सॅमसंगचा दि फ्रेम टीव्‍ही २०२१ लाँच, स्‍मार्टर, क्‍लासीयर व इनोव्‍हेटिव्‍ह; नवीन टीव्‍ही ४६ टक्‍के Slim and Trim असण्‍यासोबत सानुकूल बेझल्‍सने युक्‍त

दि फ्रेम २०२१ टीव्‍ही आकर्षक असण्‍यासोबत क्‍यूएलईडी तंत्रज्ञानासह उच्‍च दर्जाचा पिक्‍चर क्‍वॉलिटी देतो. हे तंत्रज्ञान अपवादात्‍मक पिक्‍चर क्‍वॉलिटीसाठी वास्‍तविक रंगसंगती, सुधारित कॉन्‍ट्रास्‍ट आणि १०० टक्‍के कलर व्‍हॉल्‍युमसह अद्वितीय आकर्षकता देते. दि फ्रेम २०२१ टीव्‍हीमध्‍ये सॅमसंगचे क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञान, शक्तिशाली क्‍वॉन्‍टम प्रोसेसर ४के, ४के एआय अपस्‍केलिंग क्षमता आणि खोलीमधील वातावरणाचे विश्‍लेषण केल्‍यानंतर आपोआपपणे साऊंड सेटिंग्‍ज सानुकूल करणारा स्‍पेसफिट साऊंड आहे.

  • दि फ्रेम २०२१ टीव्‍ही १२ जूनपासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉपवर उपलब्‍ध
  • दि फ्रेम टीव्‍ही अद्वितीय पद्धतीने प्रत्‍येक स्‍पेसला पूरक असे बेझल रंग निवडण्‍याचे स्‍वातंत्र्य देतो
  • टीव्‍ही चालू असल्‍यास मनोरंजन करतो आणि बंद असल्‍यास कलाकृतीमध्‍ये बदलून जातो
  • दि फ्रेम टीव्‍ही स्थिर पॅकेजिंग डिझाइनसह येईल, जी कॅट हाऊस किंवा बुकशेल्‍फप्रमाणे अपसायकलही करता येणार

नवी दिल्ली : सॅमसंग हा भारताचा पहिल्‍या क्रमांकाचा टीव्‍ही ब्रॅण्‍ड त्‍यांचा सर्वात स्‍टायलिश व बहुइच्छित लाइफस्‍टाइल टीव्‍ही ‘दि फ्रेम’चे २०२१ मधील एडिशन सादर करत आहे. हा टीव्‍ही चालू असल्‍यास मनोरंजन करतो आणि बंद असल्‍यास कलाकृतीमध्‍ये बदलून जातो. दि फ्रेम टीव्‍हीतुमच्‍या लक्‍झरी लिव्हिंग स्‍पेसला अधिक आकर्षक बनवण्‍यासाठी उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आला आहे आणि हा टीव्‍ही आकर्षक व सानुकूल बेझल पर्यायांसह वैयक्तिक लुकची भर करण्‍याची सुविधा देतो. ४३ इंची आकाराचा दि फ्रेम टीव्‍ही यंदा प्रथमच सादर करण्‍यात येत आहे, ज्‍यामधून स्‍टायलिश सुसंगत स्‍पेसमध्‍ये अधिक आकर्षक डिझाइनवर भर करण्‍यात येत आहे.

दि फ्रेम २०२१ टीव्‍ही आकर्षक असण्‍यासोबत क्‍यूएलईडी तंत्रज्ञानासह उच्‍च दर्जाचा पिक्‍चर क्‍वॉलिटी देतो. हे तंत्रज्ञान अपवादात्‍मक पिक्‍चर क्‍वॉलिटीसाठी वास्‍तविक रंगसंगती, सुधारित कॉन्‍ट्रास्‍ट आणि १०० टक्‍के कलर व्‍हॉल्‍युमसह अद्वितीय आकर्षकता देते. दि फ्रेम २०२१ टीव्‍हीमध्‍ये सॅमसंगचे क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञान, शक्तिशाली क्‍वॉन्‍टम प्रोसेसर ४के, ४के एआय अपस्‍केलिंग क्षमता आणि खोलीमधील वातावरणाचे विश्‍लेषण केल्‍यानंतर आपोआपपणे साऊंड सेटिंग्‍ज सानुकूल करणारा स्‍पेसफिट साऊंड आहे.

दि फ्रेम २०२१ टीव्‍ही १२ जूनपासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉपवर उपलब्‍ध असेल. दि फ्रेम टीव्‍ही लवकर खरेदी करणा-या ग्राहकांना १२ जून ते २१ जून २०२१ दरम्‍यान ९,९०० रूपयांचे कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी बेझल मिळेल.

