रिलायन्सचा 5G स्मार्टफोन येतोय, मिळणार बरंच काही फ्री; किंमतही आहे फ्री सारखीच, याच महिन्यात होणार आहे घोषणा

मागील वर्षी कंपनीने गुगलसोबत जिओ 5G फोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती आणि यावर्षी अशी अपेक्षा आहे की, याला AGM मध्ये लाँच केले जाईल. हा 5G फोन अँड्रॉइडच्या फोर्कड व्हर्जनवर काम करेल आणि देशातील स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल.

  मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली आहे. यंदा Reliance AGM 2021 चे आयोजन 24 जून रोजी दुपारी 2 वाजता केले जाणार आहे. जे यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित (LIVE) केले जाईल. या AGM मध्ये, कंपनी कमी किंमतीच्या 5G स्मार्टफोन, जिओ 5 जीच्या लाँचिंगसह आणखी बऱ्याच घोषणा करण्याची शक्यता आहे.

  मागील वर्षी कंपनीने गुगलसोबत जिओ 5G फोन बाजारात आणण्याची घोषणा केली होती आणि यावर्षी अशी अपेक्षा आहे की, याला AGM मध्ये लाँच केले जाईल. हा 5G फोन अँड्रॉइडच्या फोर्कड व्हर्जनवर काम करेल आणि देशातील स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल. दुसरीकडे, जर अहवालांवर विश्वास ठेवला तर Jio 5G फोनची किंमत 2 हजार 500 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  जर सध्याच्या भारतातील सर्वात स्वस्त 5G फोनबद्दल बोलायचे झाले, तर त्याची किंमत 13 हजार 999 रुपये आहे आणि जिओ आता फक्त 2 हजार 500 रुपयांमध्ये 5G फोन आणण्याचा विचार करत आहे. जेणेकरून ते अधिकाधिक लोकांपर्यंत आणि 2 जी नेटवर्क युझर्सपर्यंत पोहोचण्याचा रिलायन्सचा मानस आहे.

  मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगितले होते की, जिओ 5G सेवा 2021 च्या मध्यात सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे आता अशी अपेक्षा आहे की, Reliance AGM 2021 मध्ये याची घोषणा केली जाईल.

  कंपनीला 5G चाचणीमध्ये यापूर्वीच 1 Gbps वेग मिळाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी पूर्ण 5G सोल्युशन तयार केले आहे आणि त्यामध्ये 100% स्वदेशी तंत्रज्ञान आणि सोल्युशन वापरले जाईल.

  Jio 5G फोन आणि Jio 5G सेवेसह, कंपनी ग्राहकांना स्वस्त दरातील JioBook लॅपटॉप देखील उपलब्ध करुन देऊ शकतात. त्यातील काही स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच लोकांसमोर आले आहे. असे म्हटले जात आहे की, हा लॅपटॉप कस्टम अँड्रॉइड व्हर्जनवर काम करेल आणि Qualcomm Snapdragon 665 चिपसेटवर चालणार आहे.

  यात 1366 × 768 रेझोल्युशनसह डिस्प्ले दिला जाऊ शकतो आणि यासह 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळू शकेल. यासह 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेले व्हेरियंटसुद्धा दिले जाऊ शकतात.

  reliance jio will launch 5g smartphone in just rs 2500 announcement to be made in reliance agm in this month