पेनियरबायच्या निओ दुकानचे बाजारपेठेत पदार्पण;२०२५ पर्यंत १०० दशलक्ष रिटेलर्सचे आधुनिकीकरण करण्याचे लक्ष्य

पेनियरबाय निओ दुकान (PayNearby NeoDukaan) हे रिटेल स्टोअर्सचे डिजिटायझेशन करण्याच्या हेतूने व देशाच्या अगदी कानाकोप-यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान वेगाने पोहोचविण्याचे लक्ष्य समोर ठेवून तयार करण्यात आलेले अशाप्रकारचे पहिलेवहिले सर्वसमावेशक दुकान व्यवस्थापन संसाधन आहे.

  • किरकोळ विक्रेत्यांना आपल्या व्यवसायाचे आधुनिकीकरण व डिजिटल माध्यमाचा अधिक वेगाने स्वीकार करण्यासाठी आवश्यक संपूर्ण सेवासंच देत त्यांचे सक्षमीकरण करणारा करणारा ‘वन-स्टॉप-शॉप’ प्लॅटफॉर्म
  • या सेवेचा व्यापक पातळीवर स्वीकार व्हावा यासाठी तंत्रज्ञानावर आधारित अनेक व्यापारी सेवा-सुविधा देणार
  • विविध आकार-प्रकारांच्या व्यापारी आस्थापनांकडून या सेवेचा सहज स्वीकार व्हावा यासाठी किरकोळ विक्रेते आणि ग्राहक अशा दोन्ही वर्गांसाठी सुलभीकृत सर्वसमावेशक डिजिटल पेमेंट केंद्र उपलब्ध करून देणार
  • एक असे स्टोअर मॅनेजमेंट टूल आहे, जे दुकानांना एका-क्लिकसरशी झटपट ऑनलाइन विक्री सुरू करण्याची सुविधा पुरवेल आणि अधिक चांगल्या पतव्यवस्थापनासाठी डिजिटल लेजर तसेच घाऊक माल मागविण्याचा पर्याय देणारा एकीकृत मंच उपलब्ध करून देईल
  • मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित लक्षावधी एमएसएमईंचे डिजिटायझेशन करण्याचे तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या नव्या गटाला पेनियरबायच्या कार्यकक्षेत आणण्याचे लक्ष्य

मुंबई : देशातील किरकोळ विक्री (Retail selling) क्षेत्राचे व्यापक स्तरावर आधुनिकीकरण करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या पेनियरबाय या भारताच्या अग्रगण्य ब्रांचलेस बँकिंग (Banking) आणि डिजिटल पेमेंट्स नेटवर्कने (Digital payments network) रिटेलर्स असोसिएशन्स स्किल काउन्सिल ऑफ इंडियाशी (आरएएससीआय) शी सहयोग साधत पेनियरबायनिओदुकान (“PayNearby NeoDukaan”) या सेवेचा शुभारंभ केला आहे.

आपल्या रिटेल पार्टनर्सना अधिक सुधारित डिजिटल तंत्रज्ञान (digital technology) वापरण्यासाठी सक्षम बनविणे व त्यांना उदरनिर्वाहाचा अधिक चांगला मार्ग मिळविण्यासाठी सुसज्ज करणे हा या सेवेचा हेतू आहे. पेनियरबाय निओ दुकान (PayNearby NeoDukaan) हे रिटेल स्टोअर्सचे डिजिटायझेशन करण्याच्या हेतूने व देशाच्या अगदी कानाकोप-यापर्यंत डिजिटल तंत्रज्ञान वेगाने पोहोचविण्याचे लक्ष्य समोर ठेवून तयार करण्यात आलेले अशाप्रकारचे पहिलेवहिले सर्वसमावेशक दुकान व्यवस्थापन संसाधन आहे.