सॅमसंगच्‍या स्थिर उपक्रमांचा भाग म्‍हणून दि फ्रेम २०२१ टीव्‍ही स्थिर पॅकेजिंग डिझाइनसोबत येईल, जी कॅट हाऊस किंवा बुकशेल्‍फप्रमाणे अपसायकल करता येऊ शकते आणि यामधील सेल्‍फ-चार्जिंग सोलार सेल-पॉवर्ड रिमोट कंट्रोल्‍सना बाह्य बॅट-यांची गरज नाही. हे रिमोट कंट्रोल्‍स घरातील वीजेच्‍या माध्‍यमातून चार्ज करता येऊ शकतात, ज्‍यामुळे ग्रीनहाऊस उत्‍सर्जन कमी होण्‍यामध्‍ये मदत होते.

”आज ग्राहक उत्तम डिझाइन व प्रिमिअम तंत्रज्ञानाचे उत्तम संयोजन असलेल्‍या उत्‍पादनांचा शोध घेत आहेत. घरांची सजावट करताना त्‍यांची जीवनशैलीच्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण व वैयक्तिकृत घटकांमध्‍ये तंत्रज्ञानाची भर करण्‍याची इच्‍छा आहे. दि फ्रेम २०२१ टीव्‍हीसह आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना सानुकूल बेझल पर्यायांसह त्‍यांच्‍या लिव्हिंग स्‍पेसमध्‍ये बदल घडवून आणण्‍यासाठी सक्षम करत आहोत. तसेच त्‍यांना आमच्‍या क्‍यूएलईडी तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम पिक्‍चर क्‍वॉलिटी देत आहोत. नवीन एडिशन निश्चितच टीव्‍ही पाहण्‍याची आवड असलेल्‍यांना मनोरंजनाचा अद्वितीय आनंद देईल आणि कोणत्‍याही लिव्हिंग स्‍पेसच्‍या डिझाइनला अधिक आकर्षक करेल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्‍या ऑनलाइन व्‍यवसायाचे वरिष्‍ठ संचालक संदीप सिंग अरोरा म्‍हणाले.

Make TV With Personal Look

दि फ्रेम २०२१ टीव्‍ही तुमच्‍या घरामधील आकर्षकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल, ज्‍यामधून तुम्‍हाला प्रत्‍येक स्‍पेसला साजेसे असे बेझल रंग व बेझल स्‍टाइल पर्याय अद्वितीय पद्धतीने निवडण्‍याची सुविधा मिळेल. दि फ्रेम बेझल दोन रंग व्‍हाइट आणि टीक यांसह सानुकूल करता येऊ शकते आणि इतर आकर्षक घटक खोलीचे लोकेशन किंवा अद्वितीय रंगसंगतीनुसार सानुकूल करता येतात. तसेच हा टीव्‍ही उंची समायोजित करता येणा-या नवीन टीव्‍ही स्‍टॅण्‍डसोबत देखील येतो. ही सुविधा विशेषत: आकर्षक लुकसोबत साऊंडबारला सामावून घेण्‍यासाठी आहे.

तुमच्‍यामधील कलाप्रेमीसाठी

दि फ्रेमचे सर्वात अद्वितीय व आकर्षक वैशिष्‍ट्य म्‍हणजे टीव्‍ही बंद असताना आर्ट मोडमध्‍ये जातो. दि फ्रेम २०२१ टीव्‍ही व्‍यक्‍तींना आवडणा-या अतिरिक्‍त मूळ कलाकृतींसह येतो आणि जगप्रसिद्ध संस्‍थांमधील १,४००हून अधिक कलाकृतींच्‍या वाढत्‍या लायब्ररीसह तुम्‍हाला स्‍वत:चे आर्ट कलेक्‍शन तयार करण्‍याची सुविधा देतो.

तसेच या टीव्‍हीमध्‍ये एआय-आधारित ऑटो-क्‍यूरेशन तंत्रज्ञान देखील आहे, जे तुमच्‍या निवडींनुसार कलाकृतीची शिफारस करते. दि फ्रेम २०२१ टीव्‍हीमधील फोटो स्‍टोरेज क्षमता आता पूर्वीच्‍या ५०० मेगाबाइट्सवरून ६ गिगाबाइट्सपर्यंत वाढवण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे तुम्‍ही यूएचडी क्‍वॉलिटीमधील जवळपास १,२०० फोटोज स्‍टोअर करू शकता.

