सॅमसंग बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्ज बेकिंग व आरोग्‍यदायी कुकिंग करण्‍याप्रती तुमच्‍या आवडीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणार

जागतिक दर्जाच्‍या तंत्रज्ञानासह या सडपातळ व स्‍टायलिश दिसणा-या श्रेणीमध्‍ये क्‍लीन पिंक रंगामधील मॉडेल्‍सचा समावेश आहे आणि हे मॉडेल्‍स सर्वसमावशेक होम शेफ्सना बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍ने, कुरकुरीत, ऑईल-फ्री स्‍नॅक्‍स आणि स्टिम डिशेस् बनवण्‍याची सुविधा देतात. ही सुविधा यापूर्वी फक्‍त उच्‍चस्‍तरीय कन्‍वेक्‍शन मायक्रोवेव्‍ह मॉडेल्‍समध्‍येच होती.

  • २०२१ बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये पूर्वी फक्‍त उच्‍चस्‍तरीय कन्‍वेक्‍शन मायक्रोवेव्‍ह मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या वैशिष्‍ट्यांचा समावेश
  • नवीन श्रेणीमध्‍ये आकर्षक टच पॅनेल्स, ग्‍लास फि‍निश आणि अत्‍यंत सडपातळ डिझाइन; ही नवीन श्रेणी आकर्षक क्‍लीन पिंक रंगामध्‍ये उपलब्‍ध

नवी दिल्ली : सॅमसंग या भारताच्‍या सर्वात विश्‍वसनीय ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जच्‍या लाँचसह त्‍यांच्‍या किचन अप्‍लायन्‍सेस श्रेणीच्‍या विस्‍तारीकरणाची घोषणा केली. बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये स्टिमिंग, ग्रिलिंग आणि फ्राइंग अशा उद्योगक्षेत्रातील पहिल्‍याच वैशिष्‍ट्यांसोबत प्रो-लेव्‍हल कन्‍वेक्‍शन वैशिष्‍ट्ये आहेत, जी होम शेफ्स बनलेल्‍या आणि आरोग्‍यदायी आहार सेवनाची सवय अंगिकारलेल्‍या तरूण मिलेनियल्‍सचे लक्ष वेधून घेतील.

जागतिक दर्जाच्‍या तंत्रज्ञानासह या सडपातळ व स्‍टायलिश दिसणा-या श्रेणीमध्‍ये क्‍लीन पिंक रंगामधील मॉडेल्‍सचा समावेश आहे आणि हे मॉडेल्‍स सर्वसमावशेक होम शेफ्सना बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍ने, कुरकुरीत, ऑईल-फ्री स्‍नॅक्‍स आणि स्टिम डिशेस् बनवण्‍याची सुविधा देतात. ही सुविधा यापूर्वी फक्‍त उच्‍चस्‍तरीय कन्‍वेक्‍शन मायक्रोवेव्‍ह मॉडेल्‍समध्‍येच होती.

लोक अधिकाधिक वेळ घरीच व्‍यतित करत असताना त्‍यापैकी अनेकांना कुकिंग व बेकिंगची आवड आहे. बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्ज कोणत्‍याही समकालीन किचनमध्ये असलेच पाहिजेत आणि ग्राहकांना त्‍यांच्‍यामधील लुप्‍त शेफचा शोध घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी परिपूर्ण आहेत.

”घरातून काम आणि घरातून शिक्षण घेण्‍यासोबत लोक घरी बेकिंग व नवीन पाककला करण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसण्‍यात येत आहे. देशभरातील लोक, विशेषत: मिलेनियल्‍स घरी असल्याने व बाहेर खाण्‍यावर निर्बंध असल्‍यामुळे शेफ्स बनले आहेत. ग्राहकांची घरीच आरोग्यदायी व स्‍वादिष्‍ट आहार बनवण्‍याप्रती असलेली नवीन आवड पूर्ण करण्‍यासाठी आम्‍ही एण्‍ट्री लेव्‍हल विभागामधील उद्योगक्षेत्रातील पहिले होम डिसर्ट, स्टिम कुक व ग्रिल फ्राय वैशिष्‍ट्ये असलेले बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्ज सादर केले आहेत,” असे सॅमसंग इंडियाचे ऑनलाइन व्‍यवसाय, ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे वरिष्‍ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्‍हणाले.

आकर्षक व सडपातळ डिझाइन, अधिक सर्वोत्तम कंट्रोल्स, वैशिष्‍ट्यपूर्ण हँडल्‍स, ग्‍लास फिनिश बॉडीसह हे मायक्रोवेव्‍ह्ज आकर्षक दिसण्‍यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्‍यात आले आहेत आणि हे मायक्रोवेह्ज आधुनिक शहरी मॉड्युलर किचन सजावटीला अगदी साजेसे आहेत.

तसेच या स्‍टायलिश दिसणा-या नाविन्‍यपूर्ण मायक्रोवेव्हजसोबत ग्‍लास स्टिम कुकर, राऊंड रॅक आणि क्रस्‍टी प्‍लेट सारख्या ॲक्‍सेसरीज येतात. यामधील ९९.९ टक्‍के ॲण्‍टी-बॅक्‍टेरियल सेरॅमिक एनामल इंटीरिअर मायक्रोवेव्‍हला टिकाऊ आणि स्‍वच्‍छ करण्‍यास सुलभ बनवते.

