायांमधून सर्व्हिससाठी पेमेंट करू शकतात.

सॅमसंग मध्ये, ग्राहकांचे आरोग्य सर्वात मोठे प्राधान्य आहे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटूंबांना सोय देण्यासाठी पाऊल उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. नवीन पिक-अप आणि ड्रॉप आणि केवळ ड्रॉप सर्व्हिसमुळे ग्राहक खास करून सध्याच्या परिस्थीतीत, त्यांच्या घरून बाहेर न पडता त्यांच्या मोबाईलची सर्व्हिस करून घेऊ शकतील. आमचे व्यापक सर्व्हिस नेटवर्क आणि बरेच विनासंपर्क सर्व्हिस पर्याय ग्राहकांना मोठ्या सोयीसह जोडून राहाण्यास मदत करतील याचा आम्हाला विश्वास आहे. ग्राहक त्यांच्या घरी राहून आणि सुरक्षित राहून पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिसचा लाभ घेतील अशी आम्हाला आशा आहे.

सुनिल क्युटिन्हा, उपाध्यक्ष, सॅमसंग इंडिया ग्राहक सेवा

सॅमसंग तीच्या ग्राहकांना अनेक विनासंपर्क सर्व्हिस पर्याय देते, ज्याने त्यांना त्यांच्या घरातून बाहेर न पडता त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत होते. ग्राहक व्हॉट्सअप, रीमोट सपोर्ट, लाईव्ह चाट, कॉल सेंटरमधून तांत्रिक सहाय्य किंवा सॅमसंग वेबसाईटवर आणि यूटूब वरील डू-इट-युअरसेल्फ व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात.

विनासंपर्क सर्व्हिस सुविधा

व्हॉट्सॲप सपोर्ट:

ग्राहक सर्व्हिसची नोंदणी करण्यासाठी 1800-5-SAMSUNG (1800-5-7267864) या सॅमसंगच्या व्हॉट्सअप सपोर्ट क्रमांकावर एक साधा मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअप वर, ते तांत्रीक सहाय्य घेऊ शकतात, सर्व्हिस सेंटर ठिकाणांची माहिती मिळवू शकतात, दुरूस्तीची स्थिती आणि नवीन ऑफर जाणून घेऊ शकतात, त्यांनी नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग प्रॉडक्टच्या डेमो आणि इंस्टॉलेशनची विनंती सुद्धा करू शकतात. ही सर्व्हिस 24×7 उपलब्ध आहे.

रिमोट सपोर्ट:

सॅमसंग कॉल सेंटर एजंट ग्राहकांच्या गॅलक्सी स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्हीवर रिमोट पद्धतीने इंटरनेट द्वारे काम करू शकतात आणि तात्काळ उपायासाठी ऑनलाईनच समस्येचे निदान करू शकतात.

लाईव्ह चाट:

ग्राहक तात्काळ सॅमसंगच्या www.samsung.com/in/support या वेबसाईटवर त्यांच्याशी संपर्क करू शकतात जेथे चाट बोट (Bot ) च्या आधारे प्रशिक्षित एजंट आणि आर्टिफिशीयल इंटिलीजंस (AI) कोणताही वेळ न घेता 24×7 कोणत्याही शंकांची तात्काळ आणि योग्य माहिती देऊ शकतात.

कॉल सेंटरच्या माध्यमातुन तांत्रीक सहाय्य: तज्ञ कॉल सेंटर अधिकारी कॉलवर तांत्रीक सहाय्य देतात. ग्राहक समस्या सोडविण्यासाठी त्यांना सांगितलेल्या तांत्रीक सल्ल्याचे पालन करतात.

सॅमसंग वेबसाईट आणि यूटूब वर व्हीडियो टिप्स: सामान्य समस्यांसाठी ग्राहक सॅमसंगच्या वेबसाईट आणि यूटूबवर उपयुक्त अशा प्रॉडक्ट केयर टिप्स आणि डू-इट-युअरसेल्फ व्हीडियो शोधू शकतात.

सॅमसंग मेंबर्स ॲप:

‘सॅमसंग मेंबर्स’ ला दहा लाख युजर आहेत आणि तो ग्राहकांना लाईव्ह चाट, सर्व्हिस विनंती करणे, दुरूस्तीची स्थिती ट्रॅक करणे, रीमोट सपोर्ट आणि फोनवर निदान या सुविधा देतो. स्व-सहाय्य आणि प्रॉडक्ट फिचर समजून घेणे यांसाठी इतर सॅमसंग चाहत्यांसह ग्राहक ‘कम्युनिटी’ विभागात सुद्धा जोडून राहू शकतात.