किंमत, ऑफर्स

  • नवीन फ्रेम टीव्‍ही १२ जून २०२१ पासून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगचे अधिकृत ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉपवर ६१,९९० रूपयांपासून उपलब्‍ध असेल.
  • हा टीव्‍ही ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच व ६५ इंच या चार स्क्रिन आकारांमध्‍ये येईल.
  • दि फ्रेम टीव्‍ही लवकर खरेदी करणा-या ग्राहकांना १२ जून ते २१ जून २०२१ पर्यंत ९,९०० रूपयांपर्यंत किंमत असलेले बेझल भेटवस्तू म्हणून मिळेल.
  • ग्राहक एचडीएफसी डेबिट व क्रेडिट कार्डसवर नो कॉस्‍ट ईएमआयसाठी जवळपास ३,००० रूपयांच्‍या कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात.
  • हा टीव्‍ही प्रमुख बँकांमधील २४ महिन्‍यांपर्यंतच्‍या आकर्षक नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायांसह देखील येतो.

Warranty

दि फ्रेम २०२१ टीव्‍ही १ वर्षाची व्‍यापक वॉरण्‍टी आणि पॅनलवर १ वर्षाच्‍या अतिरिक्‍त वॉरण्‍टीसह येईल.

Samsung The Frame TV Features

स्‍वत:हून टीव्‍हीला स्‍टायलिश लुक द्या: तुमच्‍या वैयक्तिक आवडीनुसार लिव्हिंग स्‍पेसमधील आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करा. दि फ्रेमचे आधुनि‍क व्‍हर्जन तुम्‍हाला तुमच्‍या आवडीप्रमाणे सानुकूल बदल करण्‍याची सुविधा देते. तुम्‍ही दोन विभिन्‍न रंगांमध्‍ये येणा-या ईजी-टू-रिप्‍लेस मॅग्‍नेटिक बेझल्‍ससह ‘स्‍वत:हून टीव्‍हीला स्‍टायलिश लुक देऊ शकता. आधुनिक बेझल डिझाइन कोणत्‍याही होम इंटीरिअर डिझाइनला साजेशी आहे आणि तुमच्‍या लिव्हिंग स्‍पेसला अद्वितीय व क्‍लासी लुक देऊ शकते.

Art Mode

दि फ्रेम टीव्‍हीला बंद असताना देखील आकर्षक रूप देते. तुम्‍ही टीव्‍ही पाहत नसताता ब्‍लॅक‍ स्क्रिन दिसण्‍याऐवजी एक पिक्‍चर फ्रेम दिसते, ज्‍यामध्‍ये पेपर, फिल्‍म किंवा कॅन्‍व्‍हासमध्‍ये दिसणाऱ्या कलाकृती व फोटो दिसतात.

Art Store

आर्ट स्‍टोअरच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही टीव्‍हीला पिक्‍चर फ्रेममध्‍ये बदलू शकता, ज्‍यामध्‍ये जगभरातील १,४०० हून अधिक कलाकृती दिसू शकतात. युजर्स जगप्रसिद्ध संस्‍थांमधील कलाकृतीची वाढती लायब्ररी मिळवू शकतात. त्‍यासाठी त्‍यांना व्‍यक्तिश: कलाकृतींची १,१९९ रूपयांमध्‍ये निवड करावी लागेल किंवा प्रतिमहिना २९९ रूपयांमध्‍ये संपूर्ण आर्ट स्‍टोअर कलेक्‍शन सबस्‍क्राईब करावे लागेल.

My Collection

दि फ्रेम स्‍मार्टथिंग्‍ज ॲप किंवा यूएसबी फ्लॅश ड्राइव्‍हचा वापर करत स्‍मार्टफोनच्‍या माध्‍यमातून तुमचे फोटो सुलभपणे अपलोड करण्‍याची आणि पाहण्‍याची सुविधा देतो. तुम्‍ही ५ विभिन्‍न मॅट लेआऊट पर्याय आणि १६ विभिन्‍न रंगसंगतींसह तुमच्‍या कौटुंबिक किंवा पर्यटन फोटोजना सानुकूल करत अधिक वास्‍तववादी देखील करू शकता.

Samsung TV Plus

नवीन श्रेणी नुकतेच सादर करण्‍यात आलेल्‍या सॅमसंग टीव्‍ही प्‍लससह येते. हे वैशिष्‍ट्य व्‍हर्च्‍युअल चॅनेल्‍ससह मोफत लाइव्‍ह स्ट्रिमिंग टीव्‍ही कन्‍टेन्‍ट पाहण्‍याचा आनंद देते. आता तुम्‍ही विविध चॅनेल्‍समधून निवड करू शकता आणि सध्‍या ट्रेण्‍डमध्‍ये असलेल्‍या कन्‍टेन्‍टचा शोध घेऊ शकता. सध्‍या कोणता कन्‍टेन्‍ट मनोरंजनासाठी उत्तम आहेत याबाबत मित्राला विचारण्‍याची गरज नाही. सॅमसंग टीव्‍ही प्‍लसमध्‍ये जा आणि उत्तम मनोरंजनपूर्ण कन्‍टेन्‍टचा शोध घ्‍या.

Samsung launches The Frame TV 2021 Smarter Classier and Innovative New TVs with 46 percent Slim and Trim and Custom Bezels