आधीच बँकांचा जाच आणि आता RBI ही मांडणार नवा खेळ; जाणून घ्या सविस्तर

ऑनलाईन शॉपिंगची चटक लागलेल्यांना आता नवा फंडा अवलंबावा लागणार आहे. ऑनलाईन शॉपिंग करतेवेळी वेळी एखाद्या वेबसाईटवर पहिल्यांदा सर्व डिटेल्स भरल्यानंतर दुसऱ्यावेळी ते पुन्हा सर्वच डिटेल्स भरावे लागत नाहीत. पण आता यात बदल होऊ शकतात.

  • स्टोर नाही करू शकणार कार्ड डिटेल्स
  • एकाहून अधिक कार्ड्सचा वापर करणाऱ्यांना होणार मनस्ताप

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक समीकरणं बदलली आहेत. बँकेच्या सेवा (banking services) देण्याच्या नियमांतही बदल (rules changes) होऊ लागले आहेत. बँकांचे अनेक नियमही ग्राहकांना जाचक वाटू लागले आहेत. मग अनेकांनी ऑनलाईन शॉपिंग करण्याला पसंती दिली आणि बँकेच्या या जाचातून ग्राहकांनी सुटका करून घेतली. पण हा आनंद आता रिझर्व्ह बँकेने (RBI) हिरावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एकाहून अधिक कार्ड्सचा वापर करणाऱ्यांना होणार मनस्ताप

ऑनलाईन शॉपिंगची चटक लागलेल्यांना आता नवा फंडा अवलंबावा लागणार आहे. ऑनलाईन शॉपिंग करतेवेळी वेळी एखाद्या वेबसाईटवर पहिल्यांदा सर्व डिटेल्स भरल्यानंतर दुसऱ्यावेळी ते पुन्हा सर्वच डिटेल्स भरावे लागत नाहीत. पण आता यात बदल होऊ शकतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर 16 अंकी असतो आणि प्रत्येक जण हा नंबर लक्षात ठेवू शकत नाही. विशेषत: असे लोक जे एकाहून अधिक कार्ड्सचा वापर करतात.

आता भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI च्या नव्या नियमांनुसार, कार्डवरील 16 अंकी नंबर लक्षात ठेवावा लागू शकतो. जानेवारी 2022 मध्ये पेमेंटसंबंधी एक महत्त्वपूर्ण नियम बदलू शकतो तसेच डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर प्रत्येकवेळी हा नंबर टाकावा लागू शकतो.

RBI च्या डेटा स्टोरेज पॉलिसीच्या सुधारित गाइडलाइन्सबाबत तयार आहेत, ज्या जानेवारी 2022 पासून लागू होऊ शकतात. सुधारित नियमामध्ये पेमेंट अ‍ॅग्रिगेटर आणि अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, नेटफ्लिक्स इत्यादी व्यापाऱ्यांना त्यांच्या सर्व्हर किंवा डेटाबेसवर ग्राहकांच्या कार्डची माहिती स्टोर करण्यास मनाई असेल.

पेमेंट गेटवे कंपन्यांसाठी ठरणार डोकेदुखी

नव्या नियमांनुसार, ऑनलाईन व्यापारी, ई-कॉमर्स वेबसाईट आणि पेमेंट अ‍ॅग्रिगेटर्सला ऑनलाईन ग्राहकांचे कार्ड डिटेल्स संग्रहित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुमचं कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू अर्थात CVV टाकण्याऐवजी ग्राहकांना प्रत्येकवेळी सर्व कार्ड डिटेल्स नाव, कार्ड नंबर आणि कार्ड व्हॅलिडिटी टाकावी लागेल. त्यामुळे या कंपन्यांच्या डोकेदुखीबरोबरच ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, सध्या कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवर 16 अंकी कार्ड नंबर सारखा टाकावा लागत नाही. म्हणजेच ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही दुसऱ्यांदा पेमेंट करताना केवळ CVV आणि OTP टाकावा लागतो. सध्या ग्राहकाचे डिटेल्स डेटाबेसवर सेव्ह राहतात. यापुढे तसे सेव्ह करण्यास वेबसाईटला परवानगी देण्यात येणार नाही.