realme launches smartwatches Earphones on 23rd december 2020
रियलमीची २३ डिसेंबरला लाँच होणार ही दोन प्रॉडक्ट्स; क्लिक करा आणि जाणून घ्या

अपकमिंग प्रोडक्ट्सच्या लाँचिंगची माहिती रियलमी इंडियाचे हेड माधव शेठ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

रियलमीची नवीन स्मार्टवॉच आणि नवीन वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्सची उत्सुकता असलेल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. कंपनी २३ डिसेंबर रोजी आपले दोन नवीन प्रोडक्ट रिअलमी बड्स एअर प्रो मास्टर एडिशन टीडब्ल्यूएस इअरबड्स आणि रिअलमी वॉच एस प्रोला लाँच करणार आहे. या अपकमिंग प्रोडक्ट्सच्या लाँचिंगची माहिती रियलमी इंडियाचे हेड माधव शेठ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

रियलमी वॉच एस प्रो

रियलमीने आपल्या वॉच एसला आधीच पाकिस्तान आणि युरोपमध्ये लाँच केलेले आहे. आता कंपनी युजर्संसाठी या वॉचला प्रो एडिशनमध्ये आणणार आहे. फीचर्सचा विचार केल्यास रियलमी वॉच एस प्रो मध्ये १.३९ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले ४५४ं X ४५४ पिक्सल रेझोल्युशनसोबत येणार आहे. वॉचचा डायल स्टेनलेस स्टील असणार आहे. वॉचच्या उजव्या बाजूला बटण मिळणार आहे. प्रो मॉडलमध्ये १५ स्पोर्ट्स मोड्स मिळणार आहे. हे वॉच खास जीपीएस फीचरसोबत येणार आहे.

रियलमी वॉच एस प्रोचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १४ दिवसांची बॅटरी लाईफसोबत ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट रेट मॉनिटरींग फीचर मिळणार आहे. कंपनीने जे प्रमोशनल इमेज शेयर केले आहे. त्यात या वॉचला ब्राउन लेदर स्ट्रॅप सोबत पाहिले जाऊ शकते. याशिवाय हा फोन ब्लॅक, ऑरेंज आणि ब्लू सिलिकॉन स्ट्रॅपमध्ये येणार आहे.

रियलमी बड्स एअर प्रो मास्टर एडिशन

रियलमी सध्या आपल्या हिट प्रोडक्ट्सचे मास्टर एडिशन लाँच करणार आहे. कंपनीने आतापर्यंत प्रसिद्ध स्मार्टफोन्स एक्स, रियलमी एक्स २ प्रो आणि रियलमी एक्स ५० चे मास्टर एडिशन्सला लाँच केलेले आहे. रियलमी बड्स एयर प्रो, स्मार्टफोन्स शिवाय कंपनीचे पहिले असे प्रोडक्ट्स आहे. जे मास्टर एडिशन लाँच करीत आहे.

रियलमी वॉच च्या प्रो आणि स्टँडर्ड व्हर्जन मध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे कलरचा आहे. वॉचचा स्टँडर्ड व्हर्जन रॉक ब्लॅक आणि सोल व्हाइट मध्ये येते. तर प्रो एडिशनला कंपनी ग्लॉसी फिनिशनचा सिल्वर कलर ऑप्शन मध्ये लाँच करणार आहे.