6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट ; जाणून घ्या

Redmi 9 Power बँक ऑफर्सचा वापर करून 9,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या ऑफर्स 17 ऑक्टोबर पर्यंत वैध आहेत. यासाठी हा फोन विकत घेताना Axis आणि Citi Bank च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. लाँचच्या वेळी हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता. 

    शाओमीने या वर्षीच्या सुरुवातीला बजेट सेगमेंटमध्ये Redmi 9 Power हा स्मार्टफोन सादर केला होता. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी आहे. आता Amazon वर सुरू असलेल्या Great Indian Festival सेल अंतर्गत या फोनवर डिस्काउंट मिळत आहे.

    Redmi 9 Power बँक ऑफर्सचा वापर करून 9,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या ऑफर्स 17 ऑक्टोबर पर्यंत वैध आहेत. यासाठी हा फोन विकत घेताना Axis आणि Citi Bank च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. लाँचच्या वेळी हा स्मार्टफोन 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता.

    रेडमी 9 पावरमध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो.