Reliance General Insuranceने कस्टमरच्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देता यावा यासाठी सुरू केली स्पीचबॉट सुविधा

कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हचा (cse) प्रतिसाद मिळण्यास वेळ लागल्यामुळे कस्टमरला (custmer) मानसिक त्रास होतो. स्पीचबॉट (Speechbot) सुविधा सुरू केल्याने या समस्येचे निराकरण झाले आहे. जेव्हा कस्टमर आरजीआय सपोर्ट सेंटरला कॉल करतो तेव्हा कस्टमरने दिलेल्या काही इनपुट प्रतिसादांवरून स्पीचबॉट कस्टमरची ओळख निश्चित करतो आणि त्यांना जवळपास शून्य प्रतीक्षा कालावधीमध्ये तत्काळ आपल्या दाव्याची नोंदणी करता येते.

  मुंबई : रिलायन्स कॅपिटलची १००% उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे (RGI) त्यांच्या कॉल सेंटर आयव्हीआर सिस्टिमवर नुकतीच एआय-पॉवर्ड इंटेलिजंट व्हर्च्युअल असिस्टंट स्पीचबॉट (Speechbot) ही यंत्रणा लाँच करण्यात आली. स्पीचबॉटच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे तो कस्टमर्सना स्वयंचलित पद्धतीने ओळखतो आणि त्यांना त्यांचे मोटर दावे नोंदविण्यासाठी प्रत्यक्ष कॉल सेंटरच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करावी लागत नाही. हा सपोर्ट २४x७ उपलब्ध असून स्पीचबॉट विविध भाषांमध्ये कस्टमर्सना अजिबात प्रतिक्षा करायला न लावता दाव्याबद्दल सूचित करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो.

  मोटर इन्श्युरन्स उद्योगामध्ये, जेव्हा कस्टमरचे वाहन ब्रेकडाऊन होते किंवा वाहनाचे नुकसान होते तेव्हा कस्टमरतर्फे दाव्याबद्दल सूचित करण्यात येते. अशा परिस्थितीत जलद गतीने आणि परिणामकारकतेने सपोर्ट उपलब्ध होणे अत्यावश्यक असते. आजच्या घडीला, जेव्हा कस्टमर दाव्याविषयी सूचित करण्यासाठी सपोर्ट सेंटरला कॉल करतो, तेव्हा त्याला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते किंवा कॉल ड्रॉप होतो.

  कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हचा प्रतिसाद मिळण्यास वेळ लागल्यामुळे कस्टमरला मानसिक त्रास होतो. स्पीचबॉट (Speechbot) सुविधा सुरू केल्याने या समस्येचे निराकरण झाले आहे. जेव्हा कस्टमर आरजीआय सपोर्ट सेंटरला कॉल करतो तेव्हा कस्टमरने दिलेल्या काही इनपुट प्रतिसादांवरून स्पीचबॉट कस्टमरची ओळख निश्चित करतो आणि त्यांना जवळपास शून्य प्रतीक्षा कालावधीमध्ये तत्काळ आपल्या दाव्याची नोंदणी करता येते.

  स्पीचबॉटमुळे (Speechbot) दाव्याविषयीच्या माहिती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नुकसान प्रथम निदर्शनास आल्यावर त्या संदर्भातील डेटा गोळा करणे ही प्रक्रिया सोपी झाली आहे, कारण या इंटेलिजंट आणि व्हर्च्युअल असिस्टंटसह दाव्याविषयीचे मुद्देसूद प्रश्न विचारण्यात येतात आणि ते स्वयंचलित पद्धतीने विचारले जातात. त्यामुळे कस्टमरला अधिक सुविधाजनक अनुभवाची अनुभूती मिळते.

  याबद्दल रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे कार्यकारी संचालक आणि सीईओ राकेश जैन म्हणाले, “प्रक्रियेसमोरील समस्या सोडविताना रिलायन्स जनरल इन्श्युरन्समध्ये नेहमी ‘कस्टमरला प्राधान्य’ हा दृष्टिकोन ठेवला जातो. इन्श्युरन्सच्या बाबतीत दावे हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे आणि आजच्या तंत्रज्ञानाधारीत जगात कस्टमरला सुविधा आणि जलद गतीने काम होणे, याची अपेक्षा असते. म्हणूनच एआयचे पाठबळ लाभलेल्या एजंट म्हणजे Speechbotच्या साहाय्याने दाव्याविषयी सूचित करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. स्पीचबॉट (Speechbot) कस्टमरची समस्या जाणून घेतो आणि प्रतीक्षा करायला किंवा थांबून राहायला न लावता जलद व संबंधित प्रतिसाद देण्यासाठी संवाद साधतो. या तंत्रज्ञानामुळे कस्टरमला नैसर्गिक भाषेचा वापर करून संवाद साधता येतो. यासाठी सुविधाजनक व्हॉइस बेस्ड (आवाजावर आधारीत) चॅट इंटरफेस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यंत्रणा रिअल टाइम ‘स्पीच टू टेक्स्ट ट्रान्स्क्रिप्शन’ पद्धतीने काम करते आणि ही माहिती एपीआयच्या माध्यमातून कोअर यंत्रणेला पुरवते.”

  रिलायन्स जनरल इन्श्युरन्सच्या मोटर पॉलिसीधारकांसाठी क्लेम हेल्पलाइन क्रमांकावर फर्स्ट नोटिस ऑफ लॉससाठी (नुकसान प्रथम निदर्शनाल आल्यावर) २४x७ ही सेवा उपलब्ध आहे.

  Reliance General Insurance launches speechboat facility to respond to every customer call