डिजिटल पेमेंटचे वेगवेगळे पर्याय, पतव्यवस्थापनासाठी डिजिटल लेजर आणि घाऊक माल ऑनलाइन मागविण्याचे पर्याय अशा सुविधांच्या साथीने आपल्या रिटेल पार्टनर्सना डिजिटलदृष्ट्या सक्षम करत व त्यांना आजच्या काळाच्या पावलांशी पावले जुळवत पुढे जाण्याचे बळ देत त्यांच्यासाठी एक जोमाने विकसित होणारी परिसंस्था निर्माण करण्याचे पेनियरबाय निओ दुकानचे (PayNearby NeoDukaan) ध्येय आहे.

भारतातील रिटेल अर्थात किरकोळ विक्रीचे क्षेत्र उत्क्रांत होत आहे, पण किरकोळ विक्रेते मात्र या प्रक्रियेत मागे राहून गेले आहेत. किरकोळ विक्री हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे, ज्याची देशाच्या जीडीपीमधील १० टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे, तर एकूण रोजगारापैकी ८ टक्केग रोजगार या क्षेत्रातून निर्माण होत आहेत. हे इतके मोठे उद्योगक्षेत्र असूनही यात प्रामुख्याने किरकोळ विक्रेते आणि व्हेंडर्सचा समावेश असल्याने त्याचे स्वरूप हे प्रामुख्याने असंघटित राहिले आहे.

सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये विजयी होण्यासाठी स्थानिक रिटेलर्सनाही बदलांना सामोरे जाण्याची गरज आहे. ग्राहकांना आपली सेवा अनिवार्य व्हावी यासाठी स्थानिक रिटेलर्सनी ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांना सामावून घेण्याच्या दृष्टीने स्वत:मध्ये सातत्याने सुधारणा करत राहणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीने पेनियरबाय (PayNearby NeoDukaan) रिटेल दुकानांचे रूपडे संपूर्णपणे बदलत आहे व त्यांना भविष्यासाठी सज्ज करत आहे. कंपनीने आजवर देशातील १७,६००हून अधिक पिनकोड पत्त्यांवरील ३८ लाखांहून अधिक रिटेलर्सना ऑनलाइन मंचावर आपले अस्तित्त्व ठामपणे सिद्ध करण्याची क्षमता बहाल केली आहे आणि बदलत्या डिजिटल जगामध्ये छोटी व स्थानिक दुकाने मागे पडू नयेत याची काळजी घेतली आहे.

पेनियरबायच्या (PayNearby NeoDukaan) या नव्या व्यापारश्रेणीबद्दलची हीच भावना कंपनीच्या निओ दुकान ॲपच्या कार्यपद्धतीमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. हे स्टोअर मॅनेजमेंट पॅकेज म्हणजे दुकानांच्या एकूण एका गरजेचा विचार करणारा सर्वंकष सेवासंच आहे. किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या दुकानाच्या आधुनिकीकरणासाठी मदत व्हावी, त्यांचे जगणे अधिक सुलभ व्हावे व त्यांना आजच्या काळाच्या बरोबरीने काम करता यावे यासाठी त्यांना मदत करणे याच विशिष्ट हेतूने हा सेवासंच तयार करण्यात आला आहे.

या ॲपच्या मदतीने किरकोळ विक्रेत्यांना भविष्यातील आव्हानांपासून संरक्षण पुरविणे व भविष्यात त्यांना महाकाय ई-कॉमर्स (e commerce) कंपन्या आणि मोठ्या आकाराच्या सुपर स्टोअर्स बरोबर टक्कर देता यावी अशा पातळीवर त्यांना नेऊन ठेवणे हा पेनियरबायचा (PayNearby NeoDukaan) हेतू आहे.

पेनियरबाय निओदुकान (PayNearby NeoDukaan) दुकानांना एका क्लिकसरशी ऑनलाइन मंचावर प्रवेश मिळवून देते आणि या दुकानांच्या स्थानिक तसेच दूरवरच्या ग्राहकांनाही त्यांच्या डिजिटल स्टोअरची सुविधा आपल्या सोयीप्रमाणे वापरता यावी यावी यासाठी या दुकानांना सक्षम बनविते. या मंचाद्वारे पेनियरबायला भारतातील स्थानिक किरकोळ विक्रेत्यांचे डिजिटल सक्षमीकरण करायचे आहे. हे करताना अशा विक्रेत्यांना आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरविता यावी यादृष्टीने त्यांची कार्यक्षमता वाढविणे व त्यांना नव्या संधी उपलब्ध करून देणे हा पेनियरबायचा हेतू आहे.

