RBI चा इशारा! कोणी KYC अपडेट्ससाठी माहिती मागितल्यास फोन लगेच करा डिस्कनेक्ट; अन्यथा बँक खातं रिकामं झाल्यास त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल

आरबीआयने याबाबत ग्राहकांना काही सावधगिरी बाळगून स्वत:ला कसं सुरक्षित ठेवता येईल याबाबत सूचना दिल्या आहेत. RBI ने आपल्या या जागरुकता अभियानाला 'RBI सांगतंय... जागरुक राहा, सावध राहा' अशी टॅगलाईन दिली आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोना काळात ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ऑनलाईन व्यवहारात वाढ झालेली असताना, दुसरीकडे ऑनलाईन बँकिंग फ्रॉडचेही प्रमाण वाढतेच आहे. गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. अनेक लोक कमी माहिती किंवा बेजबाबदारपणामुळे स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेकदा फेक माहितीमुळेही युजर्सचं बँक अकाऊंट खाली होतं.

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना अशाप्रकारच्या फ्रॉडबाबत इशारा दिला आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी थोडी सतर्कता दाखवल्यास, बँक फ्रॉडपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो. आरबीआयने याबाबत ग्राहकांना काही सावधगिरी बाळगून स्वत:ला कसं सुरक्षित ठेवता येईल याबाबत सूचना दिल्या आहेत. RBI ने आपल्या या जागरुकता अभियानाला ‘RBI सांगतंय… जागरुक राहा, सावध राहा’ अशी टॅगलाईन दिली आहे.

    RBI ने फ्रॉडपासून वाचण्यासाठी दिल्या सूचना

    • RBI ने सांगितलं की, काही सेकंदात सायबर फ्रॉड केले जातात. त्यामुळे ग्राहकांनी आपली पर्सनल माहिती कार्ड डिटेल्स, बँक अकाउंट, पॅन आधार नंबर असा कोणताच डेटा कोणाशीही शेअर करू नका.
    • अनेक फ्रॉड करणारे स्कॅमर्स, बँकेचे कर्मचारी असल्याचं सांगत बोलण्यात गुंतवून तुमच्या अकाऊंटशी संबंधित सर्व माहिती काढून घेतात. त्यानंतर अकाऊंट खाली झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
    • त्यामुळे बँकेची कोणतीही माहिती कोणलाही देऊ नका.
    • त्याशिवाय, रिझर्व्ह बँकेने KYC डिटेल्सही कोणाशी शेअर न करण्यास सांगितलं आहे.
    • KYC च्या नावानेही अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. या कारणानेही ग्राहकांकडून बँक डिटेल्स मागितले जातात.
    • चुकूनही असं कोणाच्याही बोलण्यता येऊन त्याला सर्व डिटेल्स देऊ नका, अन्यथा मोठा फटका बसू शकतो.
    • फोन कॉल करुन एखाद्याकडून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक अकाउंट नंबर, CVV किंवा OTP संबंधी कोणतेही प्रश्न विचारले जात असल्यास, असा कॉल त्वरित डिस्कनेक्ट करा.