Power generation by speed breaker; Students of Sinhagad Institute invented the device

आजच्या आधुनिक युगात काहीही अशक्य नाही. नव्या पिढीचे विद्यार्थी रोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी करत आहेत. ज्यामुळे जीवनशैली सुलभ होत आहे. असाच एक शोध पुण्यातील सिंहगड इंस्टिट्युटअंतर्गत चालविल्या जाणार्‍या वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यांनी असे यंत्र तयार केले आहे ज्यामुळे स्पीड ब्रेकर म्हणजेच गतिरोधकामधून वीज तयार होईल. या महाविद्यालयाच्या टीमला या मॉड्यूलचे पेटंटही मिळाले आहे. सिंहगड इन्सिट्यूटच्या विविध तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये यासारख्या नाविन्यपूर्ण संशोधनांसह अनेक उपक्रम नेहमीच चालविली जातात.

    पुणे : आजच्या आधुनिक युगात काहीही अशक्य नाही. नव्या पिढीचे विद्यार्थी रोज नवनवीन आणि अनोख्या गोष्टी करत आहेत. ज्यामुळे जीवनशैली सुलभ होत आहे. असाच एक शोध पुण्यातील सिंहगड इंस्टिट्युटअंतर्गत चालविल्या जाणार्‍या वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लावला आहे. त्यांनी असे यंत्र तयार केले आहे ज्यामुळे स्पीड ब्रेकर म्हणजेच गतिरोधकामधून वीज तयार होईल. या महाविद्यालयाच्या टीमला या मॉड्यूलचे पेटंटही मिळाले आहे. सिंहगड इन्सिट्यूटच्या विविध तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये यासारख्या नाविन्यपूर्ण संशोधनांसह अनेक उपक्रम नेहमीच चालविली जातात.

    वेणूताई चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र शाखेच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा एखादे वाहन या स्पीड ब्रेकरवरुन जाते तेव्हा ‘पोटेन्शिअल एनर्जी’ तयार होईल, तीला या अनोख्या यंत्राद्वारे ‘काइनॅटिक एनर्जी’ मध्ये रूपांतरित केली जाऊ शकते. वीज निर्मितीच्या बाबतीत हे यंत्र क्रांतिकारक ठरेल. प्रकल्प मार्गदर्शक मिनल आर. माजगे यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोख्या संशोधकांच्या टीममध्ये प्रथमेश भिडे, प्रणय बार्शीकर, सुमित मोहिते आणि कल्पेश मेदनकर यांचा समावेश आहे.

    या प्रकल्पाच्या संदर्भात मीनल माजगे यांनी नमूद केले की, वीज निर्मिती करणार्‍या प्लेट्स स्पीड ब्रेकरखाली बसविण्यात आल्या आहेत. जेव्हा वाहन या स्पीड ब्रेकरवरुन जाते, तेव्हा टिल्ट प्लेट्सवर दबाव येतो आणि वाहन गेल्यानंतर या प्लेट्सची उंची वाढते, परिणामी पोटेन्शिअल उर्जा वाढते. या प्रक्रियेत, शाफ्ट-व्हील प्रकारच्या यंत्रणा शाफ्टमधून लीव्हर क्रँक करतात. याच्या बदल्यात रीकॉइल स्प्रिंग्सने लावलेल्या गीअरला शाफ्ट फिरवते. या प्रक्रियेशी संबंधित डायनामो गतीशील उर्जेला वीजेमध्ये रूपांतरित करते.
    वीज निर्मितीत क्रांती होईल

    अशा रिंबल स्ट्रिपवर, 10 सेमी उंचीपर्यंत 1000 किलो वजनाची वाहने सुमारे 0.98 किलोवॅट उर्जा उत्पादन करतात. अशाप्रकारे, व्यस्त महामार्गावरील एक स्पीड ब्रेकर, जेथे दर मिनिटास सरासरी 100 हून अधिक वाहने जातात, दर मिनिटाला सुमारे एक किलोवॅट वीज तयार करतात. दिवसाच्या अखेरीस उत्पादित विजेचे प्रमाण बरेच मोठे असेल. विशेष म्हणजे थर्मल किंवा हायड्रो पॉवरमध्ये वीज निर्मिती केल्यास ही वीज बरीच स्वस्त असेल, असेही त्यांनी सांगितले. एम.एन. नवले, संस्थापक सचिव डॉ.सुंदा नवले, वेणूताई पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मृणिनीनी जाधव, उपप्राचार्य प्रा. सुजाता बियाणी यांनी यशस्वी संघाचे कौतुक केले.