ॲटलास कॉप्को तर्फे न्युमाटेकची भारतात सुरूवात

न्युमॅटेक हा ब्रॅन्ड आघाडीचा एअर ट्रिटमेंट आणि गॅस जनरेशन उपकरणांचा उत्पादक ब्रॅन्ड असून ॲटलास कॉप्को ग्रुपच्या या ब्रॅन्ड चे अस्तित्व हे जगभरात आहे. त्यांची विक्री, ग्राहक सेवा आणि सहकार्य देण्यात जागतिक पोहोच तसेच जगभरात १५ हून अधिक उत्पादन केंद्रे आणि ६ उत्पादन केंद्रे आहेत.

  नवी दिल्ली : कॉम्प्रेसर्स, व्हॅक्युम सोल्युशन्स, जनरेटर्स,पंप्स, पावर उपकरणे आणि ॲसेम्ब्ली सिस्टम्स चे आघाडीचे उत्पादक असलेल्या ॲटलास कॉप्को ने आज भारतात त्यांच्या नवीन ब्रॅन्ड असलेल्या न्युमाटेकची सुरूवात केल्याची घोषणा केली, जागतिक स्तरावरील ब्रॅन्डच्या कार्याला ५५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी हा ब्रॅन्ड सुरू केला आहे.

  न्युमॅटेक हा ब्रॅन्ड आघाडीचा एअर ट्रिटमेंट आणि गॅस जनरेशन उपकरणांचा उत्पादक ब्रॅन्ड असून ॲटलास कॉप्को ग्रुपच्या या ब्रॅन्ड चे अस्तित्व हे जगभरात आहे. त्यांची विक्री, ग्राहक सेवा आणि सहकार्य देण्यात जागतिक पोहोच तसेच जगभरात १५ हून अधिक उत्पादन केंद्रे आणि ६ उत्पादन केंद्रे आहेत.

  न्युमाटेक ब्रॅन्ड अंतर्गत विक्री आणि सेवा देण्यात येणारी उत्पादने ही उर्जा बचत करणार्‍या व पर्यावरणस्नेही उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. पर्यावरणावर सर्वाधिक परिणाम करणारी गोष्ट म्हणजे कार्बन फूट प्रिंट असून ते कमी करण्याचे काम न्युमाटेक ची उत्पादने करतात. नवीन उत्पादनासाठी चा प्रत्येक प्रकल्प हा उत्पादना मुळे होणारा कार्बन चा परिणाम कमी करण्यासाठी तयार करण्यात येतो.

  न्युमाटेक मुळे भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांना कॉम्प्रेस्ड एअर सिस्टम साठी लागणार्‍या उर्जेत बचत करणे शक्य होणार आहे. त्याच बरोबर कॉम्प्रेस्ड एअर उपकरणांचे जीवनमान वाढून उर्जा बचत तर होणार आहेच पण कार्बन फूट प्रिंट ही कमी होण्यास मदत होईल.

  ॲटलास कॉप्को च्या ब्रॅन्ड पोर्टफोलिओ चे जनरल मॅनेजर ॲन्डी प्रभाकर यांनी सांगितले “ ॲटलास कॉप्को मध्ये आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांना उर्जा बचत करणारी उपकरणे उपलब्ध करण्यावर जोर देत असतो आणि न्युमाटेक भारतीय बाजारपेठेत आणून आम्ही आता आमच्या ग्राहकांना शाश्वत उत्पादकता आणि अधिक फायदा मिळवण्यास सक्षम करत आहोत. न्युमाटेक ची सुरूवात करून आम्ही आमच्या कॉम्प्रेस्ड एअर ट्रिटमेंट क्षेत्रातील ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाने अत्याधुनिक उत्पादने देण्याबरोबरच विभागातील सर्वोत्कृष्ट उत्पादने कामाच्या गरजेनुसार उपलब्ध करून देत आहोत.”

  न्युमाटेकची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय यांमुळे बाजारपेठेतील कंपन्यांना स्वच्छ, कोरडी हवा आणि वायू तर उपलब्ध केले जातातच पण त्याच बरोबर ऑटोमोटिव्ह, टेक्स्टाईल, पावर जनरेशन, तेल आणि वायू, खाद्य आणि शीतपेय व इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातही उपलब्ध केली जातात.