आज सर्वच दुकानांसाठी डिजिटल पेमेंट्ससाठी डिजिटल कार्यपद्धती स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अशावेळी दुकानदारांना आपल्या स्थानिक ग्राहकांना यूपीआय, क्यू्आर, आधार पे, एमपीओएस आणि सॉफ्टपीओएस यांसारखे पेमेंटचे विस्तृत पर्याय देता यावेत यासाठी हा नवाकोरा मंच त्यांना सक्षम बनवतो. याखेरीज या सेवेमुळे खर्चात बचत होत असल्याने व ती सहज अंमलात आणण्याजोगी असल्याने ग्राहकांना मर्यादित पेमेंट सुविधांमुळे ग्राहकांना गमावण्याची वेळ येणार नाही, व त्यांना डिजिटल वित्तीय सेवा अखंडितपणे पुरविता येतील.

पेनियरबाय निओदुकानमुळे दुकानदारांना आपल्या ग्राहकांना विपुल पर्याय देता येतील व देशात, विशेषत: बँकसेवा न पोहोचलेल्या भागांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक वेगाने स्वीकार होण्यास मदत होईल. यामुळे रोख रकमेची आणि रोख रकमेवर आधारित व्यवहारांची मागणी कमी होईल. याचबरोबर कोविडच्या काळामध्ये या सेवेमुळे ग्राहकांना सुरक्षित, कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स करण्याची सुविधाही मिळेल. अशाप्रकारे निओदुकानला डिजिटल पेमेंट्सचे लोकशाहीकरण करायचे आहे. समाजाच्या अगदी तळागाळापर्यंतच्या सर्व आकार-प्रकारांच्या दुकांनाना डिजिटल व्यवहार करता यावेत आणि अखेर डिजिटल पेमेंट हा प्रत्यक्ष पैशांच्या व्यवहारांइतकाच सहजसुलभ पर्याय बनावा यादृष्टीने पेनियरबाय निओ दुकान काम करत आहे.

बहुतांश द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी शहरांमध्ये व त्याही पलीकडच्या भागांमध्ये बहुतेक दैनंदिन व्यापार हा क्रेडिटवर चालतो. ताळेबंदीच्या वह्या सांभाळण्यात आणि देण्या-घेण्याचे हिशेब पूर्ण करण्यासाठी तासंतास घालविण्यात दुकानदारांची दमछाक होते. पण बहुतांश दुकानदार हा अजूनही पारंपरिक पद्धतीने ‘वहि-खात्या’मध्येच आपले हिशेब मांडून ठेवतो.

अशावेळी निओ दुकानचे’कस्टरमर खाता’- (customer khata) ही डिजिटल लेजर सुविधा त्यांना ग्राहकांची येणी अधिक कार्यक्षम पद्धतीने मांडून ठेवण्यास मदत करू शकेल. अधिक चांगली सुरक्षा प्रदान करणारी कस्टमर खाता सुविधा रिटेलर्सना डिजिटल व्यवहार करण्यास मदत करेल व आपले हिशेब व देण्या-घेण्याचे व्यवहार अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास मदत करेल. कस्टमर खातामुळे दुकानदारांना सर्व व्यवहारांची डिजिटल नोंद करता येईल, ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने पेमेंट रिमाइंडर्स पाठवता येतील-जेणेकरून त्यांना वेळच्यावेळी येणी वसूल करता यावीत व त्यानुसार तयार करण्यात आलेले रिपोर्टस् पाहताही येतील.

