Exam मध्ये चिटिंगचा ‘हायटेक’ जुगाड, चप्पलमध्ये लावलेली चिप आणि ब्लूटूथची किंमत ६ लाख, ६ अटकेत

शिक्षक पात्रता चाचणी (REET) च्या अगोदरच राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) तीन परीक्षकांसह सहा जणांना ब्लूटूथ साधने बसवलेल्या चप्पलमधून कॉपी केल्याबद्दल अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईलला जोडलेल्या चप्पलमध्ये लपवलेल्या ब्लूटूथ आणि चिपद्वारे परीक्षेत कॉपी करण्याचा विचार करत होते.

    बिकानेर : राजस्थानमध्ये (Rajasthan) कडेकोट बंदोबस्तात रविवारी झालेल्या राजस्थान शिक्षक पात्रता चाचणी (REET) दरम्यान, काहीतरी घडले हे जाणून सर्वांना आश्चर्य वाटले. पोलिसांनी परीक्षा सुरू असतानाच हायटेक कॉपीकॅटला अटक केली आहे. कॉपी करणाऱ्यांनी REET परीक्षेदरम्यान (Rajasthan REET Exam 2021) कॉपी करण्यासाठी अशी योजना आखली होती की, पोलीसही चक्रावून गेले, तरी परीक्षेपूर्वीच कॉपीकॅट टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली.

    चप्पलमध्ये बसवण्यात आली होती ब्लूटूथ आणि चिप

    शिक्षक पात्रता चाचणी (REET) च्या अगोदरच राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) तीन परीक्षकांसह सहा जणांना ब्लूटूथ साधने बसवलेल्या चप्पलमधून कॉपी केल्याबद्दल अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईलला जोडलेल्या चप्पलमध्ये लपवलेल्या ब्लूटूथ आणि चिपद्वारे परीक्षेत कॉपी करण्याचा विचार करत होते.

    ६ लाखांना विकत होते चप्पल

    गंगाशहर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, या बहाद्दरांनी संपूर्ण प्रदेशात कॉपी करण्याचं हे हायटेक डिव्हाइस विकलं आहे. तथापि, चप्पल विकत घेणाऱ्या २५ जणांची पोलिसांना ओळख पटली आहे. रिपोर्टनुसार या चप्पलची किंमत ६ लाख रुपये ठेवण्यात आली होती.

    बस स्टँडजवळ आरोपींना अटक

    बिकानेरच्या पोलीस अधीक्षक प्रीती चंद्रा यांनी माहिती दिली आहे की, हे लोक चप्पलमध्ये ब्लूटूथ यंत्र बसवून परीक्षेत फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी त्रिलोक, ओमप्रकाश, मदन गोपाल, राम आणि किरण देवी यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोबाईल सिम कार्ड, ब्लूटूथ डिव्हाइस आणि इतर साधनेही जप्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. परीक्षा सुरू झाल्यानंतर आरोपींना गंगाशहरच्या नवीन बस स्टँडजवळून अटक करण्यात आली आहे.