Samsung 110 inch Micro LED TV and take entertainment exquisite experience
सॅमसंगचा 110 इंची मायक्रो एलईडी टीव्ही घरी आणा आणि घ्या मनोरंजनाचा एक उत्तम अनुभव

सॅमसंगने याबाबत सांगितले आहे की, हा टीव्ही संयुक्त राज्य, अमेरिका, मध्य पूर्व आणि काही युरोपीयन देशांमध्ये विकण्याचे लक्ष्य आहे. परंतु यानंतर जागतिक स्तरावर या टीव्हीचा विस्तार केला जाईल.

सॅमसंग इलेक्टॉनिक्सने एक नवा मायक्रो एलईडी टीव्ही लाँच केला आहे. या माध्यमातून दक्षिण कोरियन टेक जायंटना आपल्या ग्राहकांना त्यांच्या घरी मनोरंजनाचा एक उत्तम अनुभव द्यायचा आहे. त्यामुळे सॅमसंगने 110 इंचाचा मायक्रो एलईडी टीव्ही लाँच केला असून याची किंमत 1 लाख 56 हजार 400 डॉलर असेल.

या टीव्हीच्या प्री-ऑर्डरला या महिन्यांच्या अखेरीस सुरुवात होणार आहे आणि 2021च्या पहिल्या तिमाहीमध्ये याची अधिकृत लाँचिंग होईल, अशी माहिती आहे. सॅमसंगने याबाबत सांगितले आहे की, हा टीव्ही संयुक्त राज्य, अमेरिका, मध्य पूर्व आणि काही युरोपीयन देशांमध्ये विकण्याचे लक्ष्य आहे. परंतु यानंतर जागतिक स्तरावर या टीव्हीचा विस्तार केला जाईल.

मायक्रो एलईडी टीव्हीत मायक्रोमीटर आकाराच्या एलईडी चिप्स सिंग्युलर पिक्सेलचा वापर केला आहे, ज्यामुळे चांगले रेझोल्यूशन आणि हायर क्लियारिटी मिळेल. सॅमसंगने पहिल्यांदा आपल्या वॉल एलईडी डिस्प्लेला 2018मध्ये द वॉल नाम ब्रांड अंतर्गत कमर्शियल उपयोगासाठी लाँच केला होता. परंतु तो होम सिनेमासाठी प्रोडक्ट देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, सॅमसंगने सांगितले की, ‘ते भविष्यात 70 इंचापासून 100 इंचापर्यंत स्क्रीन साइजचे मायक्रो एलईडी टीव्ही घेऊन येण्याचा विचार करत आहे. सॅमसंगचा नवा 110 इंचाचा मायक्रो एलईडी टीव्ही 3.3 वर्ग मीटर क्षेत्रमध्ये 8 मिलियनहून अधिक आरजीबी एलईडी चिप्सचा उपयोग केला आहे. जे4के रेझोल्यूशनची क्वालिटी देत आहे. यामध्ये एक मायक्रो एआई प्रोसेसरपण आहे.