इतकेच नव्हे तर अनेक लहान उद्योगांचे पुरवठा व्यवस्थापन चांगले नसते. माल खरेदीसाठी त्यांना अनेकदा अव्वाच्या सव्वा पैसे भरावे लागतात,जे घाऊक किंमतीपेक्षा कितीतरी जास्त असतात. यामुळे अंतिमत:तोटा पदरी येतो. ही समस्या सोडविण्यासाठी पेनियरबाय निओदुकान एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म म्हणूनही काम करेल, जिथे दुकानदारांना बिग बास्केट, आयटीसी, उन्नती असे घाऊक मालखरेदीचे विविध पर्याय एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतील. सध्या डिजिटल तंत्रज्ञान पुरविणामरी कोणताही कंपनी एका एकीकृत मंचावर मालाची घाऊक मागणी नोंदविण्याचे अनेक पर्याय देत नाही. शिवाय आपल्या कार्यतत्परतेमुळे हे ॲप ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वेळच्यावेळी आणि वाजवी दरात वस्तू मागविण्याची क्षमता मिळवून देईल.

याप्रसंगी बोलताना पेनियरबायचे संस्थापक, एमडी आणि सीईओ आनंद कुमार बजाज म्हणाले, “आमच्या रिटेल पार्टनर्सना आपल्या आयुष्यात अखंड प्रगती करता यावी यासाठी त्यांची मदत करणार पेनियरबाय निओदुकान ॲप सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. किरकोळ विक्री हा भारताच्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे, कारण किरकोळ विक्रीची दुकाने आणि स्थानिक समाज यांच्यामधील परस्पर नाते खोलवर रुजलेले असते. भारताची भरभराट आणि विकास व्हायचा असेल तर किरकोळ विक्रीकेंद्रांना आजच्या वेगाने बदलत्या अर्थव्यवस्थेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ती सर्व मदन आणि संसाधने उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. ‘पेनियरबाय निओदुकान’  हा असाच एक प्रयत्न आहे, जो किरकोळ विक्रेत्यांची आर्थिक समावेशकता आणि आस्थिक स्वास्थ्य जपण्याशी कटिबद्ध आहे.“

‘निओ’ या शब्दाचा अर्थच परिवर्तन असा होतो, त्यानुसार पेनियरबाय निओ दुकान (PayNearby NeoDukaan) ही सुविधा म्हणजे व्यापक किरकोळ विक्रेता समाजासाठी एक क्रांतीकारी परिवर्तन ठरणार आहे. ही सेवा त्यांना नवा ग्राहकवर्ग मिळविण्याची संधी देणार आहे, विद्यमान ग्राहकांशी अधिक चांगले नाते निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे व त्यांच्या कामकाजाचा खर्चही कमी करणार आहे. यामुळे देशाच्या अंतर्गत भागामध्ये, सर्वदूर डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार होणार आहे व ‘डिजिटल भारताचे’ स्वप्न वास्तवाच्या आणखी निकट येणार आहे. पेनियरबाय निओ दुकान देशातील प्रत्येक दुकानाचा चेहरामोहरा बदलणार आहे व प्रत्येक दुकानाला नव्या युगासाठी सज्ज करणार आहे.

एक संस्था म्हणून पेनियरबायला (PayNearby NeoDukaan) किरकोळ विक्रेता समाजाशी खोलवर रुजलेल्या आपल्या सहजीवनाच्या नात्याची जाण आहे व पेनियरबाय निओदुकानच्या साथीने आम्हाला आमच्या किरकोळ विक्रेत्यांची प्रगती साधून द्यायची आहे. आरएएससीआयशी साधलेल्या सहयोगामुळे आमच्या रिटेल पार्टनर्सना आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक ते सर्व काही मिळू शकेल. हीआहे आमची ‘जिद आगे बढने की’!एक अशी जिद्द जी भारतातील प्रत्येक दुकानाला आधुनिक रुपडे देईल, त्याला डिजिटली सक्षम बनवेल व भविष्यासाठी सज्ज करेल.”

याखेरीज कंपनीने २०२५ पर्यंत १०० दशलक्ष रिटेलर्सच्या ऑन-बोर्डिंगचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आखले आहे. पेनियरबाय निओदुकानची रचना ही किरकोळ विक्रेत्यांचा एक संपूर्ण नवा गट पेनियरबायकार्यकक्षेत आणण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.