रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने लाँच केले डिजिटल केअर मॅनेजमेंट, या प्रकारचे पहिलेच ओपीडी प्रोडक्ट सादर

भारतातील उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीत प्रत्येक ऋतू आपल्यासोबत काही आजार व रोग घेऊन येतो. त्यात साध्या सर्दी तापापासून ते डोळ्यांना होणाऱ्या संसर्गांचा समावेश आहे, यापैकी बहुतेक आजारांसाठी हॉस्पिटमध्ये दाखल होण्याची गरज नसते, पण डॉक्टरांकडे वारंवार जावे लागू शकते, निदान चाचण्या करून घ्याव्या लागू शकतात किंवा औषधांशी संबंधित खर्च होऊ शकतो.

  मुंबई : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि. (आरजीआयसीएल) यांच्यातर्फे आज रिलायन्स – डिजिटल केअर मॅनेजमेंट, हे अशा प्रकारचे पहिलेच ओपीडी प्रोडक्ट सादर केले. बाह्यरुग्ण उपचारांसाठी येणाऱ्या नियमित वैद्यकीय खर्चासाठी पॉलिसीधारकाला संरक्षण उपलब्ध करून देणे हे या प्रोडक्टचे उद्दिष्ट आहे. इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या चौकटीतील मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत एक आदर्श व नवा पायंडा पाडणारी ऑफरिंग म्हणून या प्रोडक्टची निवड करण्यात आली आहे.

  भारतातील उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीत प्रत्येक ऋतू आपल्यासोबत काही आजार व रोग घेऊन येतो. त्यात साध्या सर्दी तापापासून ते डोळ्यांना होणाऱ्या संसर्गांचा समावेश आहे, यापैकी बहुतेक आजारांसाठी हॉस्पिटमध्ये दाखल होण्याची गरज नसते, पण डॉक्टरांकडे वारंवार जावे लागू शकते, निदान चाचण्या करून घ्याव्या लागू शकतात किंवा औषधांशी संबंधित खर्च होऊ शकतो.

  कोव्हिड-19 महामारीमुळे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे कालानुक्रमे ओपीडी खर्चांमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या खर्चांसाठी सरासरी भारतीय वर्षाला सुमारे ₹5000 ते ₹10,000 खर्च करू लागला आहे. डिजिटल केअर मॅनेजमेंट पॉलिसीसह अशा स्वतःच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चांसाठी ग्राहकांना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  या पॉलिसीच्या अंतर्गत अनेक प्रकारचे लाभ मिळतात, ज्यात अमर्यादित फिजिशिअन कन्सल्टेशन, फार्मसी/औषधाचा खर्च, निदान चाचण्यांचा खर्च आणि दातांसाठी व नेत्रचिकित्सेसाठीच्या खर्चांपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात येते. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे ईडी व सीईओ श्री. राकेश जैन म्हणाले, “कोव्हिड-19 च्या परस्थितीत विषाणूच्या भीतीमुळे लोक क्लिनिकमध्ये वा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेणे टाळत होते. परिणामी, टेलि-मेडिसीन, ऑनलाइन फार्मसी इत्यादी ओपीडी उपचारांसारख्या डिजिटल पद्धतींचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे डिजिटल केअर मॅनेजमेंटसारखी ओपीडी पॉलिसी सादर करणे अत्यावश्यक होते, ज्यायोगे नव्या युगातील टेक सॅव्ही भारतीयाला अशा खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चापासून संरक्षण मिळेल, आणि त्यासाठी उपचार पद्धतीची मर्यादा असणार नाही.”

  महामारीनंतर अनेकांना आरोग्याला असलेल्या धोक्यांपासून संरक्षण प्राप्त करण्याचे महत्त्व समजले आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना घेऊन संरक्षण मिळविण्यास ते इच्छुक आहेत. परंतु, त्यांच्यापैकी अनेक योजनांमध्ये बाह्यरुग्ण उपचारांसाठी संरक्षण मिळत नाही. खिशातून होणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण प्राप्त करण्यासाठी रिलायन्स डिजिटल केअर मॅनेजमेंट ही ग्राहकांसाठी महत्त्वाची भर समाविष्ट झाली आहे.

  हे प्रोडक्ट खास मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यात विमा पॉलिसीची रक्कम ₹1000 ते ₹5000 पर्यंत असू शकते आणि 18 ते 75 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. त्याचप्रमाणे आरजीआयच्या विद्यमान पॉलिसीधारकांना प्रीमिअमवर 5% डिस्काउंट मिळेल आणि ज्या ग्राहकांना कोव्हिड-19 वरील लस घेतली आहे त्यांना अतिरिक्त 5% डिस्काउंट मिळेल. ही पॉलिसी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सच्या वेबसाइटवरून थेट खरेदी करता येऊ शकते.

  पॉलिसीचा वापर वेगाने व सुरळीत व्हावा यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे ग्राहकांना कॅशलेस इन-क्लिनिक कन्सल्टेशन, कॅशलेस निदान, कॅशलेस मेडिसीन डिलिव्हरी, भरपाईचा दावा या सर्व पैलूंचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप उपलब्ध करून देईल.

  रिलायन्स जनरल इन्श्युरन्सबद्दल www.reliancegeneral.co.in रिलायन्स जनरल इन्श्युरन्स ही कंपनी रिलायन्स कॅपिटलचा भाग असून ही भारतातील एक आघाडीची इन्श्युरन्स कंपनी आहे. या कंपनीतर्फे मोटर विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा आणि गृह विमा इत्यादी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रोडक्ट्स ऑफर करण्यात येतात आणि प्रत्येक ग्राहकाची गरज भागविण्यासाठी सानुकूल उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येतात. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सची प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देण्यासाठी आणि रिटेल, कॉर्पोरेट व एसएमई क्लाएंट्सना सेवा प्रदान करण्यासाठी भारतभरातील 140 शाखा कार्यालयांमध्ये 53,000 हून अधिक मध्यस्थांचे विस्तृत नेटवर्क आहे.