PUBG : New State या दिवशी भारतात होणार लाँच, 50 मिलियनहून अधिक लोकांनी केलंय प्री-रजिस्ट्रेशन

PUBG: New State गेम 2051 वर आधारित आहे आणि स्मार्टफोनमध्ये गेम खेळणाऱ्यांसाठी नेक्स्ट जनरेशनच्या बॅटल रॉयल एक्सपिरियन्सला घेऊन दाखल होणार आहे. या गेममध्ये नवीन गनप्ले सिस्टिमसह नवीन रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजीचाही समावेश असणार आहे. PUBG: New State हा PUBG स्टुडिओद्वारे तयार करण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली : Krafton चा मोबाइल गेम PUBG: New State ची रिलीज तारीख जवळ येऊन ठेपली आहे. Krafton ने आज एका इव्हेंटमध्ये शोकेस दरम्यान घोषणा करण्यात आली की, PUBG: New State 11 नोव्हेंबरमध्ये येणार आहे. पब्जी: न्यू स्टेट अँड्रॉईड आणि iOS युझर्ससाठी येणार आहे. हा २९ ऑक्टोबरपासून ३० ऑक्टोबरपर्यंत आयोजित होणाऱ्या 28 देशांमध्ये एका टेक्निकल टेस्टिंगनंतर जारी करण्यात येईल. PUBG: New State ची घोषणा या वर्षी फेब्रुवारीत करण्यात आली होती. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर या गेमसाठी 50 मिलियनहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन करण्यात आली आहेत.

    PUBG: New State साठी प्री-रजिस्ट्रेशन सप्टेंबरमध्येच सुरू झाली होती. Krafton सांगितलं की, नवीन गेम जागतिक स्तरावर 17 भाषांमध्ये एक फ्री टू प्ले मोबाइल गेम म्हणून येणार आहे. गेम मेकर्स बहरिन, जपान, जॉर्डन, कोरिया, कुवेत, लाओस, लेबनॉन, मकाओ, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाल, ओमान, श्रीलंका, तैवान, थायलंड, तुर्की, युएई, फिलिपाईन्स, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, यमन, कंबोडिया, ईजिप्त, हाँगकाँग, इंडोनेशिया आणि इराक सारख्या 28 देशांत फाईन टेक्निकल टेस्ट होतील.

    PUBG: New State गेम 2051 वर आधारित आहे आणि स्मार्टफोनमध्ये गेम खेळणाऱ्यांसाठी नेक्स्ट जनरेशनच्या बॅटल रॉयल एक्सपिरियन्सला घेऊन दाखल होणार आहे. या गेममध्ये नवीन गनप्ले सिस्टिमसह नवीन रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजीचाही समावेश असणार आहे. PUBG: New State हा PUBG स्टुडिओद्वारे तयार करण्यात येणार आहे. Krafton चे सीईओ CH Kim ने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘PUBG: New State मध्ये PUBG IP चा मुख्य भाग आहे आणि तो जागतिक बाजारपेठेत खूप लोकप्रिय होईल.’

    क्रिएटिव्ह डायरेक्टर Daehun Kim म्हणाले की, PUBG: New State ओरिजन गेमप्ले फीचर्सच्या माध्यमातून बॅटल रॉयल गेम पुढे नेण्याची इच्छा आहे. यात वेपन कस्टमायझेशन, ड्रोन स्टोर आणि युनिक प्लेअर रिक्रुटमेंट सिस्टिमचा समावेश आहे. गेममध्ये 4 युनिक मॅप्स देण्यात येतील, ज्यात फ्यूचर सेट ट्राय आणि आणि फ्रँचायझी स्पेशल एरेंजल देण्यात आले आहेत. या गेममध्ये नवीन कंटेंन्टचा उत्कृष्ट गेमप्ले आणि गेमप्ले बॅलन्स असेल जो सीझन बेस्ड सर्व्हिस म्हणून देण्यात येईल.

    PUBG: New State मध्ये फसवणुकीवर मर्यादा घालण्यासाठी पबजी स्टुडिओत अँटी-फसवणूक युनिटचे मुख्याधिकारी Sangwan Kim म्हणाले की, Krafton अनधिकृत प्रोग्राम्स, एमुलेटर, कीबोर्ड आणि माऊसच्या वापरावर बंदी आणेल. सोबतच हॅक झालं की नाही याचाही शोध घेण्यात येणार असून त्यावरही बंदी घालण्यात येईल. कंपनीचा दावा आहे की, ती कम्युनिटी फीडबॅकवर फोकस करते आहे आणि त्यानंतर या गेम अपडेट्सच्या माध्यमातून ते दाखविण्याचे आश्वासनही देत आहे.