स्नॅपड्रॅगन 895 प्रोसेसरसह येणार रियलमीचा जबरदस्त स्मार्टफोन; लवकरच Realme GT 2 होऊ शकतो लाँच

रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. Snapdragon 895 अजून लाँच देखील झाला नाही. हा नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप प्रोसेसर यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो.

    काही दिवसांपूर्वी रियलमीने एक फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT नावाने लाँच केला होता. काही दिवसांपूर्वी रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर Realme GT 2 दिसला होता. आता रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी चिनी सोशल मीडिया साईट विबोवरून कंपनी Realme GT 2 वर करत असल्याची माहिती दिली आहे.

    रियलमीचे प्रेजिडेंट वांग वेई डेरेक यांनी Weibo वरून सांगितले आहे कि, Realme GT 2 मध्ये Snapdragon 895 देण्यात येईल. Snapdragon 895 अजून लाँच देखील झाला नाही. हा नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप प्रोसेसर यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे Realme GT 2 हा स्मार्टफोन Snapdragon 895 सह सादर होणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो, अशी चर्चा आहे.

    Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.