किंमत आणि उपलब्‍धता

प्रगत तंत्रज्ञान, सुधारित फंक्‍शन्‍स आणि प्रीमियम डिझाइन वैशिष्‍ट्यांसह सॅमसंगने नवीन बेकर सिरीजअंतर्गत पाच मॉडेल्‍स सादर केले आहेत – दोन ग्रिल फ्राय मॉडेल्‍स आणि तीन स्टिम कुक मॉडेल्‍स, जे २३ लिटर क्षमतेमध्‍ये उपलब्‍ध आहेत. ही श्रेणी फ्लिपकार्ट व ॲमेझॉन आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉपवर उपलब्‍ध असून किंमत १०,२९० रूपयांपासून ११,५९० रूपयांपर्यंत आहे.

सॅमसंग बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जची नवीन २०२१ श्रेणी क्‍लीन पिंक, प्‍युअर ब्‍लॅक आणि क्‍लीन ग्रे रंगांमध्‍ये येते, ज्‍यामधून किचन्‍सच्‍या सजावटीमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर होते.

सॅमसंग मायक्रोवेव्‍ह्जसह आरोग्‍यदायी राहणीमान

ग्राहक आरोग्‍य व स्‍वच्‍छतेला अधिक प्राधान्‍य देत असताना सॅमसंगने बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्ज सादर केले आहेत, जे दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये येतात: ग्‍लास स्टिम कुकर ॲक्‍सेसरीसोबत येणारे ऑटो स्टिम फंक्‍शन असलेले स्टिम कुक व्‍हेरिएण्‍ट आणि ऑइल फ्री फ्राइंगची खात्री देणारे क्रस्‍टी प्‍लेट असलेले ग्रिल फ्राय मायक्रोवेव्‍ह्ज.

स्टिम कुक व ग्रील फ्राय या दोन्‍ही मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये होम डिसर्ट वैशिष्‍ट्य आहे, ज्‍यामुळे घरी क्षणात स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍ने बनवता येतात.

बेकर सिरीज मायक्रोवेव्‍ह्जची वैशिष्‍ट्ये:

होम डिसर्ट

मायक्रोवेव्‍हच्‍या सहाय्याने एग पुडिंग, चॉकलेट मड केक, बनाना ब्रेड, ब्राऊनीज सारखी मिष्‍टान्‍ने बनवणे एका बटनाच्‍या क्लिकमध्‍ये शक्‍य आहे. जलद, सुलभ व स्‍वादिष्‍ट!

ग्रील फ्राय

ग्रिल फ्राय मायक्रोवेव्‍ह्जमध्‍ये क्रस्‍टी प्‍लेट आहे, जी ग्राहकांना तेलाशिवाय तळण्‍याची सुविधा आणि ऑइल फ्री फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स, चीज स्टिक्‍स, चिकन विंग्‍ज, वेफर्स इत्‍यादींचा आस्‍वाद घेण्‍याचा आनंद देईल.

स्टिम कुक

स्टिम कुक मायक्रोवेव्‍ह्जसोबत स्टिम कुकर व ऑटो स्टिम फंक्‍शन येते, जे भाज्‍या, मांस, फळे, अंडी, लापशी, तांदूळ, बटाटे इत्‍यादी वाफवण्‍याची सुविधा देतात.

आरोग्‍यदायी व स्‍वच्‍छ करण्‍यास सुलभ असलेले इंटीरिअर

९९.९ टक्‍के ॲण्‍टी–बॅक्‍टेरियल, सुलभ व टिकाऊ सेरॅमिक एनामल स्‍वच्‍छ करण्‍यास सुलभ आहे आणि सरत्‍या काळासह रंग जात नाही. हे अत्‍यंत गंज व स्‍क्रॅच-रोधक आहे, ज्‍यामुळे मायक्रोवेव्‍ह दीर्घकाळापर्यंत टिकतो. सेरॅमिक एनामल कुकिंगचा वेळ कमी होण्‍याची, उष्‍णता सर्वत्र एकसमान पसरण्‍याची आणि सर्व पौष्टिक घटकांचे जतन होण्‍याची खात्री देते.

अधिक प्रमाणात बचत

ऊर्जा-कार्यक्षमतेसह स्‍वादिष्‍ट भोजन शिजवा. इको मोड लक्षणीयरित्‍या उद्योगक्षेत्रातील कमी स्‍टॅण्‍डबाय पॉवरसह ऊर्जा वापर कमी करतो. तुम्‍ही कुकिंग करत नसताना आवश्‍यक फंक्‍शन्‍सच्‍या देखरेखीसाठी वापरण्‍यात येणारी ऊर्जा कमीत कमी असते. ज्‍यामुळे ऊर्जेची बचत होण्‍यासोबत पैशांची बचत देखील होते आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.

सुलभ युएक्‍स

कुकिंग करण्‍याच्‍या सर्वोत्तम व स्‍टायलिश पद्धतीचा आनंद घ्‍या. ग्‍लास टच कंट्रोल पॅनेलमध्‍ये फक्‍त ६ आवश्यक बटन्‍स आहेत, जे तुमच्‍या बोटाच्‍या एका टचसह निवडता येऊ शकतात. पूर्णपणे काचेपासून बनवण्‍यात आले असल्‍यामुळे पुढील बाजूस असलेला काचेचा दरवाजा अधिक स्‍टायलिश लुक देतो.

नवीन डिझाइन

सॅमसंगची नवीन बेकर सिरीज एकसंधीपणे तुमच्‍या समकालीन किचनमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आकर्षकरित्‍या डिझाइन करण्‍यात आली आहे. तुमचा वैयक्तिक स्‍वाद आणि किचनच्‍या स्‍टाइलला परिपूर्ण साजेशा अशा मायक्रोवेव्‍ह ओव्‍हनची निवड करा.